भारताच्या पुढाकाराने 4 मार्च 2021 रोजी ‘चाबहार दिन’ साजरा.

भारताच्या पुढाकाराने 4 मार्च 2021 रोजी ‘चाबहार दिन’ साजरा.
🏝आभासी स्वरूपात आयोजित केलेले तीन दिवसीय ‘भारतीय सागरी परिषद 2021’ या कार्यक्रमाचे द्वितीय सत्र 4 मार्च 2021 रोजी पार पडले.

🏝भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्यवतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भारतीय सागरी दृष्टिकोन 2030” जाहीर केला.

🏝याप्रसंगी, भारताच्या पुढाकाराने 4 मार्च 2021 रोजी ‘चाबहार दिन’ साजरा करण्यात आला.

🧲चाबहार बंदर........

🏝चाबहार हा इराणमधील सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांताचा एक शहर आहे. हे एक मुक्त बंदर आहे आणि ओमानच्या खाडीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. हे बंदर इराणमध्ये पर्शियन आखाती प्रदेशाच्या बाहेर स्थित आहे आणि या प्रदेशामध्ये सागरी व्यापार विस्तारीत करण्यामध्ये मदत करेल.

🏝भारताने पाकिस्तानमधून जाणारा मार्ग वगळत अफगाणिस्तानाशी थेट संपर्क साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाबहार येथील शाहीद बिहेष्टी बंदर येथे भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. भारताच्या जलवाहतुक मंत्रालयाने चाबहार बंदर विकास प्रकल्प आणि अनुषंगिक कामे यांच्या अंमलबजावणीसाठी इराणमध्ये एक कंपनी तयार केली आहे.

🏝चाबहार बंदर हे भारत व युरेशियामधील मार्ग ओलांडण्यासाठी केंद्र म्हणून  विकसित झाले असून 123 जहाजे,  जहाजाची मालवाहक क्षमता तपासणीसाठी 13,752 TEU  आणि 18 लाख टन सामान्य कार्गो हाताळण्याची त्याची क्षमता आहे.

Archive

Contact Form

Send