चालू घडामोडी : ३१ डिसेंबर २०१९

📗  ग्रँडमास्टर कोनेरू हंपी: रॅपिड बुद्धिबळ प्रकारात महिला विश्वविजेती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी ह्या रॅपिड बुद्धिबळ प्रकारात महिला विश्वविजेती ठरल्या आहेत.

रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या अंतिम सामन्यात हंपी ह्यांनी चीनच्या ली तिंगजी हिला पराभूत केले.

तुर्कस्थानच्या एकटेरिना अतालिक हिला कांस्यपदक मिळाले.

2017 साली खुल्या गटात विश्वनाथन आनंदने जेतेपद संपादन केल्यानंतर असा पराक्रम गाजवणारी कोनेरू हंपी ही केवळ दुसरी भारतीय आहे.

पुरूषांचे रॅपिड विश्वविजेतेपद जगात पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या बुद्धिबळपटूने पटकावले आहे.

🌺🌺बिपिन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सरकारकडून घोषणा🌺🌺

🔰कद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली.

🔰भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. बिपिन रावत उद्या लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली. सीडीएस फोर स्टार जनरल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती.

🔰सीडीएस म्हणजे काय?

🔰भदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे सीडीएस प्रमुख सल्लागार असणार आहेत. भारतासमोर असणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेंस स्टाफची(सीडीएस) असणार आहे.

🔰काय असेल सीडीएसवर जबाबदारी ?

🔰तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये सीडीएसची महत्वाची भूमिका असेल. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते अद्याप निश्चित झालेले नाही.

🔰तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या वेतना इतकाच पगार सीडीएसला दिला जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली. सध्याच्या रचनेत लष्करप्रमुख बिपिन रावत हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी आहेत.

🔰सीडीएस नियुक्तीची पहिली मागणी कधी झाली?

🔰१९९९ साली कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या समितीने सर्वप्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. कारगिल युद्ध घडले त्यावेळी सुरक्षेमध्ये नेमक्या काय त्रुटी राहिल्यात, पुढच्यावेळी काय सुधारण्या कराव्या लागतील त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

🌺🌺ज. शं. आपटे यांचे निधन🌺🌺

🔰लोकसंख्याशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि लेखक जनार्दन शंकर आपटे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

🔰फमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये चाळीस वर्षांहून अधिक काळ आपटे सक्रिय होते.

🔰मबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून समाजशास्त्र विषयामध्ये पदवी संपादन केली.

🔰'सलाम व्हिएतनाम' या त्यांच्या पुस्तकाने लोकप्रियता मिळवली.

🔰आपटे यांनी डॉ. नूरजहाँ साफिया नियाझ यांच्यासमवेत मुंबईतील मुस्लीम स्त्रीची घुसमट व्यक्त करणारे 'मोकळ्या श्वासाच्या शोधात' या पुस्तकाचे लेखन केले.

✅आपटेंची प्रसिद्ध पुस्तके

🔰'आवाबाई',
🔰'कुटुंब नियोजन कार्याची ६० वर्षे'
🔰'महाराष्ट्राची लोकसंख्या - नियोजन आणि विकास'.

🔰आपटे यांनी पुष्पा रोडे यांच्यासमवेत 'भारतातील महिला विकासाची वाटचाल' या पुस्तकाच्या माध्यमातून महिला विकासाचा वेध घेतला. प्रसिद्ध रक्तरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत आपटे हे त्यांचे पुत्र होत.

🌺जगसुंदरी 2019: टोनी अ‍ॅन सिंह (जमैका)🌺

🔰लडन (ब्रिटन) या शहरात झालेल्या ‘जगसुंदरी 2019’ (मिस वर्ल्ड) स्पर्धेत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंह हिने जगसुंदरीचा किताब पटकावला आहे.

🔰गतवर्षीची विजेती मेक्सिकोची व्हॅनेसा पॉन्स द लिऑन हिने तिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवला.

🔰या सौंदर्यस्पर्धेत फ्रान्सची ओफेली मेझिनो ही द्वितीय क्रमांकावर तर भारताची सुमन राव तृतीय क्रमांकावर राहिली.

🔰जमैकाची 23 वर्षीय टोनी अ‍ॅन सिंह ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत महिला अभ्यास व मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे.

🔰टोनी सिंह ही जमैकाची चौथी विजेती आहे; यापूर्वी जमैकाला 1963, 1976, 1993 या वर्षी विजेतेपद मिळाले होते.

🌺जगसुंदरी स्पर्धा🌺

🔰जगसुंदरी (मिस वर्ल्ड) ही सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन लंडनमधली मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन ही संस्था करते.

🔰तयाची स्थापना 1951 साली एरिक मॉर्ले ह्यांनी केली होती.

🔰‘ब्युटी विथ ए पर्पज’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.

🔰ही स्पर्धा ‘विश्वसुंदरी’ (मिस युनिव्हर्स), ‘आंतरराष्ट्रीय सुंदरी’ (मिस इंटरनॅशनल) आणि ‘भू-सुंदरी’ (मिस अर्थ) या प्रमुख जागतिक सौंदर्यस्पर्धांपैकी एक आहे. किकी हॅकनसन (स्वीडन) ही पहिली ‘जगसुंदरी 1951’ आहे.

🌺रोहतंग खिंडीतील बोगद्यास वाजपेयी यांचे नाव🌺
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔰हिमाचल प्रदेशातील रोहतंग खिंडीच्या खालून जाणाऱ्या बोगद्यास  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

🔰या बोगद्याला 4000 कोटी रुपये खर्च आला असून त्याचे काम 2020 पर्यंत पूर्ण होणार आहे.

🔰हा बोगदा तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय वाजपेयी पंतप्रधान असताना 2000 मध्ये घेण्यात आला होता.

🔰रोहतंग या खिंडी खालून हा बोगदा काढण्यात आला आहे.

🔰रोहतंग खिंडीच्या खालून जाणारा  8.8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा 3000 मीटर उंचीवर बनवलेला सर्वात मोठा बोगदा आहे.

🔰बोगद्यामुळे मनाली ते लेह यांच्यातील अंतर 46 कि.मीने कमी झाले आहे.


Archive

Contact Form

Send