दररोज जनरल नॉलेज क्रमांक १८

जनरल नॉलेज


Q.1) अलीकडेच कुठे कॅनडा-भारत व्यवसाय मंचाची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली?
A) ओटावा
B) नवी दिल्ली
C) गांधीनगर
D) टोरेंटो
उत्तर : B) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 21 फेब्रुवारी 2018 रोजी कॅनडा-भारत व्यवसाय मंचाची दुसरी बैठक नवी दिल्लीत संपन्न झाली. बैठकीसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळ हे भारत दौर्यावर आले आहेत.


Q.2) कोण सर्वात यशस्वी हिवाळी ऑलंपिक खेळाडू ठरला?
A) मॅरिट बोजरगेन
B) मायकेल फेल्प्स
C) उसेन बोल्ट
D) शिव केशवन
उत्तर : A) मॅरिट बोजरगेन
स्पष्टीकरण : 9-25 फेब्रुवारी या काळात IOC च्या वतीने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये नॉर्वेच्या मॅरिट बोजरगेन ही सर्वात यशस्वी हिवाळी ऑलंपिक खेळाडू ठरत इतिहास रचला आहे. तिने ऑलंपिक इतिहासात सर्वाधिक 14 पदक जिंकून हा विक्रम केला.


Q.3) क्रिसीलच्या मतानुसार आगामी तीन वर्षांमध्ये ई-रिटेल बाजारात किती वाढ होण्याची शक्यता आहे?
A) 250%
B) 300%
C) 350%
D) 150%
उत्तर : A) 250%
स्पष्टीकरण : आगामी तीन वर्षांमध्ये ई-रिटेल बाजारात अडीच पटीने वाढ होण्याची शक्यता आहे, असे क्रिसीलच्या अहवालात स्पष्ट केले गेले आहे. क्रिसिलच्या मते, वर्ष 2016-17 च्या आकडेवारीनुसार भारतातल्या एकूण 49 लाख कोटी रुपयांच्या किरकोळ क्षेत्रातील व्यवहारांमध्ये ऑनलाइन किरकोळ बाजारपेठचा 1.5% (70,000 कोटी रुपये) एवढा वाटा आहे. आणि हा वाटा येत्या तीन वर्षांमध्ये वेगाने 250% ने वाढणार आहे.


Q.4) कमल हसन यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे?
A) जस्टीस पार्टी
B) AIDMK – जस्टीस
C) न्यू रायजींग पार्टी
D) पीपल्स जस्टीस पार्टी
उत्तर : D) पीपल्स जस्टीस पार्टी
स्पष्टीकरण : तामिळनाडूचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आपल्या ‘मक्कल नीति मय्यम (Centre for People’s Justice)’ या राजकीय पक्षाची घोषणा केली. मदुराईतल्या ओथाकडई येथे त्यांनी पक्षाच्या कोऱ्या झेंड्याचे अनावरण केले. पक्षाचे बोधचिन्ह हे सहा हात गोलाकारमध्ये एकमेकांना जोडलेले दर्शवते आणि त्या वर्तुळामध्ये एक तारा चिन्हित आहे.


Q.5) कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी आणखी 30 दिवसांसाठी वाढवली?
A) काँगो केंद्रीय प्रजासत्ताक
B) व्हेनेझुएला
C) इंडोनेशिया
D) मालदीव
उत्तर : D) मालदीव
स्पष्टीकरण : मालदीवच्या संसदेने राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या शिफारसीवर देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी काळाला आणखी 30 दिवसांसाठी वाढविण्यास मंजूरी दिली आहे. देशामध्ये आता आणीबाणी 22 मार्च 2018 रोजी समाप्त होणार.


Q.6) कोणत्या तारखेला दिल्लीत युरो-6 मानक लागू केले जाणार?
A) 1 एप्रिल 2018
B) 1 एप्रिल 2020
C) 1 एप्रिल 2021
D) 1 एप्रिल 2019
उत्तर : A) 1 एप्रिल 2018
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. मदन बी. लोकुर यांच्या खंडपीठाकडे स्पष्टता देत केंद्र शासनाने युरो-6 मानकावर आधारित पेट्रोल आणि डीजल यांचा पुरवठा दिल्लीत 1 एप्रिल 2018 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमधील ‘गंभीर’ पातळीवरचे प्रदूषण पाहता, युरो-6 मानकावर आधारित इंधनाचा पुरवठा निर्धारित दिनाच्या दोन वर्षाआधीच सुरू होणार. केंद्राने यापूर्वी 1 एप्रिल 2020 ही कालमर्यादा निर्धारित केली होती.


Q.7) दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार आपला पर्याय निवडा.
I. ‘सारस’ हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे.
II. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने या विमानाचा विकास केला आहे.
बरोबर पर्याय निवडा
A) I आणि II दोन्ही
B) केवळ II
C) केवळ I
D) I किंवा II कोणतेही नाही
उत्तर : B) केवळ II
स्पष्टीकरण : भारताचे स्वदेशी बनावटीचे हलके विमान ‘सारस’ या परिवहन विमानाचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वी ठरले आहे. CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी (CSIR-NAL) ने या विमानाची रचना आणि विकास केला आहे. ‘सारस Mk-2’ आवृत्ती प्रथम सैन्यदलासाठी आणि नंतर नागरी आवृत्तीचा CSIR-NAL चा प्रस्ताव आहे. याच श्रेणीतल्या आयात विमानापेक्षा ‘सारस’ 20-25% किफायतशीर आहे. सुधारित आवृत्तीतले विमान 14 आसनांऐवजी 19 आसनांचे राहणार आहे.


Q.8) कोणत्या ईशान्येकडील राज्यात ईशान्य क्षेत्रातल्या पहिल्या ‘क्षेत्रीय कृषी केंद्रा’चे उद्घाटन 7 मार्च 2018 ला केले जाणार?
A) आसाम
B) मिजोरम
C) मणिपूर
D) अरुणाचल प्रदेश
उत्तर : B) मिजोरम
स्पष्टीकरण : इस्रायलच्या सहकार्याने उभारलेल्या भारताच्या ईशान्य क्षेत्रात पहिल्या ‘क्षेत्रीय कृषी केंद्रा’चे उद्घाटन मिजोरममध्ये 7 मार्चला केले जाणार. 8 ते 10 कोटी रुपये खर्चाचे हे केंद्र विशेष रूपाने आंबट फळांच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी असणार. हा प्रकल्प कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिजोरम राज्य शासन आणि इस्रायली सरकार यांच्या सहकार्याने चालवले जाणार. इस्रायल विशेषज्ञता आणि व्यावसायिक पाठबळ प्रदान करणार.


Q. 9) नव्या सुधारित ई-राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (e-NAM) यामध्ये आणलेल्या वैशिष्ट्यांसाठी खालील विचारात घ्या:
I. MIS डॅशबोर्ड
II. BHIM देयके सुविधा
III. व्यापर्यांसाठी मोबाईल देयके सुविधा
IV. शेतकर्यांसाठी ई-लर्निंग मॉड्यूल
बरोबर वैशिष्ट्य असलेला पर्याय निवडा.
A) I, II आणि III
B) II, III आणि IV
C) I, III आणि IV
D) वरील सर्व
उत्तर : D) वरील सर्व
स्पष्टीकरण : ई-नाम (e-NAM) या ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारपेठ व्यासपीठाचा वापर अधिक सुलभ करणाऱ्या सहा नव्या सुविधांना सुरू करण्यात आले आहे. ही सहा वैशिष्ट्ये आहेत - MIS डॅशबोर्ड, व्यापार्यांसाठी BHIM देयके सुविधा, मोबाईल देयके सुविधा, मोबाईल अॅपमध्ये वाढीव वैशिष्ट्ये (गेट एन्ट्री आणि मोबाईलद्वारे पैसे देणे), शेतक-यांच्या माहितीचे एकीकरण आणि ई-नाम संकेतस्थळावर ई-लर्निंग मॉड्यूल.


Q.10) खालीलपैकी कोण ‘ईशान्येसाठी नीती मंच’ चे सह-अध्यक्ष नाहीत?
I. नीती आयोगाचे उपाध्यक्ष
II. वित्त मंत्रालय
III. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
बरोबर पर्याय निवडा
A) I आणि II
B) केवळ II
C) केवळ III
D) I आणि III
उत्तर : B) केवळ II
स्पष्टीकरण : केंद्र शासनाने ‘ईशान्येसाठी नीती मंच (NITI Forum for Northeast)’ याची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष (राजीव कुमार) आणि ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (डॉ. जितेंद्र सिंह) हे या मंचाचे सह-अध्यक्ष असतील. मंचाचे सचिवालय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयात असणार. मंचाच्या सदस्यांमध्ये विकासासंबंधी मंत्रालयांचे सचिव, संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि अन्य संबंधित विशेषज्ञांचा समावेश असणार.



"जिंकायची मजा तेव्हाच आहे.
       जेव्हा अनेकजण तुमच्या
        पराभवाची आतुरतेने
            वाट पाहत असतात."

Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send