दररोज जनरल नॉलेज क्रमांक २७
जनरल नॉलेज
Q.1) ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ तीन मुस्लिमबहुल राष्ट्रांकडून भारतात आलेल्या अल्पसंख्यकांना भारतीय राष्ट्रीयत्व देईल. कोणता शेजारी देश यात नाही?
A) श्रीलंका
B) पाकिस्तान
C) अफगाणिस्तान
D) बांग्लादेश
उत्तर : A) श्रीलंका
स्पष्टीकरण : लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार
A) श्रीलंका
B) पाकिस्तान
C) अफगाणिस्तान
D) बांग्लादेश
उत्तर : A) श्रीलंका
स्पष्टीकरण : लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी ‘नागरिकत्व कायदा-1955’ मध्ये बदल करण्यात येणार
Q.2)नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ नुसार, भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी कोणत्या तारखेआधी व्यक्ती आलेली असावी?
A) 31 डिसेंबर 2014
B) 1 जानेवारी 2016
C) 31 मार्च 1971
D) 12 नोव्हेंबर 1985
उत्तर : A) 31 डिसेंबर 2014
स्पष्टीकरण : लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2019’ संमत करण्यात आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून दि. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.
Q.3) भारतीय नागरिकत्वाशी संबंधित अनुच्छेद घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे?
A) भाग पहिला
B) भाग दुसरा
C) भाग तिसरा
D) भाग चौथा
उत्तर : B) भाग दुसरा
स्पष्टीकरण : भारतीय घटनेचा भाग दुसरा (अनुच्छेद 5-11) भारताच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे.
Q.4) लोकसभेने अलीकडेच ‘124 वी घटनादुरुस्ती विधेयक-2019’ संमत केले. 124वी दुरुस्ती कश्यासंदर्भात आहे?
A) नागरिकत्व
B) आरक्षण
C) RBIच्या गव्हर्नरचे अधिकार
D) यापैकी नाही
उत्तर : B) आरक्षण
स्पष्टीकरण : लोकसभेत ‘124 वी घटनादुरुस्ती विधेयक-2019’ याला मंजुरी देण्यात आली आहे. सवर्णांना आरक्षण देण्यासाठी भारतीय घटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल केला जाणार आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण व सरकारी नोकर्यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. प्रस्तावित सवर्ण आरक्षणाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयांपेक्षा कमी असावे; 5 हेक्टरपेक्षा कमी शेती असावी; स्वमालकीचे घर असल्यास 1000 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचे असावे; महापालिका क्षेत्राच्या बाहेर भूखंड असल्यास 209 यार्डापेक्षा कमी क्षेत्रफळाचा असावा.
Q.5) कोणत्या शहरात ‘खेलो इंडिया युथ गेम्स’चे आयोजन केले गेले?
A) पुणे
B) हैदराबाद
C) दिल्ली
D) मुंबई
उत्तर : A) पुणे
स्पष्टीकरण : दि. 9 जानेवारी 2019 पासून महाराष्ट्र राज्यात पुणे शहरात ‘खेलो इंडिया’ या क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड तसेच राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन केले गेले. देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणाऱ्या, 12 दिवस रंगणाऱ्या या क्रिडा महोत्सवात 36 राज्यांमधील 6000 खेळाडू सहभागी होणार आहेत. या क्रिडा महोत्सवात 18 क्रिडाप्रकारांचा समावेश आहे.
Q.6) कोण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री पदी नियुक्त होणार्या दुसर्या भारतीय महिला ठरल्या आहेत?
A) कौशिक बसू
B) व्ही. के. आर. व्ही. राव
C) गीता गोपीनाथ
D) राम गोपाल
उत्तर : C) गीता गोपीनाथ
स्पष्टीकरण : गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund -IMF) मुख्य अर्थतज्ञपदी रूजू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होणार्या गीता गोपीनाथ या प्रथम भारतीय महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद यापूर्वी रघुराम राजन यांनी बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
Q.7) ‘रायसिना संवाद’ हे भारतात आयोजित केले जाणारे वार्षिक ....... आहे?
A) वैश्विक सुरक्षा मंच
B) जागतिक उपासमार निर्मूलन परिषद
C) भू-राजकीय आणि भू-धोरणात्मक परिषद
D) समुद्री जीवन बचाव परिषद
उत्तर : C) भू-राजकीय आणि भू-धोरणात्मक परिषद
स्पष्टीकरण : नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग हे भारताच्या दौर्यावर आले आहेत. यानिमित्त दि. 8 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची चौथी बैठक पार पडली. "ए वर्ल्ड रिऑर्डर: न्यू जियोमेट्रीज; फ्लुईड पार्टनरशिप्स; अनसर्टेन आऊटकम्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला. हा कार्यक्रम भारताची प्रमुख वार्षिक भू-राजकीय आणि भू-धोरणात्मक परिषद आहे.
Q.8) RBIने 8 जानेवारीला डेबिट आणि क्रेडिट कार्डसह विविध कार्डच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन संदर्भात मार्गदर्शके जाहीर केली. टोकनायझेशन म्हणजे काय?
A) सुरक्षित देयके प्रणाली
B) कार्डच्या देयकांवर कोणताही अतिरिक्त खर्च नाही
C) कार्डद्वारे कर्ज
D) यापैकी नाही
उत्तर : A) सुरक्षित देयके प्रणाली
स्पष्टीकरण : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डसारख्या विविध कार्डद्वारे होणार्या व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामधील टोकन प्रणालीच्या संदर्भात (tokenisation) मार्गदर्शके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. देयके प्रणालीच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने असणारी ‘टोकनायझेशन’ प्रक्रिया म्हणजे कार्डचा मूळ तपशील वापरण्याच्या जागी प्रदान करण्यात येणारा एक विशिष्ट पर्यायी कोड, ज्याला आपण 'टोकन' म्हणतो.
Q. 9) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरासाठी गंगाजल प्रकल्पाचा शुभारंभ केला?
A) दिल्ली
B) आग्रा
C) इंदौर
D) नाशिक
उत्तर : B) आग्रा
स्पष्टीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 9 जानेवारी 2019 रोजी उत्तरप्रदेशाच्या आग्रा शहरात ‘गंगाजल’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ‘गंगाजल’ प्रकल्पासाठी 2880 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या प्रकल्पामार्फत आग्रा शहराला चांगल्याप्रकारे आणि अधिक आश्वासक पाणी पुरवठा करण्यासाठी मदत होणार.
Q.10) ‘वैश्विक एव्हिएशन शिखर परिषद 2019’ याची संकल्पना काय आहे?
A) फ्लाय अनकंडिशनली
B) फ्लाइंग विदाउट बॅरियर्स
C) फ्लाइंग फॉर ऑल
D) फ्लाय एव्रीवन
उत्तर : C) फ्लाइंग फॉर ऑल
स्पष्टीकरण : भारताच्या मुंबई शहरात प्रथमच ‘वैश्विक एव्हिएशन शिखर परिषद 2019’ भरविण्यात येणार आहे. दि. 15 जानेवारी 2019 रोजी 'फ्लाइंग फॉर ऑल' या संकल्पनेखाली या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार. FICCI यांच्यासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने (ICAO) शिखर परिषदेला पाठिंबा दिला आहे.
वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात
महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा,
जिथे तुम्हाला सर्वात
जास्त परतफेड मिळेल.Thought By MPSC GUIDE
