दररोज जनरल नॉलेज क्रमांक २८
जनरल नॉलेज
Q.1) कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
उत्तर :- B) म्यानमार
स्पष्टीकरण: भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे कलादन प्रकल्प सुरू केला आहे. कलादन प्रकल्प म्यानमारमधील सिट्टवे बंदराला भारत-म्यानमार सीमेशी जोडते. जळमार्गे मालवाहतुकीसाठी बहुउद्देशीय व्यासपीठ तयार करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला आहे.
Q.2) ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?
A) भारत आणि म्यानमार
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड
उत्तर :- A) भारत आणि म्यानमार
स्पष्टीकरण: ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या बंडखोर गटांच्या म्यानमारच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि म्यानमार ऑपरेशन सनराइझ नावाने एक संयुक्त मोहीम राबववित आहे.
Q.3) लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
A) गिरीराज सिंग
B) ओम बिर्ला
C) स्मृती ईरानी
D) यापैकी कोणीच नाही
उत्तर :- B) ओम बिर्ला
स्पष्टीकरण: ओम बिर्ला यांची लोकसभा सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून ते संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
Q.3) लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
A) गिरीराज सिंग
B) ओम बिर्ला
C) स्मृती ईरानी
D) यापैकी कोणीच नाही
उत्तर :- B) ओम बिर्ला
स्पष्टीकरण: ओम बिर्ला यांची लोकसभा सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून ते संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.