दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०७

जनरल नॉलेज


Q.1) 22 डिसेंबर 2017 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते _______ येथे‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी-नि-सभागृह (IECC)’ आणि ‘एकात्मिक पारगमन मार्गिका विकास प्रकल्प’ यांची कोणशीला ठेवली गेली.
A) हैदराबाद
B) नवी दिल्ली
C) जयपूर
D) गुवाहाटी
उत्तर : B) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्याहस्ते नवी दिल्लीत ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी-नि-सभागृह (IECC)’ आणि ‘एकात्मिक पारगमन मार्गिका विकास प्रकल्प’ यांची कोणशीला ठेवली गेली. प्रकल्पामध्ये 27मीटर रुंद सहा पदरी बोगदा तयार केला जाणार, जोप्रगती मैदानाच्या जमिनी खालून होत पुराना किला रोड आणि रिंग रोडला जोडणार.


Q.2) कोणाची NCC च्या महानिदेशक पदावर नेमणूक करण्यात आली?
A) बी. एस. सहरावत
B) विनोद वशिष्ठ
C) बलबीर सिंह
D) विरेंद्र साहा
उत्तर : A) बी. एस. सहरावत
स्पष्टीकरण : लेफ्टनंट जनरलबी. एस. सहरावत यांची ‘राष्ट्रीय  सेना’ (National Cadet Corps -NCC) च्या महानिदेशक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी विनोद वशिष्ठ यांच्या जागी पदभार सांभाळला.


Q.3) पोलाद मंत्रालयाने ‘हिंदुस्तान स्टील वर्क कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL) मधील आपला संपूर्ण_______ हिस्सा गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्याचे मान्य केले आहे. त्यासंबंधी त्यांच्यात करार झाला आहे.
A) 49%
B) 51%
C) 60%
D) 40%
उत्तर : A) 49%
स्पष्टीकरण : पोलाद मंत्रालयाने ‘हिंदुस्तान स्टील वर्क कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL) मधील आपला संपूर्ण 49% हिस्सा गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्याचे मान्य केले आहे. त्यासंबंधी त्यांच्यात करार झाला आहे. करारामुळे शासकीय ‘राष्ट्रीय इमारत बांधकाम कंपनी (NBCC)’ लात्याची उपकंपनी HSCL वर संपूर्ण नियंत्रण मिळविण्याचा मार्ग मोकळा होईल.


Q.4) डिसेंबर 2017 मध्ये गुजरात विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड झाली?
A) विजय रुपाणी
B) नितीन पटेल
C) विजय पटेल
D) सुंदर केशवाणी
उत्तर : A) विजय रुपाणी
स्पष्टीकरण : गुजरात विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या. नेतेपदी विजय रुपाणी यांची निवड झाली आहे. यासोबतच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजयरु पाणी यांना कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतलाआहे. नितीन पटेलयांची उप-नेतेपदी निवडकेली गेली. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 99 जागा मिळवत बहुमत मिळवले आणि सलग सहाव्यांदा आपली सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.


Q.5) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय धोरण आणि जगासोबतचे संबंधया विषयी माहिती देण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने कोणता कार्यक्रम सुरू केला?
A) स्टूडेंट्स-मिनिस्ट्री डायलॉंग प्रोग्राम
B) स्टूडेंट्स अँड एक्सटर्नल अफेयर मिनिस्ट्री डायलॉंग प्रोग्राम
C) स्टूडेंट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर इनगेजमेंट प्रोग्राम
D) अवेयर स्टूडेंट्स प्रोग्राम
उत्तर : C) स्टूडेंट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर इनगेजमेंट प्रोग्राम
स्पष्टीकरण : 22 डिसेंबर 2017 रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘स्टूडेंट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर इनगेजमेंट प्रोग्राम (SAMEEP/समीप)’ नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय धोरण आणि जगासोबतचे संबंध याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेतला आहे.


Q.6) ‘मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक-2017’ याबाबतच्या निवड समितीने राज्यसभेत ‘एक राष्ट्र, एक परवाना, एक कर’ च्या संकल्पनेला पाठबळ देणारा आपला अहवाल सादर केला. या समितीचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे?
A) संकल्प देशमुख
B) विनय पी. सहस्त्रबुद्धे
C) कावेरी कामत
D) सुलोचना दास
उत्तर : B) विनय पी. सहस्त्रबुद्धे
स्पष्टीकरण : ‘मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक-2017’ याबाबतच्या निवड समितीने राज्यसभेत ‘एक राष्ट्र, एक परवाना, एक कर’ च्या संकल्पनेला पाठबळ देणारा आपला अहवाल सादर केला आहे. विनय पी. सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या या अहवालामुळे राज्यांना रस्ते करसंबंधी महसुली वाढीस मदत होईल. सध्या, आंतरराज्य व राष्ट्रीय परवाना मिळविण्यासाठी लांबलचक प्रक्रिया आणि मोठा कर आणि शुल्क भरणे आवश्यक आहे.


Q.7) _____ देशाचे राष्ट्रपती राऊल कॅस्ट्रो यांनी 19 एप्रिल 2018 रोजी पदाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे.
A) दक्षिण सुदान
B) इजिप्त
C) ग्रीस
D) क्यूबा
उत्तर : D) क्यूबा
स्पष्टीकरण : क्यूबाचे राष्ट्रपती राऊल कॅस्ट्रो यांनी 19 एप्रिल 2018 रोजी पदाचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. 86 वर्षीय कॅस्ट्रो यांनी 2006 साली फिदेल कॅस्ट्रो यांच्या तब्येतीमुळे त्यांच्या जागी देशाचे राष्ट्रपती पद सांभाळले. कायदेशीररित्या त्यांनी 2008 साली फिदेल कॅस्ट्रो यांनी पद सोडल्यानंतर ते कायदेशीरपणे राष्ट्रपती पदावर आलेत आणि 2013 साली पुन्हा एकदा निवडून आले होते.


Q.8) UNSC ने डिसेंबर 2017 मध्ये कोणत्या देशाच्या मिळकत मिळवण्यासाठी परदेशात पाठविण्यात आलेल्या कामगारांना 2019 सालच्या शेवटपर्यंत स्वदेशी परत पाठविण्याचा आदेश दिला?
A) दक्षिण कोरिया
B) उत्तर कोरिया
C) दक्षिण सुदान
D) तुलिप
उत्तर : B) उत्तर कोरिया
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाने केलेल्या अणु-क्षेपणास्त्राच्या चाचणीसंदर्भात प्रतिक्रियास्वरूप सर्वानुमते नवे निर्बंध लादले आहेत, ज्यामधून उत्तर कोरियाकडे जाणारा इंधन पुरवठा आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात (जवळपास 75%) कपात केली गेली आहे. किम जोंग-ऊन यांच्या शासनासाठी मिळकत मिळवण्यासाठी परदेशात पाठविण्यात आलेल्या उत्तर कोरियाच्या कामगारांना 2019 च्या शेवटपर्यंत स्वदेशी परत पाठविण्याचा आदेश देखील दिला गेला.


Q. 9) 2040 सालापर्यंत देशामधून तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना पुर्णपणे बाद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला?
A) अमेरिका
B) भारत
C) फ्रान्स
D) रशिया
उत्तर : C) फ्रान्स
स्पष्टीकरण : 2040 सालापर्यंत देशामधून तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना पुर्णपणे बाद करण्याचा निर्णय फ्रान्सच्या सरकारने घेतला आहे. फ्रान्स 2040 सालानंतर आपल्या नियंत्रणाखालील क्षेत्रात तेल आणि वायूंच्या खोदकामाला बंद करून त्यांच्या उत्पादनांना परवानगी देणार नाही. 2040 साली खोदकामांच्या परवान्यांची मुदत संपणार आहे आणि त्यांना काम करण्यास मुदत वाढवून दिली जाणार नाही.


Q.10) गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत कोणत्या प्रकल्पाला सुरुवात केली?
A) गंगा सिटी प्रकल्प
B) गंगा ग्राम प्रकल्प
C) गंगा ट्राम प्रकल्प
D) गंगा आदर्श प्रकल्प
उत्तर : B) गंगा ग्राम प्रकल्प
स्पष्टीकरण : 23 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत ‘गंगा ग्राम प्रकल्प’ चा औपचारिक रूपाने शुभारंभ केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश्य म्हणजे गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्वच्छता आणणे. गंगा किनारी वसलेल्या गावांना हागणदारी मुक्त घोषित केल्यानंतर मंत्रालय व राज्य शासनांनी 24 गावांची ओळख केली आहे, ज्यांना गंगा ग्रामच्या रूपात रूपांतरित केले जाईल. हे गाव ‘स्वच्छतेचे मानदंड’ स्थापित करणार. या गावांना 31 डिसेंबर 2018 पर्यंत गंगा ग्राममध्ये बदलण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.



प्रत्येक यशाच्या पाठीमागे
एक तात्पुरते अपयश येते,
मन खचून जातं...
पण अशाही परिस्थितीत
जे झगडणे सोडत नाहीत
तेच जिंकतात.
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send