चॅटिंग कॉर्नर क्रमांक ०३

नमस्कार मित्रानो , 
     आपण ज्याची वाट पाहत होता ती वेळ आत्ता आली आहे. MPSC साठी आजपर्यंत घेतलेल्या परिश्रमाच्या  कसोटीची वेळ आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग १७ फेब्रुवारी २०१९ ला ३४२ जगासाठी पूर्व परीक्षा घेणार आहे. त्यासाठी आयोगाने अर्ज मागवले आहेत. MPSC पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१८ आहे. आपण वेळेच्या आत आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या.  

कोणकोणत्या जगासाठी आयोग अर्ज मागवत आहे ?
खालील विविध पदासाठी आयोग अर्ज मागवत आहे.
  1. उप जिल्हाधिकारी: 40 जागा
  2. पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त: 34 जागा
  3. सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा: 16 जागा
  4. उद्योग उप संचालक, तांत्रिक: 02 जागा
  5. तहसिलदार: 77 जागा
  6. उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा: 25 जागा
  7. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी: 03 जागा
  8. कक्ष अधिकारी: 16 जागा
  9. सहायक गट विकास: 11 जागा
  10. उद्योग अधिकारी, तांत्रिक: 05 जागा
  11. नायब तहसिलदार: 113 जागा
शैक्षणिक पात्रता काय असावी लागेल ?

  • पद क्र.1,2,5,6,8,9 & 11: पदवीधर किंवा समतुल्य 
  • पद क्र.3: 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा ICWA किंवा  M.Com
  • पद क्र.4 & 10:  BE/BTech (सिव्हिल) किंवा B.Sc 
  • पद क्र.7: इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (Physics & Maths)
परीक्षा फी किती आहे ?
अमागास प्रवर्गासाठी : ₹524/- व  मागासवर्गीय वर्गासाठी  ₹324/- फी आहे.

परीक्षा कोठे असेल ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ची परीक्षा महाराष्ट्रातील ३७ केंद्रावर घेणार आहे.

नोकरीचे ठिकाण कोठे असेल ?
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी करावी लागेल.

महत्वाच्या तारखा :-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2018

पूर्व परीक्षा : 17 फेब्रुवारी 2019
मुख्य परीक्षा : 13,14 & 15 जुलै 2019


आपणास काही प्रश्न, शंका अथवा काही सूचना असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा.


Archive

Contact Form

Send