चालू घडामोडी : ६ डिसेंबर २०१७

भारतीय सरकार नवा कायदा आणणार :
  • मोदी सरकार 'फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल'आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.
  • किंबहुना यामुळे सर्वसामान्य बँक खातेदाराची कधीही नोटाबंदी होऊ शकते. या विधेयकाला केंद्र सरकारने जून 2017 मध्ये मंजुरी दिलीआहे. बुडित खात्यात गेलेल्या बँकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र याचा फटका बँकांच्या ग्राहकांना सोसावा लागेल.
  • 'फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल'मुळे अनेकांच्या मनात भीतीची भावना आहे. यामुळे बँक बुडत असल्यास, त्यांच्याकडून ग्राहकांचा पैसा वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्य बँक खातेदारांचा पैसा परत करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल. हा कायदा बँकांसाठी तसा नवीन नाही1961मध्ये संसदेने 'डिपॉजीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन' कायदा मंजूर केला होता. या कायद्यामुळे बँक बुडित खात्यात गेल्यास, बँक ग्राहकांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये खातेदारांना देणे लागते. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात 1 लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास, ती संपूर्ण रक्कम बँक आपल्या ताब्यात घेऊन तिचा वापर करु शकते.
  • मोदी सरकारने 'फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल' आणल्यास बँकांना जास्त अधिकार मिळतील. यामुळे सरकारी बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होईल.
मुस्लिम देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी :
  • सहा मुस्लिम बहुल देशांवर घालण्यात आलेल्या प्रवेश व प्रवास बंदीच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असा निकाल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, त्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचा मोठा विजय झाला आहे. या प्रकरणात काही न्यायालयांमध्ये अपील सुनावणीसाठी पडून असली तरी मुस्लिम प्रवेश बंदीचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
  • सध्याचा मुस्लिम प्रवेश बंदीचा आदेश हा मूळ आदेशाची तिसरी आवृत्ती असून, वेळोवेळी आदेशात बदल करण्यात आले होते. ट्रम्प यांनी जानेवारीत अध्यक्षपद ग्रहण करताच मुस्लिम प्रवेश बंदीचा आदेश लागू केला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या मुस्लिम प्रवेश बंदीच्या निर्णयाला नि:संदिग्ध पाठिंबा दिला असल्याने आता इराणलिबियासीरियायेमेनसोमालिया व चॅड या देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येणे व तेथून बाहेर जाणे कठीण होणार आहे.
  • तसेच ट्रम्प यांच्या मुस्लिम प्रवेश बंदीच्या आदेशावर इतर न्यायालयांकडून घालण्यात आलेले र्निबध अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायाधीशांपैकी सात जणांनी बंदीच्या बाजूने मत नोंदवल्याने उठवण्यात आले आहेत.
सोलापूर महापालिका बरखास्तीची मागणी :
  • महापालिकेतील दोन गटांतील वादामुळे शहर विकास रखडला आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानने केली होती. त्यांच्या मागणीचे पत्र राज्य सरकारकडे पाठवावे किंवा बरखास्तीचा अधिकार सरकारचा आहे हे संबंधित संस्थेला कळवावे, याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा असा अभिप्राय महापालिका विधान सल्लागारांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेस कार्यवाहीचा आदेश दिला होता.
  • प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास यन्नम यांनी महापालिका बरखास्तीचे पत्र 18 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते योग्य कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविले. आयुक्तांनी ते मुख्य लेखापाल कार्यालयाकडे, तेथून ते नगरसचिव कार्यालयाकडे गेले. त्यानुसार विधान सल्लागार कार्यालयाने अभिप्राय दिला असून, संबंधित अभिप्रायाची प्रत संस्थेच्या अध्यक्षांना द्यायची की सरकारकडे पाठवायची, याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.
  • सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली. सत्तांतर झाल्यावर शहराचा विकास होईल, या अपेक्षेमध्ये 11 लाख सोलापूरकर होते. मात्र महापालिकेतील दोन गटांच्या वादामुळे विकासकामे रखडली आहेत. पालिकेत सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिका तातडीने बरखास्त करावी, या मागणीचे पत्र राष्ट्रपती, राज्यपाल यांनाही पाठविणार आहे, असे निवेदन श्री. यन्नम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
चीनच्या निर्णयामुळे पाकिस्तानला झटका :
  • चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या पाकिस्तानातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.
  • चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी प्रशासनाला मोठा धक्काबसल्याचे मानले जाते. रस्ते प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
  • सुमारे 50 अब्ज डॉलर खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) माध्यमातून पाकिस्तानात मोठे रस्ते प्रकल्प सुरू आहेत. मात्र, 'सीपीईसी'अंतर्गत सुरू असलेल्या तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांना दिला जाणारा निधी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निधी थांबविण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे.
बाबरीप्रकरणी पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला :
  • सुमारे दोन तास चाललेल्या दाव्या-प्रत‌दिाव्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने 5डिसेंबर रोजी बाबरी मशिदप्रकरणाची सुनावणी 2019च्या लोकसभा न‌विडणुकीनंतर घेण्याची सुन्नी वफ्फ बोर्डाचे वकील कप‌िल स‌िबल यांची मागणी फेटाळली. याप्रकरणीची पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
  • वक्फ बोर्डाने केलेली मागणी धक्कादायक आण‌ि आश्चर्यकारक असल्याची टिप्पणी यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवली.
  • अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेला 6 डिसेंबर रोजी 25 वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यामुळे 5 डिसेंबर रोजी सुनावणीदरम्यान न्यायालय काय भूम‌किा घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
  • अयोध्याप्रकरणी अद्याप सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. याप्रकरणाच्या न‌किालाचे देशभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी घाईघाईने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद सुन्नी वक्फ बोर्डाच्यावतीने करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली. 'सर्व पक्षकार जानेवारीत सुनावणीसाठी तयार झालेले असताना अचानक सुनावणी जुलै 2019नंतर घ्या, अशी मागणी कशी होऊ शकते? हे धक्कादायक आहे,' अशा शब्दांत म‌िश्रा यांनी वक्फ बोर्डाला फटकारले.
  • अयोध्या प्रकरणीतील साक्षी पाली, फारसी, संस्कृत आणि अरबीसह व‌िवि‌ध भाषांमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. त्यांच्या भाषांतराचे कामही पूर्ण झाले आहे, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
दिनविशेष :
  • 6 डिसेंबर 1971 रोजी भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • सन 1992 मध्ये 6 डिसेंबर रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे 1500 लोक ठार झाले.
  • थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 6 डिसेंबर 2000 मध्ये केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

#MeToo मोहिमेला टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार

  • भूतकाळात झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल मौन सोडणाऱ्या महिलांना प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. टाइम मॅगझिनने या महिलांचा ‘सायलेंस ब्रेकर्स’ असा उल्लेख केला आहे.
  • अमेरिकेतील समाजात असणारा स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा या महिलांच्या पुढाकाराने समोर आला.
  • लैंगिक अत्याचाराबद्दल मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता लोकांनी बेधडक व्यक्त व्हावे, यासाठी ‘मी टू’ ऑनलाईन हॅशटॅग अभियानाची सुरुवात करण्यात आली.
  • या अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
  • ‘लैंगिक अत्याचाराविरोधातील आवाज बुलंद करणे’, हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता. या अभियानाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाने देश, वर्ग, धर्म आणि स्त्री-पुरुष अशा सर्व सीमा ओलांडल्या.
  • हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यावर ‘मी टू’ या ऑनलाईन मोहिमेला सुरुवात झाली होती.
  • या अभियानामुळे हॉलिवूडबरोबर व्यवसायिक, राजकारण, मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा केला.
  • टाइम मॅगझिनने कव्हर पेजवर प्रत्येक क्षेत्रातील एका महिलेला दाखवून प्रत्येक ठिकाणी असणारी लैंगिक शोषणाची झलक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
  • ‘मी टू’ ही संज्ञा सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्त्या टॅराना बर्क यांनी लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना बळ देण्यासाठी २००६मध्ये वापरली होती.
  • वर्षभरातील घडामोडींवर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या व्यक्ती किंवा बातमीला टाइम मासिकाकडून ‘पर्सन ऑफ द इयर पुरस्कार’ दिला जातो.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी यांना मागे टाकत ‘मी टू’ अभियानाने ‘पर्सन ऑफ द इयर पुरस्कार’ हा पुरस्कार पटकावला आहे.

शक्तिकांत दास जी-२० परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी

  • मोदी सरकारचे विश्वासू सनदी अधिकारी शक्तिकांत दास यांची जी-२० देशांच्या परिषदेसाठी भारताचे शेर्पा (प्रतिनिधी) म्हणून निवड झाली आहे.
  • प्रशासनातील त्यांचा अनुभव दांडगा असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या अपेक्षा व गरजा त्यांना माहीत आहेत.
  • या परिषदेतील विषयसूचीवर मतैक्य घडवून ती भारताला अनुकूल अशा पद्धतीने घडवून आणण्याचे अवघड काम शेर्पा म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
  • शक्तिकांत दास हे मूळ ओदिशाचे असून, त्यांनी सनदी अधिकारी म्हणून ३५ वर्षे काम केले आहे.
  • ते १९८०च्या तुकडीतील तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी असून, सेवेचा बराच काळ त्यांनी अर्थ खात्यात व्यतीत केलेला आहे.
  • आर्थिक कामकाज, खर्च, अर्थसंकल्प अशा अनेक विभागांत काम केले असल्याने त्यांना आर्थिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
  • अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेतील सर्व बारकावे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प तयार करण्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती.
  • केंद्रात महसूल सचिव म्हणून काम करताना त्यांनी अर्थ मंत्रालयाने काळ्या पैशाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेतील कागदपत्रे हाताळली होती.
  • तामिळनाडूत ते उद्योग व महसूल सचिवही होते. फेब्रुवारी २०१७मध्ये ते निवृत्त झाले.
  • जुलै २०१६मध्ये हॅम्बर्गमध्ये जी-२० देशांची परिषदझाली होती, त्यात शेर्पा म्हणून निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी भूमिका पार पाडली.
  • त्याआधी सुरेश प्रभू हे शेर्पा होते. त्यांच्या जागी सप्टेंबर २०१५मध्ये पानगढिया यांची नेमणूक करण्यात आली होती.
  • पानगढियांनीच जी-२० साठी स्थायी प्रतिनिधी म्हणजे शेर्पा नेमण्याची सूचना सरकारला केली होती.
  • संयुक्त राष्ट्रांत जसा भारताचा स्थायी प्रतिनिधी असतो त्याचप्रमाणे हे पद आता डिसेंबर २०१८पर्यंत दास यांच्याकडे राहील.
  • या जी २० परिषदेत दोन मार्गानी चर्चा होत असते, त्यात एक आर्थिक व दुसरा विकासाचा असतो.
  • आर्थिक चर्चेची बाजू अर्थ सचिव सांभाळणार आहेत, पण विकासाच्या चर्चेत शेर्पा म्हणून शक्तिकांत दास यांना भूमिका पार पाडावी लागणार आहे.
  • जी-२० परिषदेत भारताबाबतच्या अपप्रचाराचे निराकरण करतानाच विकासाचे मुद्दे मांडले तर ते आपल्या देशात परकीय गुंतवणूक वाढण्यास उपयोगीठरेल.

पं. उल्हास कशाळकर यांना तानसेन पुरस्कार

  • संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.
  • त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.
  • नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.
  • जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
  • त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात १९८३ ते १९९० दरम्यान काम केले आहे. 
  • यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर

  • रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कोणतेच बदल केलेले नाही.
  • रिझर्व्ह बँकेने सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा ६.७ टक्के हा मागील व्याज दरच कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, आर्थिक वर्ष २०१८मध्ये देशाचा जीडीपी ६.७ टक्क्यांनी वाढू शकतो.
  • आरबीआयने दुसऱ्या सहामाहीत महागाई दर हा ४.३ ते ४.६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  • केंद्रीय बँकेच्या एमपीसीने द्वैमासिक समीक्षेत रेपो रेट ६ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के, सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर १९.५ टक्के कायम ठेवला आहे.
  • ऑगस्ट महिन्याच्या पतधोरण समितीच्या समीक्षेत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोणतेच बदल केले नव्हते.
  • आरबीआयच्या या निर्णयामुळे किरकोळ महागाई दरात वाढ होण्याची शक्यता आहे. हा चालू वर्षासाठीच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा होता.

महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक

  • महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषाही बंधनकारक केली आहे.
  • बँक, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, विमानतळ अशा विविध ठिकाणी मराठी भाषेचा वापर राज्य सरकारने बंधनकारक केला आहे.
  • केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रानुसार इंग्रजी व हिंदी बरोबरच प्रादेशिक भाषेचा म्हणजेच राज्यात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे.
  • मात्र, राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर पुरेशा प्रमाणात होत नाही, अशा तक्रारी राज्य सरकारकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • राज्यातील जनतेशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांमध्ये, मौखिक व लिखित व्यवहारांमध्ये व संवादामध्ये मराठी भाषेचा वापर करावा, असे राज्य सरकारने  म्हटले आहे.
  • मराठी भाषेतील पत्रव्यवहारांसाठी देवनागरी लिपीचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
  • याशिवाय बँक, टपाल आणि अन्य कार्यालयांमध्ये दिली जाणारी प्रपत्रे, आवेदन पत्रे, बँक व टपाल पावत्या यातही मराठीची सक्ती करण्यात आली आहे.
  • विविध पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या लेखी व तोंडी परीक्षेतही मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारकअसेल.
  • तसेच रेल्वे, मेट्रो, मोनो रेल व विमानतळावीरल आगमन- निर्गमन निर्देशफलक, वेळापत्रक, सूचना आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीत मराठीचा वापर करावा लागणार आहे.
  • केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकता वाटल्यास मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी सुचनाही सरकारने केली आहे.

अभिमत विद्यापीठांच्या कारभाराच्या अभ्यासासाठी समिती स्थापन


  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील अभिमत विद्यापीठांच्या कारभाराचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे.
  • ही समिती येत्या चार महिन्यांमध्ये या विद्यापीठांसाठी नियामक यंत्रणा देखील सुचवणार आहे. या निर्णयामुळे अभिमत विद्यापीठांच्या बेलगाम कारभाराला चाप बसणार आहे.
  • आवश्यक मंजुरीशिवाय तांत्रिक शिक्षणासाठी दूरस्थ शिक्षण पद्धती राबवणा‍ऱ्या चार अभिमत विद्यापीठांनी दिलेल्या इंजिनीअरिंग पदवी रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते.
  • या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गेल्याच आठवड्यात या पदवी रद्द केल्याने सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
  • या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने अभिमत विद्यापीठांच्या कारभाराला चाप लावण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.
  • पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एल. नर‌सिंहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.
  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुखबिर सिंग संधु आणि ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’चे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे या समितीचे सदस्य आहेत.

Archive

Contact Form

Send