दिनविशेष
दिनविशेष
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस - 27 ऑगस्ट.
आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 31 ऑगस्ट.
आफ्रिका वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दशक – वर्ष 2015 – वर्ष 2024.
आंतरराष्ट्रीय
___ याच्या 'एब अँड फ्लो' अहवालानुसार, वर्ष 1970 ते वर्ष 2000 या कालावधीत देशांमध्ये झालेल्या एकूण स्थलांतर वाढीच्या 10 टक्के पाण्याची कमतरतेमुळे झाले आहे - जागतिक बँक.
संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO) याच्या “स्पर्धात्मक औद्योगिक कार्यक्षमता निर्देशांक (CIP) 2021” यामध्ये जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर असलेला देश - जर्मनी (त्याखालोखाल चीन, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया).
जून 2021 मध्ये पुढील _____ वर्षांकरिता ‘मध्य आर्क्टिक महासागर मत्स्य व्यवसाय करार’ (Central Arctic Ocean Fishery Agreement) लागू झाला असून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये कॅनडा, चीन, डेन्मार्क (ग्रीनलँड आणि फॅरो बेटांच्या संदर्भात), युरोपिय संघ, आइसलँड, जपान, नॉर्वे, रशिया, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे - 16 वर्ष.
राष्ट्रीय
भारतीय रेल्वेने देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातील पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी स्वस्त आणि सर्वसमावेशक अश्या 'भारत दर्शन' विशेष पर्यटन गाड्या 29 ऑगस्ट 2021 पासून सुरू केल्या, ज्या ____ याद्वारे चालवले जातील - भारतीय रेल्वे खानपान आणि वाहतूक महामंडळ (IRCTC).
_ या संस्थेच्या भागीदारीने वस्त्रोद्योग मंत्रालयाने 'इंडियासाइज / INDIAsize' नामक एका प्रकल्पाची सुरुवात केली, जो भारतीय लोकांच्या शरीराच्या मोजमापावर आधारित भारतीय साइज चार्ट तयार करण्यासाठी राबविला जाणार आहे - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) नवी दिल्ली.
व्यक्ती विशेष
EOUs आणि SEZs यांच्यासाठी निर्यात प्रोत्साहन परिषद (EPCES) यांचे नवीन उपाध्यक्ष - श्रीकांत बडिगा.
क्रिडा
पहिला आणि एकमेव भारतीय जलतरणपटू, ज्याची इंटरनॅशनल स्विमिंग लीग (ISL) यासाठी निवड झाली आणि त्याला 2021 हंगामासाठी एनर्जी स्टँडर्ड स्विम क्लब (पॅरिस) यामध्ये सामील करण्यात आले – साजन प्रकाश.
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला, जीने ‘2020 टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले - अवनी लेखारा.
‘2020 टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, भारताच्या ____ याने पुरुष भालाफेक (F64) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला - सुमित अंतिल.
‘2020 टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, ___ याने पुरुषांच्या थाळीफेक F52 स्पर्धेत कांस्य पदक जिंकले - विनोद कुमार.
‘2020 टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, ____ याने पुरुषांच्या थाळीफेक F52 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले - योगेश कथूनिया.
‘2020 टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, ____ याने पुरुषांच्या भाला फेक F46 खेळात रौप्य पदक जिंकले आणि सुंदर सिंह गुर्जरने कांस्य पदक जिंकले - देवेंद्र झाझरिया.
राज्य विशेष
तामिळनाडू सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग ____ येथे एक एकीकृत मत्स्य महाविद्यालय-सह-संशोधन केंद्र स्थापन करेल - तुतीकोरिन.
क्रीडा प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेश सरकारच्या ‘विश्वामित्र पुरस्कार’चा प्राप्तकर्ता - हबीब हसन (हॉकी प्रशिक्षक).
__ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी ‘MyBookLo’ अॅप तयार केले - राजस्थान.
ज्ञान-विज्ञान
____ संस्था 'ई-सोर्स' नामक एक डिजिटल मंच तयार करत आहे, जे कचरा झालेली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे (WEEE) यासाठी एक विनिमय मंच असेल आणि विविध भागधारकांमध्ये औपचारिक पुरवठा साखळी सुलभ करेल - IIT मद्रास.