मराठी भाषेचा उगम ..!


भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेल्या आहेत. 
१) इंडो/युरोपीय ( इंडो-आर्य भाषा ७४ % )
२) द्रविडीय भाषा ( २४ %)

१) भारतातील मातृभाषांची संख्या जवळपास १६५२ इतकी आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात.
२) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार हिन्दी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.
३) सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणार्‍या २२ प्रादेशिक भाषांना राजकीय / राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

टीप : भारतीय संविधांनाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. 

■ प्रत्येक भाषेला तिचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत - प्राकृत भाषांपासून झाला असला तरी गुजराती,हिंदी, फारशी , अरबी , कानडी , व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला संपन्न बनवण्याचे काम केले आहे.
■ भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ती 'आत्माविष्कारा'चे एक माध्यम आहे.

१) भाषा :


■ व्याख्या : 'विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय.'
■ बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
■ भाषा ठराविक कालावधी नंतर व प्रदेशांनुसार बदलत जाते; म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात.
■ ऐकणे , बोलणे , वाचने या कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते. 

Archive

Contact Form

Send