चालू घडामोडी : ३० ऑक्टोंबर २०२०

🌺🌺अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक🌺🌺

🔰अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे.

🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

🔰टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून 500 एकर जागा देण्यात आली फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन 11 सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे.

🔰टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे.
या प्रकल्पात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.तसंच यापैकी 90 टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे.

🌺16 Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामील होणार.🌺🌺

🔰भारताने फ्रान्सला 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली.

🔰आता भारतीय हवाई दलाची क्षणता आणि ताकद आणखी वाढणार आहे. 16 Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल 2021 पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत.

🔰भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

🌺🌺ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील!.🌺🌺

🔰विश्वातील अव्वल तीन खेळांमध्ये स्थान मिळवणाऱ्या क्रिकेटचा पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढाकार घेतला आहे.

🔰‘आयसीसी’ने संबंधित देशांकडून याद्वारे होणाऱ्या नफ्याचा अहवाल मागवला आहे.2018मध्ये ‘आयसीसी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 87 टक्के चाहत्यांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याला होकार दर्शवला होता.

🔰यापूर्वी 1900मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता.त्यावेळी ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सचा 158 धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकावले होते.

🌺🌺दिल्लीत येत्या दिवाळीत ‘हरित फटाके’ वापरात आणले जाणार.🌺🌺
🔰येत्या दिवाळीमध्ये ‘हरित फटाके’ वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. दिल्ली सरकारने पहिल्यांदाच पूर्णपणे हरित फटाके विक्रीसाठी मांडण्याची व्यवस्था तयार केली आहे.

🔰विज्ञान व उद्योग संशोधन परिषद (CSIR) येथील शास्त्रज्ञांनी कमी प्रदूषण करणारे फटाके विकसित केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -

🔰सेफ वॉटर अँड एयर स्प्रीन्कलर (SWASसेफ मिनीमल अॅल्युमिनियम (SAFAL)सेफ थर्माईट क्रॅकर (STAR)
इलेक्ट्रॉनिक क्रॅकर (ई-क्रॅकर) - CSIR-CEERI येथे विकसित केले गेले. ते फटाके प्रकाश/ध्वनी याचा प्रभाव उत्पन्न करण्यासाठी उच्च-व्होल्टेजइलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्जच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे इलेक्ट्रिक स्पार्क उत्पन्न करतात. ई-लडी, ई-अनार, ई-क्रॅकरसाठी तंत्र इत्यादी विविध उत्पादनांना विकसित केले आहे.

🔰पोस्ट कम्बशन कंट्रोल सिस्टम आणि डिव्हाइस - CSIR-NEERI येथे स्थानिक धूळ नियंत्रणासाठी फोटोचिप सामग्री म्हणून PURE-WAYU ही नवीन यंत्रणा विकसित करण्यात आली.

🔰रिड्युस्ड एमिशन क्रॅकर - CSIR-CECRI (कराईकुडी) येथे कमी उत्सर्जन होणारे फटाके विकसित केले गेले.बिजली क्रॅकर - CSIR-NEERI येथे प्रदूषके-विरहित फटाके विकसित केले गेले.

🔰नवे फटाके पर्यावरणाला अनुकूल आहेत. शिवाय परंपरागत फटाक्यांपेक्षा 15-20 टक्के स्वस्त आहेत. फटाके पाण्याचे बाष्प आणि/किंवा कमी धूर आणि कमी वायू उत्सर्जित करणारे आहेत. फटाक्यांमध्ये सामान्यता वापरली जाणारी पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर ही प्रदूषके नव्या फटाक्यांमध्ये वापरली गेली नाहीत.

🔰हरित फटाके पार्टिकल्युलेट मॅटर (PM10 आणि PM2) यांचे 30 ते 35 टक्के कमी उत्सर्जन तसेच सल्फर डायऑक्साइड (SO2) व नायट्रोजन ऑक्साईडचे 35-40 टक्के कमी उत्सर्जन करते.

🌺🌺लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं.
🌺🌺

🔰भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल. २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे १० कोटी डोस बनून तयार होतील. पुणेस्थित सिरम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

🔰“‘कोविशिल्ड’ लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. “यूकेने त्यांचा डाटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे” असे अदर पूनावाला म्हणाले.

🔰सिरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर सिरम इन्स्टिट्यूट करोना व्हायरसवर अन्य लशींच्या उत्पादनावरही काम करत आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त लशींचे उत्पादन सुरु आहे. त्यात ३८ लशी मानवी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत.

🌺🌺बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.🌺🌺

🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

🔰माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे. तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔰वैवेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

🔰शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

🌺🌺सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन🌺🌺
🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे.

🔰अॅप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.

🔰ते मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि GIMS या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते.

🔰सेवेच्या काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण भुदलात SAI अॅपचा वापर केला जाणार आहे.

🔴भारतीय भुदलाविषयी...

🔰भारतीय लष्कराचा पायदळ विभाग म्हणजेच भारतीय भुदल हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. दलाची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली.

🔰दलाची संरचना: तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे सात कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो.

🔰भुदलाची जबाबदारी: भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे

Archive

Contact Form

Send