चालू घडामोडी : 23 जानेवारी 2020
आंध्रप्रदेश राज्याच्या तीन राजधानी असणार
- नव्या विधेयकानुसार, आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम, न्यायालयीन राजधानी कर्नूल, तर विधिमंडळ राजधानी अमरावती असणार आहे.
- अमरावती या शहरात विधीमंडळाचे कामकाज ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीत द्वितीय ‘NIC तंत्रज्ञान परिषद’ संपन्न झाली
नवी दिल्लीत ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ (Tech Conclave) आयोजित करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC) या संस्थेच्या वतीने ‘टेक्नॉलॉजीज फॉर नेक्स्ट-जेन गव्हर्नन्स’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची देशभरातल्या सरकारी अधिकार्यांच्या क्षमता वाढीस मदत होणार आणि उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत होणार आहे.
NIC विषयी
राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (National Informatics Centre -NIC) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत एक संलग्न कार्यालय आहे. या संस्थेची स्थापना 1976 साली झाली. हे केंद्र सरकारी IT सेवांच्या वितरणासाठी आणि डिजिटल इंडियाच्या काही उपक्रमांच्या वितरणास मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवते.
प्रत्यक्ष कर संकलनात 5.2 टक्के घट
15 जानेवारी 2020 या तारखेपर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 7.3 लक्ष कोटी रुपये होते, जे की गेल्या वर्षाच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी कमी आहे.
ठळक बाबी
- याच कालावधीत वैयक्तिक आयकर संकलनात 6.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे की अर्थसंकल्पात 23.3 टक्के एवढे अंदाजित केले गेले होते.
- कॉर्पोरेट कर दर नियमित कंपन्यांकरिता पूर्वीच्या 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर नवीन उद्योगांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5 टक्के एवढा अपेक्षित असल्याने, मंदावणार्या अर्थव्यवस्थेचा परिणाम देखील संकलणावर होणार आहे.
दिल्लीत ‘युथ को: लॅब - नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली
17 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत दिल्लीत ‘युथ को: लॅब - नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली.
अटल इनोव्हेशन मिशन (AIM), NITI आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
- कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बेंगळुरू, मुंबई, इंदौर आणि वाराणसी या चार शहरांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला.
- कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 60 हून अधिक संघांची निवड करण्यात आली होती आणि दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्यातल्या 15 विजयी संघांनी भाग घेतला होता.
- स्पर्धेत अव्वल ठरलेले चार संघ आता एप्रिल 2020 या महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशियात आयोजित केल्या जाणार्या ‘युथ को: लॅब रीजनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
‘युथ को: लॅब’ हा सिटी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संघटनेच्या वतीने जागतिक पातळीवर राबवला जाणारा एक युवा कार्यक्रम आहे. 2017 सालापासून हा कार्यक्रम राबवला जात आहे.
प्रादेशिक आव्हानांना तोडगा काढण्यासाठी तरुणाईला नवकल्पकतेसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमामधून तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि युवा नेतृत्व आणि सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
भारताचा ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’.
◾️भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने आवश्यक त्या उपाययोजना करून भूकंपामुळे येणार्या आपत्तींना कमी करण्यासाठी देशभरात ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’ नावाचा प्रकल्प राबवत आहे.
◾️‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन’ म्हणजे काय?
◾️‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन’ ही भूगर्भीय आणि भूभौतिकीय वैशिष्ट्यांच्या आधारे भूकंप-प्रवण क्षेत्र ओळखण्याची एक प्रक्रिया आहे.
📕या प्रक्रियेत खालील बाबींना गृहीत धरल्या जाते........
🚦धरणीकंप
🚦दरडी कोसळणे
🚦मातीच्या थरांचा प्रतिसाद
🚦लिक्विफॅक्शन ससेप्टीबिलिटी
🚦पर्वत कोसळण्याचा धोका
🚦भकंपांमुळे येणारा पूर
◾️आतापर्यंत ही प्रक्रिया
✔️सिक्किम,
✔️दिल्ली,
✔️कोलकाता,
✔️बगळुरू,
✔️गवाहाटी,
✔️जबलपूर,
✔️दहरादुन,
✔️अहमदाबाद
✔️गांधीधाम या शहरांमध्ये पूर्ण झालेली आहे.
◾️जगापुढे, जापान हे एक आदर्श उदाहरण आहे जिथे मायक्रोझोनेशन तंत्र चांगल्या प्रकारे अंमलात आणले गेले आहे.