चालू घडामोडी १५ डिसेंबर २०१८


चालू घडामोडी १५ डिसेंबर २०१८


हवामान बदल प्रदर्शन मानांकन यादीत भारत 11व्या स्थानी

  • ‘जर्मनवॉच’ अहवालात प्रसिद्ध केलेल्या ‘हवामान बदल प्रदर्शन मानांकन यादी 2019’ मध्ये भारत 11 व्या क्रमांकावर आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन स्थानांनी पुढे आले आहे.
  • पर्यावरणविषयक कृतींमध्ये भारत जागतिक नेत्यांपैकी एक बनला आहे. विशेषत: भारताने अक्षय ऊर्जा श्रेणीमध्ये उत्तम कार्यप्रदर्शन दाखवले आहे आणि मध्यम प्रदर्शकांच्या गटात सामील झाले आहे. उत्सर्जन श्रेणीमध्ये भारतामधील दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन तुलनेने कमी आहे.
  • पवन ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर भारत चौथ्या स्थानी आहे, तर सौर ऊर्जा स्थापित क्षमतेच्या बाबतीत सहावा आणि एकूणच अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये पाचव्या स्थानी आहे.
अन्य ठळक बाबी -
  • वैश्विक कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढले आहे.
  • यादीत शीर्ष तीन स्थान रिकामी आहेत. चौथ्या स्थानी एकत्रितपणे स्वीडन आणि मोरोक्को आहेत. तर अमेरिका आणि सौदी अरब या देशांचा शेवटी क्रम लागतो आहे.
  • अभ्यास केलेल्या 56 पैकी 40 देशांमध्ये सन 2011 ते सन 2016 या काळात उत्सर्जन कमी झाले आहे.
  • पहिल्यांदाच मध्यम प्रदर्शक देशांच्या गटात चीनने स्थान मिळवले आहे. चीन यादीत 33 व्या स्थानी आहे.

सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

  • साहित्य क्षेत्रात मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या सालाचा म्हणजेच 2018 चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे. यंदाचा हा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
अमिताव घोष यांच्याविषयी -
  • अमिताव घोष यांच्या 'द शॅडो लाइन्स' या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा दोन्ही प्रकारांत अमिताव घोष यांनी विपुल लेखन केले आहे.
  • अमिताव घोष यांचा जन्म कोलकातामध्ये 11 जुलै 1956 साली एका बंगाली कुटुंबात झाला. घोष यांनी आपल्या कारकिर्दीचे सुरुवात इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रामधून केली. ते हार्वर्ड विद्यापीठाचे गेस्ट लेक्चररदेखील होते. घोष यांच्या द सर्कल ऑफ रीजन, द श्याडो लाइन्स, द कलकत्ता क्रोमोजोम, द ग्लास पॅलेस, द हंगरी टाइड या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (2007) पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्काराविषयी -
  • हा भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. 11 लाख रूपये रोख, प्रमाणपत्र आणि देवीसरस्वती यांची कांस्य प्रतिकृती असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार 1961 सालापासून दिला जात आहे. हा पुरस्कार भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे 22 अधिकृत भाषांपैकी कोणत्याही भाषेमधील लेखणासाठी कोणत्याही भारतीयाला बहाल केला जातो.
  • ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीकडून पुरस्कारासाठी निवड केली जाते. आतापर्यंत हिंदी भाषेत 11, कन्नड भाषेत 8, बंगाली भाषेत 6 तर गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू भाषेत 4 ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत.

अशोक गेहलोत: राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

  • राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस पक्षाचे अशोक गहलोत यांची पुनर्निवड केली जाणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे.
  • अशोक गहलोत हे राजस्थानातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक 2018 निकाल -
  • राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केली गेलीत.

काँग्रेस भाजप अन्य
99
73 29


  • भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो. ही निवडणूक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. विधानसभा निवडणूका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात

‘इको निवास संहिता-2018’ प्रसिद्ध

  • विद्युत मंत्रालयाने निवासी इमारतींसाठी ‘इको निवास संहिता-2018’ या ऊर्जा संवर्धन इमारत कोडचे (ECBC-R) अनावरण केले आहे.
  • दि. 14 डिसेंबर 2018 रोजी ‘राष्‍ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे नियम प्रसिद्ध करण्यात आलेत.
  • नियमांना लागू करण्यामुळे निवासी क्षेत्रांमध्ये वि‍जेची बचत होण्याची अपेक्षा आहे. याचा उद्देश असा आहे की अश्या अपार्टमेंट आणि वसाहतींची रचना करणे आणि त्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, ज्यामुळे त्यामध्ये राहणार्‍या लोकांना विजेच्या बचतीचे लाभ दिले जाऊ शकते. व्‍यवसायिक इमारतींसाठी आधीपासूनच ECBC आहेत.

ठळक बाबी -
  • नियमांना सूचीबद्ध मानदंडांना हवामान बदल आणि ऊर्जा संदर्भात आंकड्यांचा वापर करीत अनेक मानदंडांच्या आधारावर विकसित केले गेले आहे.
  • यादृष्टीने इमारतीच्या आतल्या भागाला कोरड्या, गरम आणि थंड ठेवणार्‍या इमारतीच्या बाह्य भागाच्या पायासाठी किमान मानक निश्चित केले गेले आहेत.
  • हे नियम लागू केल्यापासून 2030 सालापर्यंत 125 अब्ज यूनिट एवढी विजेची बचत होण्याचा अंदाज आहे, जे जवळपास 100 दशलक्ष टन कॉर्बन डायऑक्‍साइडच्या उत्‍सर्जना इतके आहे.
  • एका अंदाजानुसार इमारती क्षेत्रामध्ये विजेची मागणी जी 2018 आली 350 अब्ज यूनिटच्या जवळपास आहे, ती 2030 सालापर्यंत जवळपास 1000 अब्ज यूनिट पर्यंत पोहचणार.


Archive

Contact Form

Send