दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०४

जनरल नॉलेज


Q.1) राज्यसभेत मंजुरीत ‘कंपनी (दुरूस्ती) विधेयक-2017’ कोणत्या कायद्यात सुधारणा करणार?
A) कंपनी अधिनियम-2010
B) कंपनी अधिनियम-2011
C) कंपनी अधिनियम-2012
D) कंपनी अधिनियम-2013
उत्तर : D) कंपनी अधिनियम-2013
स्पष्टीकरण : राज्यसभेत ‘कंपनी (दुरूस्ती) विधेयक-2017’ मंजूर करण्यात आले आहे. कंपनी अधिनियम-2013 मध्ये दुरूस्ती करणारे हे विधेयक कॉरपोरेट क्षेत्रात सुशासनासंबंधी मानदंड बळकट करून डिफॉल्टर कंपनीविरोधात कडक कारवाई करण्याच्या तरतूदीसह देशात व्यवसायात सुलभता आणण्यास मदत करणारे आहे.


Q.2) डिसेंबरमध्ये केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने _______ व्यापारांवरील साठा व उलाढालीवरील मर्यादा उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
A) डाळ
B) साखर
C) कांदा
D) कडधान्य
उत्तर : B) साखर
स्पष्टीकरण : केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने साखर व्यापारांवरील साठा व उलाढालीवरील मर्यादा उठविण्याचा निर्णय घेतला आहे. 2017-18 या विपणन वर्षात भारतात साखरेचे 249 लाख टन उत्पादन घेतले गेले, जे की मागील वर्षात 203 लाख टन होते.


Q.3) राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) चे अध्यक्षीय न्यायमूर्ती यांचा कार्यकाळ 19 डिसेंबर 2018 रोजी संपला. त्यांचे नाव काय आहे?
A) स्वतंत्र कुमार
B) एच. एल. दत्तू
C) दीपक मिश्रा
D) लोकेश्वर सिंह
उत्तर : A) स्वतंत्र कुमार
स्पष्टीकरण : राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) चे अध्यक्षीय न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांचा कार्यकाळ 19 डिसेंबर 2018 रोजी संपला. 20 डिसेंबर 2012 रोजी स्वतंत्र कुमार यांच्या पाच वर्षांच्या काळासाठी NGT च्या अध्यक्षपदी नेमणूक केली गेली होती. ते त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते.


Q.4) अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशात एकूण ______ मेगा फूड पार्क उभारण्यास मंजुरी दिली आहे.
A) 33
B) 40
C) 42
D) 12
उत्तर : C) 42
स्पष्टीकरण : अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशात एकूण 42 मेगा फूड पार्क उभारण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत नऊ मेगा फूड पार्क कार्यान्वित झाले आहेत आणि या आर्थिक वर्षात आणखी सहा चालू करण्याचे लक्ष्य आहे आणि पुढील आर्थिक वर्षापर्यंत ही संख्या 12 वर आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे.


Q.5) मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. सिंह कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
A) हिमाचल प्रदेश
B) पंजाब
C) आसाम
D) गुजरात
उत्तर : A) हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्यामध्ये अलीकडेच झालेल्या नवीन विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन होईपर्यंत सिंह आणि त्यांचे मंत्रिमंडळ काळजीवाहू म्हणून कार्यरत राहणार.


Q.6) लोकसभेत मंजूर करण्यात आलेले ‘केंद्रीय रस्ता कोष (दुरूस्ती) विधेयक-2017’ कोणत्या कायद्यात सुधारणा सुचवते?
A) केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-2010
B) केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-2005
C) केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-2000
D) केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-1995
उत्तर : C) केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-2000
स्पष्टीकरण : संसदेचे कनिष्ठ सभागृह - लोकसभेत ‘केंद्रीय रस्ता कोष (दुरूस्ती) विधेयक-2017’ मंजूर करण्यात आले आहे. विधेयकामुळे राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी शासन केंद्रीय रस्ता कोषमधून वर्षाला 2339 कोटी रुपयांची रक्कम खर्च करू शकणार. विधेयक ‘केंद्रीय रस्ता कोष अधिनियम-2000’ मध्ये बदल करणार.


Q.7) कोणत्या राज्यात 16 ते 22 डिसेंबर 2017 या काळात भारतीय लष्कराचा ‘हमेशा विजयी’ हा युद्धाभ्यास आयोजित केला गेला?
A) राजस्थान
B) अरुणाचल प्रदेश
C) आसाम
D) गुजरात
उत्तर : A) राजस्थान
स्पष्टीकरण : भारतीय लष्कराच्या दक्षिण आदेशाने 16 ते 22 डिसेंबर 2017 या काळात राजस्थानमध्ये ‘हमेशा विजयी’ हा युद्धाभ्यास आयोजित केला आहे. या युद्धाभ्यासाचा उद्देश्य म्हणजे भू-वायु अश्या एकीकृत रूपाने प्रतिद्वंदीच्या क्षेत्रात आतमध्ये जाण्याच्या सशस्त्र दलाच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे आहे.


Q.8) ________ राज्य शासनाने राज्यातील गंगा नदीच्या काठावरील 187 वर्ष जुन्या ‘बाबूघाट’ ला सुशोभित करण्याचा आणि सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे.
A) ओडिशा
B) उत्तराखंड
C) उत्तरप्रदेश
D) यापैकी नाही
उत्तर : D) यापैकी नाही
स्पष्टीकरण : पश्चिम बंगाल राज्य शासनाने राज्यातील गंगा नदीच्या काठावरील 187 वर्ष जुन्या ‘बाबूघाट’ ला सुशोभित करण्याचा आणि सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे. ‘बाबूघाट’ हे कोलकातालगतचे राष्ट्रीय वारसा ठिकाण देखील आहे. याचे मूळ नाव ‘बाबू राज चंद्र घाट’ असे होते. 1830 साली राणी राशमोणी यांनी आपल्या पतीच्या स्मृतीत हा घाट बांधला.


Q. 9) ‘ओखी’ चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून किती वित्तीय मदत दिली जाणार आहे?
A) 400 कोटी रुपये
B) 500 कोटी रुपये
C) 157 कोटी रुपये
D) 325 कोटी रुपये
उत्तर : D) 325 कोटी रुपये
स्पष्टीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ओखी’ चक्रीवादळाने प्रभावित केलेल्या राज्यांची हानी आणि त्यांच्या पुनर्रचनेसाठी वित्तीय मदत जाहीर केली आहे. केंद्र शासनाकडून केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप यांना एकूण 325 कोटी रुपये आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये वित्तीय मदत दिली जाणार आहे. शिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वादळात नष्ट झालेल्या 1400 घरांची पुनर्बांधणी केली जाणार आहे, त्यासाठी भारत सरकार सहाय्य करणार.


Q.10) गुवाहाटीत खेळलेल्या ‘ज्युनियर नॅशनल्स’ स्पर्धेत अंडर-17 आणि अंडर-19 एकेरीचे विजेतेपद कोणत्या बॅडमिंटनपटूने जिंकले?
A) आकार्शी कश्यप
B) मालविका बन्सोड
C) वैदेही चौधरी
D) यापैकी नाही
उत्तर : A) आकार्शी कश्यप
स्पष्टीकरण : भारताची ज्युनियर बॅडमिंटनपटू आकार्शी कश्यप हिने गुवाहाटीत खेळण्यात आलेल्या ‘ज्युनियर नॅशनल्स’ स्पर्धेत अंडर-17 आणि अंडर-19 एकेरीचे विजेतेपद जिंकले. अंडर-17 गटात आकार्शी कश्यप हिने अंतिम फेरीत मालविका बन्सोडचा पराभव केला आणि अंडर-19 गटात वैदेही चौधरीला हरवले.



एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..
पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send