दररोज जनरल नॉलेज क्रमांक १२
जनरल नॉलेज
Q.1) संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी आणि नौदलासाठी P-8I प्रशिक्षण उपाययोजना आणि LICEWS यांच्या खरेदीसाठी ________ रकमेच्या करार प्रस्तावांना मंजूर केले आहे.
A) 1,420 कोटी रुपये
B) 2,420 कोटी रुपये
C) 3,420 कोटी रुपये
D) 4,420 कोटी रुपये
उत्तर : B) 2,420 कोटी रुपये
स्पष्टीकरण : संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी आणि नौदलासाठी 2,420 कोटी रुपयांच्या करार प्रस्तावांना मंजूर केले आहे. या करारांमध्ये बोइंगकडून सुमारे 1950 कोटी रुपयांनी 10 वर्षांच्या व्यापक देखरेख सेवासह P-8I प्रशिक्षण उपाययोजना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून 470 कोटी रुपयांना लो इंटेंसिटी कंल्फिक्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम (LICEWS) यांची खरेदी समाविष्ट आहे.
A) 1,420 कोटी रुपये
B) 2,420 कोटी रुपये
C) 3,420 कोटी रुपये
D) 4,420 कोटी रुपये
उत्तर : B) 2,420 कोटी रुपये
स्पष्टीकरण : संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी आणि नौदलासाठी 2,420 कोटी रुपयांच्या करार प्रस्तावांना मंजूर केले आहे. या करारांमध्ये बोइंगकडून सुमारे 1950 कोटी रुपयांनी 10 वर्षांच्या व्यापक देखरेख सेवासह P-8I प्रशिक्षण उपाययोजना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून 470 कोटी रुपयांना लो इंटेंसिटी कंल्फिक्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम (LICEWS) यांची खरेदी समाविष्ट आहे.
Q.2) कोणत्या संस्थेतर्फे भारतात प्रथम ऑनलाइन ऑन्कोलॉजी ट्यूटोरियल मालिका सुरू करण्यात आली?
A) कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र (ACTREC)
B) वोकहार्ड
C) टाटा मेमोरियल सेंटर
D) लीलावती रुग्णालय
उत्तर : C) टाटा मेमोरियल सेंटर
स्पष्टीकरण : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देशाचे प्रथम ऑनलाइन ऑन्कोलॉजी ट्यूटोरियल मालिकेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ऑन्कोलॉजी ट्यूटोरियल मालिका सुरू करण्यामागचा उद्देश्य म्हणजे, देशभरातल्या डॉक्टरांना विविध प्रकारच्या कर्करोगासंबंधी ओळख, उपाय, वेदना शमन, पुनर्वसन आणि उपचारासंदर्भात प्रशिक्षित आणि शिक्षित करणे. हा राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे आणि याला राज्य शासनांच्या सहकार्याने देशभरात टाटा मेमोरियल सेंटरकडून चालवल्या जाणार.
Q.3) भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञान मोहीम (TMIR) संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा.
I – मोहिमेसाठी रेल्वे मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, BHEL, BEL आणि EESL यांच्यात एक करार झाला.
II - यात रेल्वे मंत्रालयाला वगळता अन्य सहभागी प्रकल्पांमध्ये प्रत्येकी 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
III - अप्लाइड संशोधनासाठी निवडक रेल्वे प्रकल्पांमध्ये रेल्वे मंत्रालय 30% गुंतवणूक करणार.
A) फक्त I
B) फक्त II
C) फक्त III
D) I आणि II
उत्तर : A) फक्त I
स्पष्टीकरण : भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञान मोहीम (TMIR) याला अर्थ सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या 3 मंत्रालयांनी एक सामंजस्य करार केला आहे. हा करार रेल्वे मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) यांच्यात झाला आहे. या करारानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रकल्पांमध्ये 75-75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. अप्लाइड संशोधनासाठी निवडक रेल्वे प्रकल्पांमधील गुंतवणूक सामायिक करण्यास मार्ग मोकळा होणार. या प्रकल्पांमध्ये रेल्वे मंत्रालय 30%, मनुष्यबळ विकास मंत्रालय 25% आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग 25% गुंतवणूक करतील.
Q.4) अमेरिकाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत ___________ला देण्यात येणारी $1.15 अब्जची सुरक्षा मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
A) पाकिस्तान
B) अफगाणिस्तान
C) इराक
D) बांग्लादेश
उत्तर : A) पाकिस्तान
स्पष्टीकरण : अमेरिकाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी $1.15 अब्जची सुरक्षा मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Q.5) कोणत्या राज्य शासनाने इंग्रजी माध्यम नसलेल्या शाळांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?
A) बिहार
B) उत्तरप्रदेश
C) पंजाब
D) महाराष्ट्र
उत्तर : D) महाराष्ट्र
स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्य शासनाने इंग्रजी माध्यम नसलेल्या शाळांसाठी शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याने अश्या शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 100 मराठी शाळा नवीन अभ्यासक्रमासाठी निवडल्या जातील.
Q.6) 1998 सालापासून सलग 18 वर्षे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी राहिलेल्या वसंत डावखरे यांचे निधन झाले. ते कोणत्या पक्षाचे नेते होते?
A) शिवसेना
B) भारतीय जनता पक्ष
C) ऱाष्ट्रवादी काँग्रेस
D) काँग्रेस
उत्तर : C) ऱाष्ट्रवादी काँग्रेस
स्पष्टीकरण : ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. ठाणे जिल्ह्यातील नेते डावखरे 1992 सालापासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले गेले. 1998 साली विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सलग 18 वर्षे ते उपसभापती होते.
Q.7) सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या क्रिकेट मंडळास राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास स्विकृती दिली?
A) बिहार
B) झारखंड
C) तेलंगणा
D) आंध्रप्रदेश
उत्तर : A) बिहार
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयाने बिहार क्रिकेट मंडळ (BCA) ला रणजी करंडक आणि त्यासारख्याच अन्य राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यास स्विकृती दिली आहे. प्रधान न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 2001 साली जेव्हा बिहारपासून झारखंड नवे राज्य बनले, तेव्हा BCCI ने बिहारच्या जागी झारखंडच्या मंडळाला पूर्ण सदस्यता दिली होती.
Q.8) 1 जानेवारीपासून "ब्राइट पर्ल ऑफ क्राउन ऑफ आइस अँड स्नो’ या विषयावर आधारित 34 व्या ‘हार्बिन आंतरराष्ट्रीय बर्फ कला मेळावा’ चा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम कोणत्या देशात आयोजित केला जातो?
A) भारत
B) चीन
C) रशिया
D) कॅनडा
उत्तर : B) चीन.
स्पष्टीकरण : 1 जानेवारीपासून चीनच्या ईशान्येकडे हाईलोंगजियांग प्रांतात "ब्राइट पर्ल ऑफ क्राउन ऑफ आइस अँड स्नो’ या विषयावर आधारित 34 व्या ‘हार्बिन आंतरराष्ट्रीय बर्फ कला मेळावा’ चा शुभारंभ झाला आहे. या कार्यक्रम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. चीनमधील या बर्फाळ प्रदेशात आयोजित या कार्यक्रमात बर्फापासून तयार करण्यात येणार्या मुर्त्या आणि इतर कलाकृती प्रदर्शनास मांडल्या जातात. याशिवाय विविध खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.
Q. 9) _______ वर्षांत एकदाच असा योग येतो जेव्हा आकाशात निळा चंद्र दिसतो. 31 जानेवारीला दुसऱ्या पूर्णिमेला एक दुर्मिळ चंद्रग्रहण आढळून येणार आहे, ज्याला ‘निळा चंद्र’ देखील म्हणतात.
A) 1000 वर्ष
B) 500 वर्ष
C) 5000 वर्ष
D) 150 वर्ष
उत्तर : D) 150 वर्ष
स्पष्टीकरण : 150 वर्षांत एकदाच असा योग येतो जेव्हा आकाशात निळा चंद्र दिसतो. 31 जानेवारीला दुसऱ्या पूर्णिमेला एक दुर्मिळ चंद्रग्रहण आढळून येणार आहे, ज्याला ‘निळा चंद्र (Blue Moon)’ देखील म्हणतात. हे वर्ष 2018 चे पहिले ग्रहण आहे.
Q.10) कोणत्या शहरात 6-14 जानेवारी या काळात 26 व्या ‘जागतिक पुस्तक मेळावा’ चे आयोजन करण्यात आले?
A) बंगळुरु
B) मुंबई
C) नागपूर
D) नवी दिल्ली
उत्तर : D) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : नवी दिल्लीत 6 जानेवारी ते 14 जानेवारी 2018 या काळात 26 व्या ‘जागतिक पुस्तक मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे आयोजित हा कार्यक्रम यावर्षी ‘पर्यावरण व हवामान बदल’ या विषयावर आधारित आहे. यामध्ये जवळपास 40 देशांमधील प्रकाशकांचा सहभाग दिसून येणार आहे. भारतातून 800 हून अधिक प्रकाशक यामध्ये भाग घेणार आहेत.
विषय किती वाढवायचा,
कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं,
हे ज्याला जमतं....
तो जगातील कुठल्याही,
परिस्थीतीवर मात करु शकतो.Thought By MPSC GUIDE
