चालू घडामोडी : १८ डिसेंबर २०१७
ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू :
- 👉 हवाई दलाच्या 'सुखोई-30' प्रकारच्या 40 लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.
- 👉 पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
- 👉 मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे.
- 👉 ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन 2.5 टन असून ते ध्वनीच्या 2.8 पट वेगाने 290 किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते.
स्मिता पाटील स्मृती पुरस्कार :
- 👉 💖पहिलावहिला मानाचा 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2017'ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार 2017' अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
- 👉 16 डिसेंबर रोजी दिनानाथ नाट्यगृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 👉 कलाकारांचा उत्साह, दिग्गजांची उपस्थिती आणि सोबतीला स्मिता पाटील यांच्या असंख्य आठवणी अशा एकंदर वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बरसुद्धा उपस्थित होता.
एक्स्प्रेस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार :
- 👉 देशातील निवडक उत्कृष्ट पत्रकारांचा येत्या 20 डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभात रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड्स 2017 देऊन गौरव करण्यात येणार आहे.
- 👉 भारतीय पत्रकारितेतील हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2006 साली या पुरस्कारांची सुरुवात केली गेली.
- 👉 तसेच गेली कित्येक वर्षे या पुरस्कारांच्या माध्यमातून पत्रकारितेतील उत्कृष्ट गुणांचा सन्मान केला गेला आहे. पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी नेहमीच राजकीय आणि आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून समाजाचा पत्रकारितेवरील विश्वास वृद्धिंगत केला आहे.
भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती चांगली :
- 👉 पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली असल्याचे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीनयांनी व्यक्त केले आहे.
- मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत हे त्यांना आपल्या घरासारखेच वाटते. इंदूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नसरीन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारतातील अल्पसंख्याकाबद्दल आपले मत मांडले.
- 👉 तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही. पण तिथे धार्मिक अल्पसंख्याकाचे बळजबरीने धर्मांतरण आणि त्यांच्यावर अन्याय केले जात असल्याचे वृत्तपत्रात वाचलेले आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. भारतातील अल्पसंख्याकासमोरील सर्वच संकटे संपली हे मी म्हणणार नाही, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.
भारताचा सलग आठवा मालिका विजय :
- 👉 कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांची प्रभावी फिरकी तसेच सलामीवीर शिखर धवन (नाबाद 100) व श्रेयस अय्यरच्या (65) अर्धशतकामुळे भारताने 17 डिसेंबर रोजी निर्णायक वनडेत श्रीलंकेवर आठ विकेटनी विजय मिळवला.
- 👉 तसेच ही वनडे जिंकून बदली कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरला.
- 👉 डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये ही मालिकेतील निर्णायक लढत झाली. या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर सर्वबाद 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान भारताने 33व्या षटकातच दोन बाद 219धावांनी सहज पार करत मालिका विजय मिळविला.
दिनविशेष :
- 👉 18 डिसेंबर 1887 मध्ये भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर 'भिखारी ठाकूर'यांचा जन्म झाला.
- 👉 एफ.एम. रेडिओचे संशोधक 'ई.एच. आर्मस्ट्राँग' यांचा जन्म सन 1890मध्ये 18 डिसेंबर रोजी झाला.
- 👉 18 डिसेंबर 1978 रोजी डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
- 👉 सन 1989 मध्ये 18 डिसेंबर रोजी 'सव्यसाची मुकर्जी' यांनी भारताचे 20 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक
- १८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी स्पष्ट बहुमत राखण्यात यश मिळाले आहे.
- याशिवाय, या विजयामुळे देशातील भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९वर गेली आहे. तर काँग्रेस पक्ष फक्त चार राज्यांपुरता मर्यादित राहिला आहे.
- अरुणाचल प्रदेश, असाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजप स्वबळावर सत्तेत आहे.
- तर बिहार, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम आणि नागालँडमध्ये भाजप मित्रपक्षांबरोबर सत्तेत आहे.
- दुसरीकडे काँग्रेसच्या ताब्यात केवळ कर्नाटक, पंजाब, मिझोराम आणि मेघालय ही ती चार राज्ये असून, त्यातही कर्नाटक आणि पंजाब ही दोनच मोठी राज्ये काँग्रेसच्या हातात आहेत.
गुजरात
- गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती.
- १८२ जागांसाठी गुजरातमध्ये सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले होते. सरकार स्थापनेसाठी येथे ९२ एवढे संख्याबळ आवश्यक होते.
- काँग्रेसने दिलेल्या कडव्या लढतीमुळे गुजरातेत सत्ता राखताना भाजपची चांगलीच दमछाक झाली असून, त्यांचे संख्याबळ ११५वरून ९९पर्यंत घसरले.
- तर कॉंग्रेसने ६१वरून ७७ जागांपर्यंत मजल मारल्याने मागील सलग २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कसेबसे गुजरात राखण्यात यश आले.
- यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाऊ शकते हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
- उना दलित अत्याचारानंतर दलितांचा आवाज बनलेले जिग्नेश मेवाणी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदार संघात भाजपचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा पराभव केला.
हिमाचल प्रदेश
- गुजरातच्या तुलनेत कमी जागा आणि ग्लॅमर असल्यामुळे हिमाचल प्रदेशची निवडणूक काहीशी झाकोळली गेली होती.
- हिमाचल प्रदेशात मतदार दर पाच वर्षांनी सरकार बदलतात असा गेल्या दोन-अडीच दशकांचा अनुभव आहे. तो पॅटर्न त्यावेळीदेखील कायम राखला आहे.
- ६८ जागा असलेल्या हिमाचल विधानसभेत सरकार स्थापनेसाठी ३५ जागांची गरज होती. ६८ पैकी ४४ जागा जिंकत स्पष्ट भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले.
- गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकता आल्या, तर मार्क्सवादी पक्षाने १ व अपक्षांनी २ जागा जिंकल्या. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
- या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा
- या निवडणुकीत काँग्रेसविरोधातील अँटी-इन्कम्बसी फॅक्टर, विकासाचा मुद्दा घेऊन भाजपने केलेला प्रचार, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक नेत्यांमधील बेबनाव हे घटक महत्त्वपूर्ण ठरले.
- या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला.
- प्रेमकुमार धुमल हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. २००७-१२ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
- काँग्रेसने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली. ८३ वर्षीय वीरभद्र यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले.
- राज्याचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलेले वीरभद्र सिंह आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे दोघे विजयी झाले आहे.
- वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असून, त्याची चौकशीही विविध गुप्तचर यंत्रणांकडून सुरू आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा: सुशील कुमार आणि साक्षी मलिकला सुवर्णपदक
- भारताचे कुस्तीपटू सुशील कुमार आणि साक्षी मलिक यांनी जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल रेसलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली आहेत.
- सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरवर मात करत सुवर्णपदक जिंकले.
- याआधी २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर सुशीलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
- रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाइलमधील ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने न्यूझीलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव केला.
- या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.
