चालू घडामोडी : ०७ जून २०२० (Current Affairs 07 June 2020)
मधूला प्रतिष्ठेचा जेम्स वॅट पुरस्कार
बिहारच्या मधू माधवीला प्रतिष्ठेचा जेम्स वॅट पुरस्कार जाहीर झाला. ‘एनर्जी’ या लंडनमधील प्रसिद्ध संशाेधन मासिकातील प्रकाशित ‘२१ व्या शतकातील काेळसा, वातावरण बदल अाणि अनिश्चितता’ या लेखासाठी हा पुरस्कार मिळाला. अाॅक्टाेबरनंतर त्याचे वितरण हाेईल.
तीन नव्या कोळसा खाणींचे उद्घाटन
बिहारच्या मधू माधवीला प्रतिष्ठेचा जेम्स वॅट पुरस्कार जाहीर झाला. ‘एनर्जी’ या लंडनमधील प्रसिद्ध संशाेधन मासिकातील प्रकाशित ‘२१ व्या शतकातील काेळसा, वातावरण बदल अाणि अनिश्चितता’ या लेखासाठी हा पुरस्कार मिळाला. अाॅक्टाेबरनंतर त्याचे वितरण हाेईल.
तीन नव्या कोळसा खाणींचे उद्घाटन
- कोल इंडियाची उपशाखा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आपल्या तीन नव्या खाणी आज सुरू केल्या.
- या तिन्ही खाणींची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता, 2.9 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या तिन्ही खाणींमध्ये कंपनी, एकूण 849 कोटी रुपयांचे भांडवल गुंतविणार असून या खाणींमधून 647 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.
- वेस्टर्न कोलफिल्ड्चे, आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत, 75 मेट्रिक टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे. या खाणी सुरु केल्यास उद्दिष्टाचा मैलाचा दगड गाठण्यात निश्चितच मदत होईल आणि कोल इंडिया ला वित्तीय वर्ष 2023-24 पर्यंत 1 अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. असे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
- उद्घाटन तीन खाणींपैकी, आदासा ही महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात आहे. सारडा ही कन्हान भागात आणि धनकसा ही मध्यप्रदेशातील पेंच भागात आहे. आदासा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता, 1.5 मेट्रिक टन इतकी आहे आणि सारडा तसेच धनकासा खाणींची वार्षिक क्षमता अनुक्रमे 0.4 आणि 1 मेट्रिक टन इतकी आहे.
अक्षय कुमार ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी
- फोर्ब्स मासिकानं त्यांची जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेंटीची यादी जाहीर केली. मागच्या वर्षीप्रमाणं यंदाही अक्षयनं पहिल्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
- फोर्ब्सनं नुकतीच जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. यात जून 2019 ते मे 2020 या काळातील जगातल्या पहिल्या 100 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात एकमेव भारतीय सेलिब्रेटी अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत अक्षय कुमार USD 48.5 मिलियन म्हणजे भारतीय 366 कोटींच्या कमाईसह 52 व्या क्रमांकावर आहे. तर कायली जेनर USD 590 मिलियन म्हणजे भारतीय 4,453 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे.
- अक्षय कुमारचा मागच्या वर्षीही या यादीत समावेश होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत अक्षय जवळपास 19 अंकांनी मागे गेला आहे. मागच्या वर्षीची अक्षयची कमाई USD 65 मिलियन म्हणजे भारतीय 490 कोटी एवढी होती. मागच्या वर्षी अक्षय कुमार 33 व्या स्थानावर म्हणजे पहिल्या 50 श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये होता. मात्र यंदा तो 52 व्या क्रमांकावर आहे. या यादीत टॉप 10 मध्ये कायली जेनर, कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.
महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासंदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ :
- जैव साखळी आणि शाश्वतता मावी आयुष्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. रस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या आणि शिक्षणाच्या गरज लक्षात घेता, दिनांक 5 जून 2020 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “महामार्गावर मनुष्य आणि प्राण्यांचे मृत्यू रोखणे” याच्या संदर्भातल्या राष्ट्रीय जागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
- ठळक बाबी : संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. भारतात वर्षाला सुमारे पाच लक्ष रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1.5 लक्ष मृत्यू होतात. येत्या 31 मार्चपर्यंत हे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
- सुमारे पाच हजार अपघातप्रवण ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अपघातप्रवण भागांसाठी अल्प आणि दीर्घ कालीन कायमस्वरूपी उपाययोजनासाठी मानक संचालन पद्धती आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नव्याने निश्चित केलेल्या 1739 अपघातप्रवण ठिकाणी तात्पुरत्या तर नव्याने निश्चित केलेल्या अशा 840 ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहे.
- राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्रांसाठी रस्ते सुरक्षा उपाय अधोरेखित करण्यात आले असून, मोडकळीला आलेल्या आणि अरुंद पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, रस्ते सुरक्षा तपासणी, असुरक्षित रस्त्यावरचे अपघाती मृत्यू कमी करणे, महामार्ग गस्त आणि बांधकामा दरम्यानची सुरक्षा यांचा यात समावेश आहे.
- रस्ते बांधकाम तसेच विद्युत, दूरसंवाद यासह इतर पायाभूत वाहिन्यांसाठी काम करताना वन्यजीवांची हानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी देहरादून इथल्या भारतीय वन्यजीव संस्थेने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण स्नेही उपायांचा अवलंब करण्याच्या सूचना सर्व संस्थांना करण्यात आल्या आहेत.


