चालू घडामोडी : १५ डिसेंबर २०१७
भारत सर्व प्रांतांच्या संरक्षणासाठी सक्षम :
- 👉 भारतीय संरक्षण दल हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण प्रांतांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. समुद्रमार्गे सुरू असलेला दहशतवाद, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी, चाचेगिरी या आव्हानांशी लढा देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी काढले.
- 👉 पंतप्रधान मोदींच्या हस्ते गेल्या 15 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय बनावटीची 'कलवरी' या पाणबुडीचे 14 डिसेंबर रोजी राष्ट्रार्पण झाले. मुंबईत पार पडलेल्या या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संरक्षण दलाच्या कामाचे कौतुक केले.
- 👉 संपूर्ण विश्व हे एक कुटुंब असून या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भारताने पुढाकार घेतला आहे. परराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या वेळी सर्वप्रथम भारत धावून गेला आहे. यामुळे पाणबुडी विकासाचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ भारताचे संरक्षण हा मुद्दा लक्षात घेऊन केला नसून या संपूर्ण प्रांतांतील समुद्राचे संरक्षण करण्यासाठी आपण सक्षम आहोत, असे मोदी म्हणाले.
- 👉 तसेच यासाठी 'सागर' (SAGAR) हे धोरण आपण अधिक सक्षमपणे राबवीत आहोत. सागरचे पूर्ण स्वरूप 'सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन' असे आहे.
- अमरनाथ गुफेत कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत :
- 👉 अमरनाथ गुफेत मंत्रोच्चारांचे पठण करण्यास अथवा भजन करण्यासह कोणत्या प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असेराष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर'शांतता क्षेत्र' म्हणून जाहीर करण्याचा लवादाचा कोणताही हेतू नाही अथवा तसे घोषितही करण्यात आलेले नाही, असेही लवादाने स्पष्ट केले आहे.
- 👉 तथापि, कोणत्याही व्यक्तीने अथवा भक्ताने अमरनाथ गुफेत शिवलिंगासमोर उभे असताना शांतता पाळावी एवढेच निर्बंध लावादाने घातले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध अन्य कोणत्याही भागासाठी लागू नाहीत, असे लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी म्हटले आहे.
- 👉 तसेच गुफेकडे जाणाऱ्या अखेरच्या पायऱ्यांवर यात्रेकरूने कोणतेही साहित्य नेण्यास तेथील मंडळाने मज्जाव केला असून त्याचे पालन करावे, असेही लवादाने म्हटले आहे. अखेरच्या पायऱ्यांपूर्वी कोणतेही निर्बंध नसल्याचे लवादाने म्हटले आहे.
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरिंदर बात्रा :
- 👉 आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
- 👉 आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे 60 वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून, अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते.
- 👉 मात्र हे पत्र खन्ना यांनी 3 डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना 142 मते पडली, तर खन्ना यांना 13 मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.
ॲथलेटिक्स सायली वाघमारेने इतिहास रचला :- 👉 ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मातीच्या मैदानावर सराव करणाऱ्या सायली वाघमारेने आचार्य नागार्जुना विद्यापीठाच्या यजमानपदाखाली गुटूंर येथे आयोजित 78 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. तिने विपरीत परिस्थितीत ही कामगिरी करताना उडणपरी पी.टी. उषाची शिष्य अबिता मेरी मॅन्युअलवर मात केली.
- 👉 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायलीने 14 डिसेंबर रोजी झालेल्या अतिशय चुरशीच्या अंतिम फेरीत दोन मिनिटे 09.90 सेकंद इतकी वेळ नोंदवित पहिल्यांदाच सुवर्णपदकावर नाव कोरले.
- 👉 तसेच सायलीने यापूर्वी मॅंगलोर (2015-16) व कोईम्बतूर (2016-17) मध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदके जिंकली होती. चौथ्या प्रयत्नात सुवर्ण जिंकणाऱ्या सायलीने मॅंगलोर येथील स्पर्धेत नोंदविलेल्या (2:11:01 सेकंद) या वेळेत सुधारणा करताना करिअरमधील सर्वोत्तम वेळेची नोंद केली.
ब्रॅड हॉज 'किंग्ज इलेव्हन पंजाब'च्या प्रशिक्षकपदी :- 👉 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी 'किंग्ज इलेव्हन पंजाब' संघाच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॉज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये ब्रॅड हॉज 'गुजरात लायन्स'चे प्रशिक्षक होते. हा संघ आता आगामी 'आयपीएल'मध्ये नसेल.
- 👉 हॉज यांच्या मार्गदर्शनाखाली 'गुजरात लायन्स'ने 2016 मध्ये गुणतक्त्यात पहिले स्थान पटकाविले होते; पण यंदा या संघाला चारच विजय मिळविता आले. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये 'गुजरात लायन्स'गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानी होते.
- 👉 42 वर्षीय हॉज यांना प्रशिक्षणात साह्य करण्यासाठी दिल्लीचा माजी फलंदाज मिथून मन्हास आणि जे. अरुणकुमार यांचीही निवड झाली आहे.'किंग्ज इलेव्हन पंजाब'चे संचालक म्हणून भारताचे माजी सलामीवीरवीरेंद्र सेहवाग काम पाहत आहेत. संजय बांगर यांची भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने त्यांनी पंजाबच्या संघाचे प्रशिक्षकपद गेल्या वर्षी सोडले. त्यामुळे गेल्या वर्षी सेहवाग यांनीच धुरा सांभाळली होती.
दिनविशेष : - 👉 सन 1903 मध्ये 15 डिसेंबर रोजी 'स्वामी स्वरुपानंद' यांचा जन्म झाला.
- 👉 15 डिसेंबर 1950 हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री 'सरदारवल्लभभाई पटेल' यांचा स्मृतीदिन आहे.
- 👉 15 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश स्वतंत्र झाला.
- 👉 चित्रपट दिगदर्शक 'सत्यजित रे' यांना सन 1991 मध्ये 15 डिसेंबर रोजीऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
स्वदेशी बनावटीच्या आयएनएस कलवरी पाणबुडीचे लोकार्पण
- ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे १४ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले.
- नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखलझाली.
- आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. भारताची सुरक्षा आणि स्थिरतेमध्ये कलवरी महत्वाची भूमिका पार पाडेल.
- मोदींनी भारताच्या पाणबुडी विकास कार्यक्रमाला सागर (SAGAR - Security And Growth for All in the Region) हे विशेष नाव दिले आहे.
स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव
- लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
- नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत असेल.
- लोकसभेचे विद्यमान मुख्यसचिव अनुप मिश्रा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले, त्यानंतर १ डिसेंबर रोजी श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला.
- स्नेहलता श्रीवास्तव या १९८२च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
- त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
- श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
- लोकसभेच्या महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभेत रमा देवी या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा मंजूर
- मुस्लिम धर्मियांमध्ये प्रचलित असलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवलेल्या तिहेरी तलाक पद्धतीविरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.
- ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१७’ असे या तिहेरी तलाक पद्धतीविरोधातील कायद्याचे नाव आहे.
- गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांच्या मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे.
- या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही प्रकारे (तोंडी, लिहून, ई-मेलद्वारे, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप) तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
- हा गुन्हा दंडात्मक आणि अजामीनपात्र असणार आहे. जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू होईल.
- हे विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल.
- सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला बेकायदा ठरवत त्यावर ६ महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते.
वैद्यकीय शिक्षणासाठी नवा नियामक
- वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७’च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे सध्याची ‘राष्ट्रीय वैद्यकीय परिषद’ (एमसीआय) मोडीत काढली जाणार आहे.
- रणजीत रॉय चौधरी समितीच्या शिफारशी तसेच संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार हा आयोग स्थापन केला जात आहे.
- या आयोगाचा अध्यक्ष आणि काही सदस्य हे सरकारनियुक्तअसतील. ५ सदस्य हे निवडणुकीतून निवडले जातील, तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.
नासाकडून नव्या सूर्यमालेचा शोध
- अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने नव्या सूर्यमालेचा शोधलावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे.
- या सूर्यमालेत ८ ग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणे या सूर्यमालेतही ‘केप्लर ९०’ नावाच्या एका ताऱ्याभोवती हे ग्रह फिरत आहेत.
- पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २,५४५ प्रकाश वर्षे लांब आहे, तर पृथ्वीच्या तुलनेत ती ३० टक्क्यांनी मोठी आहे.
- सध्या नासा गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेते आहे. त्या मोहिमेंतर्गत हा नवीन शोध लागला आहे.
