दररोज जनरल नॉलेज क्रमांक १०
जनरल नॉलेज
Q.1) देशाच्या कोणत्या घटकाला समर्पित असे भारत सरकारकडून ‘ई-मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (e-HRMS)’ नावाने ऑनलाइन व्यासपीठ उघडण्यात आले?
A) केंद्र शासनाचे कर्मचारी
B) राज्य शासनाचे कर्मचारी
C) प्रशिक्षणार्थी
D) A आणि B दोन्ही
उत्तर : A) केंद्र शासनाचे कर्मचारी
स्पष्टीकरण : भारत सरकारकडून ‘ई-मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (e-HRMS)’ नावाने एक ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले आहे. e-HRMS (electronic-Human Resource Management System) या व्यासपीठावरून सुट्टीसाठी अर्ज करता येणार तसेच केंद्र शासनाच्या कर्मचार्यांच्या सेवांसंबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार.
A) केंद्र शासनाचे कर्मचारी
B) राज्य शासनाचे कर्मचारी
C) प्रशिक्षणार्थी
D) A आणि B दोन्ही
उत्तर : A) केंद्र शासनाचे कर्मचारी
स्पष्टीकरण : भारत सरकारकडून ‘ई-मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (e-HRMS)’ नावाने एक ऑनलाइन व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले आहे. e-HRMS (electronic-Human Resource Management System) या व्यासपीठावरून सुट्टीसाठी अर्ज करता येणार तसेच केंद्र शासनाच्या कर्मचार्यांच्या सेवांसंबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार.
Q.2) उच्चस्तरीय पारदर्शकतेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व ______ ला केंद्र शासनाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) सोबत एकात्मिक असलेल्या एक विदेशी सहित 32 नामनिर्देशित बँकांमध्ये कुठेही खाते उघडण्यासंबंधी दिशानिर्देश दिले आहेत.
A) सर्व गैर-शासकीय संघटना (NGO)
B) सर्व विश्वस्त मंडळ (ट्रस्ट)
C) सर्व संस्था/स्वयंसेवी गट/संघटना
D) वरील तीनही A, B आणि C
उत्तर : A) सर्व गैर-शासकीय संघटना (NGO)
स्पष्टीकरण : धर्मादाय क्षेत्रात उच्चस्तरीय पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने देशातील सर्व गैर-शासकीय संघटनांना (NGO) कोणत्याही नामनिर्देशित बॅंकेमध्ये खाते उघडण्यासंबंधी दिशानिर्देश दिले आहेत. खात्यामध्ये विदेशातून निधी प्राप्त करणार्या खाजगी आणि व्यावसायिक हितचिंतक सर्व NGO ला केंद्र शासनाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) सोबत एकात्मिक असलेल्या एक विदेशी सहित 32 नामनिर्देशित बँकांमध्ये कुठेही खाते उघडण्याने आता आवश्यक झाले आहे.
Q.3) कोणत्या देशात जानेवारी 2018 मध्ये ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित केला गेला आहे?
A) मलेशिया
B) सिंगापूर
C) चीन
D) जपान
उत्तर : B) सिंगापूर
स्पष्टीकरण : जानेवारी 2018 मध्ये सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘प्रवासी भारतीय दिवस (PBD)’ भारताच्या विकासात परदेशी भारतीय समाजाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी आयोजित केला जातो.
Q.4) डिसेंबर 2017 मध्ये मध्य अमेरिकेत स्थित कोणत्या देशाने देशाचे दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची घोषणा केली?
A) मायक्रोनेशिया
B) नौरु
C) ग्वाटेमाला
D) टोगो
उत्तर : C) ग्वाटेमाला
स्पष्टीकरण : ग्वाटेमाला सरकारने तेल अवीवमधील देशाचे दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची घोषणा केली आहे. ग्वाटेमाला हा विवादित जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला समर्थन देणार्या देशांमध्ये समाविष्ट आहे. शिवाय मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नौरु, पलाउ, टोगो आणि इस्रायल या देशांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी मानण्यास समर्थन देत आहेत.
Q.5) 1970 आणि 1980 च्या दशकात चरित्र अभिनेत्याच्या रूपात भूमिका गाजविणार्या _____ या बंगाली चित्रपट अभिनेत्याचे कोलकातामध्ये निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
A) अनुप कुमार
B) भानू बंदोपाध्याय
C) आमला
D) पार्थ मुखोपाध्याय
उत्तर : D) पार्थ मुखोपाध्याय
स्पष्टीकरण : बंगाली चित्रपट अभिनेता पार्थ मुखोपाध्याय यांचे कोलकातामध्ये निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांनी 1970 आणि 1980 च्या दशकामधील कार्यकाळ एक चरित्र अभिनेत्याच्या रूपात साकारली होती.
Q.6) महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ल्याच्या पुनरुज्जीविकरणासाठी 17 सदस्यीय विकास प्राधिकरण गठित केले आहे. या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
A) रुपा ठाकरे
B) संभाजी शाहू छत्रपती
C) स्वप्न मराठे
D) अनु आगा
उत्तर : B) संभाजी शाहू छत्रपती
स्पष्टीकरण : महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यात महाड गावी स्थित रायगड किल्ल्याच्या पुनरुज्जीविकरणासाठी 17 सदस्यीय विकास प्राधिकरण गठित केले आहे. कोल्हापूरच्या माजी राजघराण्याचे सदस्य असलेले आणि शिवाजींचे वंशज -संभाजी शाहू छत्रपती (वर्तमान राज्यसभा सदस्य) हे या मंडळाचे अध्यक्ष असतील. राज्य शासनाने जून 2016 मध्ये किल्ल्यासाठी 500 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता.
Q.7) उत्तरप्रदेश शासनातर्फे कोणत्या दोन शहरांमध्ये नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आली?
A) वाराणसी आणि लखनऊ
B) मथुरा आणि अयोद्धा
C) आग्रा आणि कानपूर
D) वाराणसी आणि आग्रा
उत्तर : C) आग्रा आणि कानपूर
स्पष्टीकरण : उत्तरप्रदेश राज्य शासनातर्फे आग्रा आणि कानपूर या शहरांमध्ये नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राज्यात पूर्वांचल आणि बुंदेलखंड या दोन द्रुतगती मार्गांच्या विकासाची योजना तयार होत आहे.
Q.8) कोणत्या राज्यात विंचूची "लीचेल्स स्कॉलरी" नामक एक नवीन प्रजाती शोधण्यात आली?
A) मणीपुर
B) आसाम
C) हिमाचल प्रदेश
D) त्रिपुरा
उत्तर : D) त्रिपुरा.
स्पष्टीकरण : संशोधकांना त्रिपुरामध्ये विंचूची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे. या नव्या प्रजातीला "लीचेल्स स्कॉलरी" हे नाव देण्यात आले आहे. शास्त्रज्ञ झीशान मिर्झा (राष्ट्रीय जीवशास्त्र केंद्र, बंगaलोर) यांनी या नव्या प्रजातीचा शोध घेतला. ही प्रजाती सामान्यताः बटुक आकाराची असते. ते केवळ तीन सेंटीमिटर लांब असतात आणि जमिनीवर लहान बुरशीखाली राहतात, त्यामुळे त्यांना शोधणे फार कठीण असते.
Q. 9) कोणते शहर आपले स्वत:चे ब्रॅंड आणि बोधचिन्ह (Logo) असलेले भारतातले पहिले शहर ठरले?
A) मुंबई
B) अमरावती
C) दिल्ली
D) यापैकी नाही
उत्तर : D) यापैकी नाही
स्पष्टीकरण : कर्नाटकमधील बेंगळुरु हे असे भारतातले पहिले शहर ठरले आहे, ज्याच्याकडे आपली स्वत:ची ब्रॅंड ओळख आणि बोधचिन्ह (Logo) आहे. शहराच्या बोधचिन्हाला ‘बेंगळुरु – बी यू (Bengaluru - Be U)’ असे टॅगलाइन दिले आहे. बोधचिन्हात कन्नड आणि इंग्रजी भाषेतून साकारलेल्या बेंगळुरू या शब्दासह 180 अंशांची एक सरळ रेषा दर्शविण्यात आली आहे.
Q.10) कॅनडाच्या मॅक गिल विवीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की,
वनस्पतीमध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची
प्रक्रिया अंदाजे _______ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सुरू झाली असावी.
A) 4.25 अब्ज
B) 3.25 अब्ज
C) 2.25 अब्ज
D) 1.25 अब्ज
उत्तर : D) 1.25 अब्ज
स्पष्टीकरण : जगातले सर्वात प्राचीन शेवाळचे जीवाश्म जवळपास एक अब्ज वर्ष जुने असल्याचे संशोधनातून आढळून आले. त्यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, वनस्पतीमध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची (photosynthesis) प्रक्रिया अंदाजे 1.25 अब्ज वर्षांपूर्वी पहिल्यांदा सुरू झाली असावी. कॅनडाच्या मॅक गिल विवीच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानंतर हा शोध वनस्पती आणि प्राण्यांसह पेशीयुक्त जीवांच्या म्हणजेच युकेरियॉट्सच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीबाबत अधिक स्पष्ट आकलन करण्यासाठी संशोधकांना सक्षम करणार.
आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी
देऊन ठेवलाय…Thought By MPSC GUIDE
