दररोज जनरल नॉलेज क्रमांक २५
जनरल नॉलेज
Q.1) 27 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कश्यासंबंधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला?
A) फिक्सिंग
B) सट्टा
C) वय
D) यापैकी नाही
उत्तर : C) वय
स्पष्टीकरण : वयासंबंधी फसवणुक केल्यास खेळाडूला एका वर्षाच्या जागी आता दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याच्या नव्या निर्णयानुसार वयासंबंधी फसवणुक करणार्या क्रिकेटपटूवर घातल्या जाणार्या बंदीचा कालावधी दुप्पट करण्यात आला आहे. हा निर्णय 2018-19 सालच्या हंगामापासून लागू करण्यात आला आहे.
A) फिक्सिंग
B) सट्टा
C) वय
D) यापैकी नाही
उत्तर : C) वय
स्पष्टीकरण : वयासंबंधी फसवणुक केल्यास खेळाडूला एका वर्षाच्या जागी आता दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याच्या नव्या निर्णयानुसार वयासंबंधी फसवणुक करणार्या क्रिकेटपटूवर घातल्या जाणार्या बंदीचा कालावधी दुप्पट करण्यात आला आहे. हा निर्णय 2018-19 सालच्या हंगामापासून लागू करण्यात आला आहे.
Q.2) भारत सरकारचा "हौसला 2018" हा कार्यक्रम समाजाच्या कोणत्या वर्गांसाठी समर्पित आहे?
A) मध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत मुला-मुलींसाठी
B) दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी
C) बाल संगोपन संस्थांच्या मुला-मुलींसाठी
D) यापैकी नाही
उत्तर : C) बाल संगोपन संस्थांच्या मुला-मुलींसाठी
स्पष्टीकरण : बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत "हौसला 2018" शीर्षकाखाली एका राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात चित्रकला स्पर्धा, मैदानी खेळ, फुटबॉल, बुद्धिबळ आणि भाषण, लेखन यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये 18 राज्यांमधून आलेल्या 600 हून अधिक मुलांचा सहभाग आहे.
Q.3) बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी कोणत्या मंत्रालयाच्यावतीने आयोजित "हौसला 2018" हा एक राष्ट्रीय महोत्सव आहे?
A) गृह मंत्रालय
B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
C) महिला व बाल विकास मंत्रालय
D) (B) आणि (C)
उत्तर : C) महिला व बाल विकास मंत्रालय
स्पष्टीकरण : बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत "हौसला 2018" शीर्षकाखाली एका राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
Q.4) भारतात 25 डिसेंबरला ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यात आला. हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ आहे?
A) अटल बिहारी वाजपेयी
B) पंडित मदन मोहन मालविया
C) राजेंद्र प्रसाद
D) A आणि B
उत्तर : D) A आणि B
स्पष्टीकरण : भारत सरकारच्या नेतृत्वात देशात 25 डिसेंबरला ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उत्तरप्रदेश राज्य शासनाने शिक्षा भोगलेल्या मात्र दंड भरू न शकणार्या 93 कैदींना सोडण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून यावर्षापासून भारतरत्न वाजपेयी आणि (मृत) पंडित मदन मोहन मालविया यांचा सन्मान करण्यासाठी ‘सुशासन दिवस’ ची घोषणा ‘ई-गवर्नेंसच्या माध्यमातून सुशासन’ च्या आधारावर केली गेली.
Q.5) कोणत्या उत्तर आफ्रिकेतील देशाकडून UAE च्या एमिरेट्स विमानसेवेवर बंदी घालण्यात आली?
A) अल्जेरिया
B) इजिप्त
C) लिबिया
D) ट्यूनिशीया
उत्तर : D) ट्यूनिशीया
स्पष्टीकरण : ट्यूनिशीयाच्या सरकारकडून संयुक्त अरब अमीराती (UAE) च्या एमिरेट्स विमानसेवेवर देशामध्ये विमान उतरविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या विमानसेवेकडून ट्यूनीशियाच्या (उत्तर आफ्रिकेच्या देशांमधील) महिलांच्या बाबतीत भेदभाव करण्याच्या वारंवार होणार्या तक्रारांच्या परिणामस्वरूप आणि आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेतला गेला.
Q.6) ढाकामधील ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेचा विजेता कोण ठरला?
A) बांग्लादेश
B) भारत
C) नेपाळ
D) श्रीलंका
उत्तर : A) बांग्लादेश
स्पष्टीकरण : ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेच्या अंतिममध्ये बांग्लादेशने भारताचा पराभव केला आहे.
Q.7) _______ ने उत्तरेकडील किरकुक शहरापासून ते टर्कीच्या सेहानमधील भूमध्यसागरी बंदरापर्यंत 220 मैल लांब पाइपलाइन तयार करण्याची योजना आखली आहे.
A) इराण
B) कतार
C) इराक
D) व्हेनेझुएला
उत्तर : C) इराक
स्पष्टीकरण : इराकने उत्तरेकडील किरकुक शहरापासून ते टर्कीच्या सेहानमधील भूमध्यसागरी बंदरापर्यंत 220 मैल लांब पाइपलाइन तयार करण्याची योजना आखली आहे. ही पाइपलाइन दिवसाला 1 दशलक्ष बॅरल तेल वाहून नेणारी असणार आहे. तसेच पम्पिंग स्थानके, हौद यांना तेल पुरविण्यासाठी 190 मैल लांब पाइपलाइन आणि अन्य सेवा प्रस्थापित करण्याचा या प्रकल्पात समावेश असणार आहे.
Q.8) ‘2017 गालीम झोरिल्गापोव्ह बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीयांनी 5 पदकांची कमाई केली. ही स्पर्धा कोणत्या देशात खेळली गेली?
A) किरगिझस्तान
B) कझाकस्तान
C) ताजिकिस्तान
D) तुर्कमेनिस्तान
उत्तर : B) कझाकस्तान.
स्पष्टीकरण : कझाकस्तानच्या कारागंडामध्ये आयोजित ‘2017 गालीम झोरिल्गापोव्ह बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीयांनी 3 सुवर्णासह प्रत्येकी एक रजत आणि कांस्यपदकांची कमाई केली आहे. के. श्याम कुमार (49 किलो), नमन तन्वर (91 किलो), सतीश कुमार (+91 किलो) हे स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आहेत. 19 वर्षीय नमन तन्वर हा स्पर्धेचा सर्वोत्तम मुष्टियोद्धा ठरला.
Q. 9) डिसेंबर 2017 मधील ASSOCHAM च्या अहवालानुसार, भारताचा आर्थिक वृद्धीदर पुढच्या वर्षी _____ ला गाठू शकतो आणि महागाई दर 4-4.5% या दरम्यान असू शकतो.
A) 6.0%
B) 6.3%
C) 7%
D) 8%
उत्तर : C) 7%
स्पष्टीकरण : उद्योग व वाणिज्य संस्था ASSOCHAM च्या अहवालानुसार, भारताचा आर्थिक वृद्धीदर पुढच्या वर्षी 7% ला गाठू शकतो आणि महागाई दर 4-4.5% या दरम्यान असू शकतो. देशाची अर्थव्यवस्थेत जानेवारी-मार्च तिमाहीत उत्तम पुनरुद्धार असू शकते आणि GDP वृद्धीदर 2018 साली जवळपास 7.5% असू शकतो.
Q.10) डिसेंबर 2017 मध्ये भारताच्या विमा नियामक IRDAI ने _________ याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत, ज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
A) आंतरराष्ट्रीय विमा सेवा केंद्र (IISC)
B) भारतीय परराष्ट्र विमा संघटना (FIOI)
C) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO)
D) परराष्ट्र विमा कार्यालय (FIO)
उत्तर : C) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO)
स्पष्टीकरण : भारताच्या विमा नियामक IRDAI ने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालये (IIO) याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत, ज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. 21 डिसेंबरला जाहीर केलेल्या ‘भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालयाची नोंदणी आणि कार्ये) मार्गदर्शक तत्त्वे-2017’ अन्वये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO) म्हणजे थेट विमा व्यवसाय किंवा पुनर्विमा व्यवसाय चालविण्यासाठी IRDAI कडून परवानगी असलेले एक शाखा कार्यालय होय.
वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात
महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा,
जिथे तुम्हाला सर्वात
जास्त परतफेड मिळेल.Thought By MPSC GUIDE
