चालू घडामोडी : ०९ ऑक्टोंबर २०१८

राष्ट्रीय

झारखंड: 49व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भागीदार राज्य
  • 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या 49व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भागीदार राज्य म्हणून झारखंडची निवड करण्यात आली आहे.
  • हा महोत्सव माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित केला जातो. याशिवाय येत्या जानेवारी-2019 या महिन्यात झारखंडच्या दोन शहरांमध्ये भारतीय पॅनोरामा अंतर्गत झारखंड चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 
2022 सालापर्यंत भारत जगातला 11 व्या क्रमांकाचा श्रीमंत देश बनणार: BCG
  • बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) याच्या अहवालानुसार, 2022 सालापर्यंत भारताची वैयक्तिक मालमत्ता $20 लक्ष कोटी इतक्या रकमेपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तो स्वित्झर्लंड, हाँगकाँग, नेदरलँड आणि तैवान यांना मागे टाकत जगातला 11 व्या क्रमांकाचा श्रीमंत देश बनण्याचा अंदाज आहे.
  • अहवालानुसार, वर्तमानात भारताची वैयक्तिक मालमत्ता सुमारे $3 लक्ष कोटी (ट्रिलियन) इतकी आहे, जी 2012 सालापासून 12% CAGR इतकी वाढलेली आहे आणि 2018 सालापासून सन 2022 पर्यंत 13% CAGR इतकी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चीननंतर दोन अंकी CAGR वृद्धी करणारा भारत हा एकमेव देश ठरणार आहे.
  • अहवालानुसार, समृद्ध आणि उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या संख्येनुसार आशियाई बाजारपेठेत भारताचा सध्या पाचवा क्रमांक आहे. 2017 साली अशा व्यक्तींची एकूण संख्या 4.13 लक्ष एवढी होती.
  • भारतात उच्च वैयक्तिक संपत्ती असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढते आहे. अहवालानुसार, समृद्ध ($1 दशलक्ष पर्यंत संपत्ती असलेले) श्रेणीमध्ये भारतात 320,000 लोक आहेत. तर हाय नेट वर्थ इंडिव्हीज्युयल (HNWI) श्रेणीत ($1 दशलक्ष ते $20 दशलक्ष पर्यंत संपत्ती असलेले) 87,000 लोक आणि $20 दशलक्षपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हीज्युयल (UHNWI) श्रेणीमध्ये 4,000 लोक आहेत.

आंतरराष्ट्रीय

जागतिक टपाल दिन: 9 ऑक्टोबर
  • दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन पाळला जातो. यावर्षी “इनोव्हेशन, इंटीग्रेशन अँड इंक्लुजन” या विषयाखाली हा दिन पाळला गेला आहे.
  • लोकांच्या दैनंदिन जीवनात टपाल क्षेत्राची भूमिका आणि देशांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातले योगदान याबद्दल जागृती निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे.
  • 9 ऑक्टोबर 1874 रोजी यूनिवर्सल पोस्टल युनियनची स्थापना बर्न (स्वित्झर्लंड) येथे केली गेली. या घटनेच्या स्मृतीत 1969 साली 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले.
संबंध सुधारण्यासाठी भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात सामंजस्य करार
  • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 7-9 ऑक्टोबर 2018 या कालावधीत ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमोन यांच्या निमंत्रणावरून ताजिकिस्तानला भेट दिली. या भेटीदरम्यान हे करार झालेत.
  • दोन्ही देशांमध्ये 8 करार केले गेलेत, ते म्हणजे -
    • अंतराळ तंत्रज्ञानाचा शांततेसाठी वापर करण्यासंबंधी क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार
    • आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
    • अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
    • युवा कल्याण बाबींमध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार
    • कृषी संशोधन आणि शिक्षण सहकार्यासाठी सामंजस्य करार
    • युनानी मेडिसिनमध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार
    • सन 2018-2021 या काळात दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये सहकार्याचा कार्यक्रम
    • सन 2019-2023 या काळात दोन्ही देशांच्या संस्कृती मंत्रालयांमध्ये सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम
  • ताजिकिस्तान हा अफगाणिस्तान, चीन, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी वेढलेला मध्य आशियातील एक देश आहे. दुशान्बे या देशाची राजधानी असून याचे राष्ट्रीय चलन ताजिकिस्तानी सोमोनी आणि रुबले हे आहेत. ताजिकी, पर्शियन, रशियन या देशाच्या अधिकृत भाषा आहेत.  

अर्थव्यवस्था आणि बँकिंग

भारत सरकारचे ‘सोव्हेरियन गोल्ड बॉंड 2018-19’
  • भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून भारत सरकारने सोव्हेरियन गोल्ड बॉंड 2018-19 प्रस्तुत करण्याचे ठरविले आहे.
  • हे सोव्हेरियन गोल्ड बॉंड ऑक्टोबर 2018 या महिन्यापासून ते फेब्रुवारी 2019 पर्यंत दर महिन्याला व्यापारासाठी प्रस्तुत केले जातील. या करारांची बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक डाकघर तसेच भारतीय स्टॉक एक्सचेंज (NSE आणि BSE) येथे विक्री केली जाणार. 

क्रिडा

आशियाई पॅरा खेळांमध्ये भालाफेकपटू संदीप चौधरीला सुवर्णपदक
  • जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा खेळ 2018 या क्रिडास्पर्धेत भालाफेकपटू संदीप चौधरीने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.
  • पुरुषांच्या F42-44/61-64 गटात चौधरीने तिसर्‍या प्रयत्नात 60.1 मीटरची फेक नोंदवली आणि नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या प्रकाराचे श्रीलंकेच्या सम्पथ हेट्टीने रौप्य तर इराणच्या ओमिदी अलीने कांस्यपदक जिंकले.
युवा ऑलंपिकमध्ये भारोत्तोलक जेरेमी लालंरीनुंगाने सुवर्णपदक जिंकले
  • ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) येथे सुरू असलेल्या ‘युवा ऑलंपिक 2018’ या क्रिडास्पर्धेत भारतीय भारोत्तोलक जेरेमी लालंरीनुंगा ह्याने पुरुषांच्या 62 किलोग्राम गटात सुवर्णपदक जिंकले आहे. हे युवा ऑलंपिकमधले भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
  • या गटाचे रौप्यपदक टर्कीच्या टोपतास कॅनेरने तर कांस्यपदक कोलंबियाच्या विल्लर इस्टिव्हेन जोसने मिळविले.
  • शिवाय, भारताची थँगजम तबाबी देवी ही ऐतिहासिक रौप्यपदक जिंकणारी भारताची पहिली ज्युडोपटू ठरली आहे. महिलांच्या 44 किलोग्रॅम वजनगटात तिला व्हेनेझुएलाच्या मारिया गिमिनेझविरुद्ध अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
  • युवा ऑलंपिक खेळ (Youth Olympic Games -YOG) हा आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीकडून (IOC) आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय बहू-क्रिडा प्रकाराचा स्पर्धा कार्यक्रम आहे. उन्हाळा आणि हिवाळा अश्या दोन हंगामात दर चार वर्षांनंतर या खेळांचे आयोजन केले जातात. 2010 साली पहिल्यांदा उन्हाळी खेळांचे तर 2012 साली हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

व्यक्ती विशेष

अजित कुमार डोवाल: स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याचे नवे अध्यक्ष
  • राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींबद्दल पंतप्रधानांना सल्ला देणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना केली आहे.
  • गटाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित कुमार डोवाल यांच्याकडे असेल. NITI आयोगाचे उपाध्यक्ष, कॅबिनेट सचिव, तीनही संरक्षण दलांचे प्रमुख, RBI गव्हर्नर, परराष्ट्र सचिव, गृह सचिव, वित्त सचिव व संरक्षण सचिव हे गटाचे अन्य सदस्य आहेत.
  • विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी 1999 साली स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडे SPGचे अध्यक्षपद असायचे. सरकारमधील हे सर्वात वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात. मात्र, नव्या अधिसुचनेनुसार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या गटाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी SPGमध्ये 16 सदस्य होते. ज्यांची संख्या वाढवून आता 18 करण्यात आली आहे.

पुरस्कार

विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर: अर्थशास्त्र क्षेत्रातला 2018 सालचे नोबेल पारितोषिक विजेते
  • हवामानबदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर संशोधन करणारे अमेरिकेचे अर्थतज्ञ विल्यम डी. नॉर्डस आणि पॉल एम. रोमर यांना 2018 सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक दिला जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  • नॉर्डसने दीर्घकालीन मॅक्रोइकनॉमिक्स विश्लेषणात हवामानातील बदलांना एकात्मिक करण्यासाठी समाज आणि निसर्ग यामधील संवाद या विषयी संशोधन केले. 1990 साली रोमेरने एंडोजिनस ग्रोथ याचा सिद्धांत मांडला.
  • स्टॉकहोम (स्वीडन) येथील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसकडून ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ दिला जातो. 10 डिसेंबरला स्टॉकहोम येथे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येईल. पुरस्काराच्या रूपाने 90 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.35 कोटी रुपये) दोघांना विभागून दिले जाणार आहेत.
  • विल्यम नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 1970 सालापासून नॉर्डस यांनी पर्यावरणाचा अभ्यास सुरू केला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे आर्थिक नुकसान या विषयात संशोधन केले. पॉल रोमर यांनी नवीन तंत्रज्ञान शोधाचा आर्थिक विकासावर होणारे परिणाम या विषयात संशोधन केले. दोघांनी सूक्ष्म पातळीवर आर्थिक संशोधन केले आहे.
नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
  • भौतिकशास्त्ररसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस
  • शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली
  • साहित्य: स्वीडिश अकादमी
  • शांती: हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

Archive

Contact Form

Send