चालू घडामोडी : २९ ऑक्टोंबर २०१८
राष्ट्रीय
- या ठिकाणी दिनांक 27 ऑक्टोबर 2018 रोजी 'एक्सपीरियन्स द नॉर्थ ईस्ट' या शीर्षकाखाली ‘ईशान्य महोत्सव’ (North East festival) याचा शुभारंभ करण्यात आला - नवी दिल्ली.
- दिनांक 27 ऑक्टोबर 2018 रोजी या ठिकाणांदरम्यान ‘रो-पॅक्स’ (रोल ऑन / ऑफ पॅसेंजर) नौका फेरी सेवा सुरू करण्यात आली - घोघा (सौराष्ट्र) आणि दाहेज (गुजरात).
- दिनांक 28 नोव्हेंबरला या राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत दृष्टिहीन लोकांसाठी देशात प्रथमच ब्रेल लिपीतले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वापरण्यात येणार - राजस्थान.
क्रिडा
- ‘ITTF चॅलेंज बेल्जियम ओपन 2018’ या स्पर्धेत अंडर-21 महिला एकल श्रेणीत कोरियाच्या यूजिन किमकडून पराभूत होऊन या भारतीय खेळाडूने रौप्यपदक जिंकले - अहिका मुखर्जी.
व्यक्ती विशेष
- 11 ते 13 जानेवारी या काळात यवतमाळ (महाराष्ट्र) येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष - अरुणा ढेरे.
- सन 1993 ते सन 1996 या काळात या राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मदनलाल खुराना यांचे दिनांक 27 ऑक्टोबरला निधन झाले - दिल्ली.
- भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या या वकीलाला अमेरिकेच्या फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन (FERC) याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले - नील चॅटर्जी.
सामान्य ज्ञान
- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) याचे स्थापना वर्ष – सन 1926.
- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) याचे मुख्यालय - लॉंसन (स्वित्झर्लंड).
- 1903 सालचे 17 फुट x 11 फूट आकाराचे भव्य असे दिल्ली दरबारचे तैलचित्र या ब्रिटिश चित्रकाराने काढले - रॉडेरिक मॅकेन्झी.
- भारतीय निवडणूक आयोग (ECI) याचे स्थापना वर्ष – सन 1950 (25 जानेवारी).
- भारताचे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त - ओम प्रकाश रावत.
- भारतात विधानसभा निवडणूका दर इतक्या वर्षांनी घेतात – 5 वर्ष.