मराठी व्याकरण : संधी व त्याचे प्रकार
जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.
उदा.
- विधालय : धा : द + य + आ
- पश्चिम : श्चि : श + च + इ
- आम्ही : म्ही : म + ह + ई
- शत्रू : त्रू : त + र + ऊ
संधी:
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
उदा.
- ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
- सूर्यास्त = सूर्य + अस्त
- सज्जन = सत् + जन
- चिदानंद = चित् + आनंद
संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
दिर्घत्व संधी -
- अ + अ = आ
- आ + आ = आ
- आ + अ = आ
- इ + ई = ई
- ई + ई = ई
- इ + इ = ई
- उ + ऊ = ऊ
- उ + उ = ऊ
नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
उदा.
- ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
- गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश
- उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश
- चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
- महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी
- देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
उदा.
- एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य
- सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव
- मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य
- प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य
- जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ
- गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
उदा.
- प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ
- इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी
- अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम
- प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक
- मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर
- पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
उदा.
- ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन
- गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन
- गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर
- नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक
व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
- सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
- चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा. - विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल
- वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती
- क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा
(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
उदा.

(3) पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्यात वर्गातील व्यंजन येऊन संधी होती. यालाच 'अनुनासिक संधी' असे म्हणतात.

(4) याबाबतचा नियम असा त् या व्यंजनापुढे
- च् छ् आल्यास त् बद्दल च् होतो.
- ज् झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.
- ट् ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो.
- ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.
- श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बद्दल छ् होतो.
- (5) 'म्' पुढे स्वर आल्यास तो स्वर तो स्कर मागील 'म्' मध्ये मिसळून जातो व्यंजन आल्यास 'म्' बद्दल मागील अक्षरांवर अनुस्वार किंवा बिंदू येतो.
उदा. - सम्+आचार=समाचार
- सम्+गती=संगती
(6) ‘छ’ पूर्वी र्हगस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये ‘च्’ हा वर्ण येतो.
उदा.
- रत्न+छाया =रत्नछाया
- शब्द+छल = शब्दछल
विसर्ग संधी:
- एकापाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होणार्या क्रियेला 'विसर्ग संधी' असे म्हणतात.
- विसर्ग+स्वर = विसर्ग संधी
- विसर्ग+व्यंजन = विसर्ग संधी
नियम -
(1) विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिळून त्याचा ‘ओ’ होतो यास 'उकार संधी' म्हणतात.
उदा.


(2) विसर्गाच्या मागे ‘अ’,’आ’ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा ‘र’ होवून संधी होते.
उदा.


(3) पदाच्या शेवटी ‘स’ येऊन त्यांच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स’ विसर्ग होतो.
उदा.
- मनस्+पटल= मन:पटल
- तेजस्+कण= तेज:कण
(4) पदाच्या शेवटी ‘र’ येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या ‘र’ चा विसर्ग होतो.
उदा.
- अंतर+करण= अंत:करण
- चतुर+सूत्री= चतु:सूत्री
(5) विसर्गाच्या ऐवजी येणार्या ‘र’ च्या मागे ‘अ’ व पुढे मृदु वर्ण आल्यास तो ‘र’ तसाच राहून संधी होते.
उदा.
- पुनर+जन्म= पुनर्जन्म
- अंतर+आत्मा= अंतरात्मा
(6) विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा.
- प्राप्त:+काल= प्राप्त:काल
- तेज:+पुंज= तेज:पुंज
- इत:+उत्तर= इतउत्तर
- अत:+एव= अतएव
(7) विसर्गाच्या मागे ‘इ’ किंवा ‘ऊ’ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ‘ष’ होतो.
उदा.
- नि:+कारण-निष्कारण
- नि:+पाप= निष्पाप
- दु:+परिणाम= दुष्परिणाम
- दु:+कृत्य – दुष्कृत्य
- दु:+कीर्ती = दुष्कीर्ती
- बहि:+कृत = बहिष्कृत
(8) विसर्गाच्या पुढे च्, छ् आल्यास विसर्गाचा ‘श’ होतो. त्, थ्, आल्यास ‘स’ होतो.
उदा.
- नि:+चल = निश्चल
- दु:+चिन्ह = दुश्चिन्ह
- मन:+ताप = मनस्ताप
- नि:+तेज = निस्तेज
(9) विसर्गाच्या पुढे श्.स् आल्यास विसर्ग विकल्पाचे कायम राहतो किंवा लोप पावतो.
उदा.
- दु:+शासन = दु:शासन / दुश्शासन
- नि:+संदेश = नि:संदेश / निरुसंदेश
- पुर:+सर = पुर:सर / पुरस्कार