दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०२

जनरल नॉलेज


Q.1) डिसेंबर 2017 मध्ये भारतीय वायुदलाचे ‘_____’ हेलिकॉप्टर 45 सालाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे.
A) शक्ती
B) प्रताप
C) रुद्रा
D) अजिंक्य
उत्तर : B) प्रताप
स्पष्टीकरण : भारतीय वायुदलाचे ‘प्रताप’ हेलिकॉप्टर 45 सालाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे. बहुभुमिका निभावणार्या या MI-8 हेलिकॉप्टरचे 1971 साली भारतात आगमन झाले आणि 1972 साली यांना भारतीय वायुदलात समाविष्ट केले गेले होते. 1988 सालापर्यंत एकूण 107 प्रताप हेलिकॉप्टर वायुदलात रुजू होते.


Q.2) कुठे 16 ते 18 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रथम ‘जागतिक संत्रा महोत्सव’ साजरा केला गेला?
A) नागपूर
B) नवी दिल्ली
C) हैदराबाद
D) अमरावती
उत्तर : A) नागपूर
स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्यातल्या नागपूर शहरात 16 ते 18 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रथम ‘जागतिक संत्रा महोत्सव’ साजरा केला गेला आहे. भारतात 9,89 हजार हेक्टर क्षेत्रात दरवर्षी जवळपास 96.39 लाख टन निंबू वर्गीय फळांचे उत्पादन घेतले जाते.


Q.3) चिलीचे पुढील राष्ट्रपती कोण असणार आहेत?
A) जुआन ऑरलँडो हर्नांडेझ
B) सेबॅस्टियन पिनरा
C) ऑगस्टो पिनोचेट
D) रिकार्डो लागोस
उत्तर : B) सेबॅस्टियन पिनरा
स्पष्टीकरण : सेबॅस्टियन पिनरा यांनी चिलीमध्ये नुकतीच झालेली राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकलेली आहे. चिलीमधील अब्जाधीश आणि नेता पिनरा यांनी त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या एलेखान्दो गीलर यांचा पराभव केला. पिनेरा यांनी 54% मते मिळवलीत.


Q.4) जुआन ऑरलँडो हर्नांडेझ यांनी मध्य अमेरिकामधील ________ देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेली निवडणूक जिंकलेली आहे.
A) होंडुरास
B) बेलिझ
C) कोस्टा रिका
D) एल साल्वाडोर
उत्तर : A) होंडुरास
स्पष्टीकरण : जुआन ऑरलँडो हर्नांडेझ यांनी होंडुरास देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेली निवडणूक जिंकलेली आहे. होंडुरास हा मध्य अमेरिकामधील एक देश आहे. टेगुसिगल्पा ही देशाची राजधानी आहे आणि होंडुरियन लंपिरा हे देशाचे चलन आहे.


Q.5) दक्षिण आफ्रिकेतील ‘2017 राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक जिंकले?
A) आकाश खुल्लर, न्यूझीलंड
B) उदय चंद, भारत
C) सुशील कुमार, भारत
D) अॅंटोनीओ इनोकी, जपान
उत्तर : C) सुशील कुमार, भारत
स्पष्टीकरण : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या ‘राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताच्या सुशील कुमारने सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेच्या 74 किलो फ्रीस्टाईल गटात झालेल्या अंतिम लढतीत सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरचा पराभव केला. याच गटातले कांस्यपदक भारताच्या परविन राणाने जिंकले.


Q.6) ‘2017 BWF सुपरसिरिज’ स्पर्धेचे विजेतेपद जपानच्या अकाने यामागुची हिने जिंकले. यामागुची हिने अंतिम लढतीत कोणाचा पराभव केला?
A) ज्वाला गुट्टा, भारत
B) नोझोमी ओकुहारा, जपान
C) कॅरोलीना मरीन, अमेरिका
D) पी. व्ही. सिंधू, भारत
उत्तर : D) पी. व्ही. सिंधू, भारत
स्पष्टीकरण : UAE च्या दुबई येथे खेळल्या गेलेल्या ‘2017 BWF सुपरसिरिज’ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूचा जपानच्या अकाने यामागुची हिने पराभव केला.


Q.7) प्रथम ‘2017 वुशु सांदा आशियाई चषक’ स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 10 पदके पटकवली. ही स्पर्धा कोणत्या देशात खेळली गेली?
A) जपान
B) भारत
C) चीन
D) यापैकी नाही
उत्तर : C) चीन
स्पष्टीकरण : चीनच्या ग्वांगझू येथे खेळण्यात आलेल्या प्रथम ‘2017 वुशु सांदा आशियाई चषक’ स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 10 पदके पटकवलेली आहेत.


Q.8) डिसेंबर 2017 मध्ये खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय (ODI) क्रिकेट मालिका संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
I – ही मालिका भारताने जिंकली.
II – भारताचा कुलदीप यादव हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.
III - श्रीलंकेचा दिनेश चांदिमल हा मालिकेचा मालिकावीर ठरला.
A) फक्त I
B) I आणि II
C) II आणि III
D) फक्त III
उत्तर : B) I आणि II
स्पष्टीकरण : भारतीय संघाने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेचा पराभव करत एकदिवसीय (ODI) क्रिकेट मालिका जिंकलेली आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून भारताच्या कुलदीप यादवला निवडण्यात आले आणि संपूर्ण मालिकेचा मालिकावीर म्हणून भारताच्या शिखर धवनला निवडण्यात आले.


Q.9) 17 डिसेंबर 2017 रोजी कोणत्या शहरात "रन फॉर लाडली" या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले?
A) जयपूर, राजस्थान
B) नवी दिल्ली
C) अहमदनगर, गुजरात
D) कोलकाता, पश्चिम बंगाल
उत्तर : B) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 17 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत "रन फॉर लाडली" अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जितेंद्र सिंह याने 21 किलोमीटरची ही शर्यत जिंकली. स्त्री-पुरुष समानता आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासंबंधी जागरूकता फैलावण्यासाठी दिल्ली पोलीस आणि लाडली फाउंडेशन यांनी या धावस्पर्धेचे आयोजन केले होते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.


Q.10) समुदाय सहभाग व जनसेवा सामाजिक लेखापरिक्षण कायदा-2017 तयार करणारा भारतातला पहिला राज्य कोणता आहे?
A) महाराष्ट्र
B) मेघालय
C) उत्तरप्रदेश
D) बिहार
उत्तर : B) मेघालय
स्पष्टीकरण : मेघालय राज्य हे सामाजिक लेखापरिक्षण कायदा करणारे भारतातले पहिले राज्य ठरले आहे. ‘मेघालय समुदाय सहभाग व जनसेवा सामाजिक लेखापरिक्षण कायदा-2017’ राज्यात लागू करण्यात आला आहे. मेघलयात या कायद्याची अंमलबजावणी करणार्या ‘कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि मूल्यांकन’ विभागाचे प्रधान सचिव के. एन. कुमार आहेत. सामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधून लेखापरिक्षण करण्याकरिता ‘सोशल ऑडिट फॅसिलिटेटर’ नियुक्त केले जाईल.



पाखरे वाटा पाडत नाहीत, स्वत:चा रस्ता स्वत: शोधून काढतात.

Archive

Contact Form

Send