MPSC परिक्षेचे स्वरुप (Detailed explanation of MPSC exam format)


 MPSC परिक्षेचे स्वरुप 
(Detailed explanation of MPSC exam format)
  • राज्य लोकसेवा आयोग मार्फत राज्यातील विविध विभागातील Class 1, 2 आणि class 3 श्रेणीची पदे भरली जातात. राज्यातील सरकारी Engineers, Doctors तसेच Govt. कॉलेज मधील professors सुद्धा MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षेतून निवडले जातात.
  • राज्यातील प्रशासन सांभाळण्यासाठी जे महत्वाचे अधिकारी उदा.उपजिल्हाधिकारी (Dy.collector) , तहसीलदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपाधीक्षक ( Dy.SP) असतात त्यांची निवड ही MPSC च्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून होते. 
  • आणि PSI, STI, ASO म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ही class 2 ची पदे दुय्यम सेवा ( Combine) परीक्षे मार्फत भरली जातात.
MPSC राज्यसेवा परीक्षा 3 टप्यात घेतली जाते.
  1. पहिला टप्पा — पूर्व परीक्षा Prelims(400 marks)
  2. दुसरा टप्पा — मुख्य परीक्षा mains (800 marks)
  3. तिसरा टप्पा – Interveiw (100 marks)
यातील मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण अंतिम यादीसाठी विचारात घेतले जातात. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम यादीत ग्राह्य नसतात फक्त मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेचे महत्व आहे.


MPSC परीक्षेच्या पात्रता

राज्यसेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षा देण्यासाठी कोणताही वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. परंतु मुख्य परीक्षा द्यायची असेल तर मात्र तुम्हाला काही अटी लागू होतात.
  1. वय वर्ष 21 पूर्ण असावे.
  2. पदवी चे शिक्षण पूर्ण झालेले असावे, म्हणेज तुम्ही Graduate असले पाहिजे. 
  3. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असलेले विध्यार्थी सुद्धा मुख्य परीक्षा देऊ शकतात. परंतु त्यांच्या final निकाल मुख्य परीक्षेच्या आधी जाहीर झालेला असावा लागतो.
  4. RTO या पदासाठी अभियांत्रिकी किंवा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान शाखेतील पदवी असावी.
  5. कोणत्याही क्षेत्रातीलपदवी असली तरी चालते.( सरकार मान्य विदयापीठाची ) सरकार मान्य मुक्त विदयापिठाची पदवी सुद्धा ग्राह्य आहे. (मुक्त विदयापिठाला आणि त्या पदवीच्या कोर्स ला UGC ची मान्यता असणे गरजेचे आहे. बाजारात बऱ्याच संस्था एका वर्षात UGC मान्य डिग्री देतात पण ही अशी डिग्री MPSC ला चालत नाही, पुढे verification च्या वेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता अशा डिग्री घेऊ नयेत.)
वयोमर्यादा :
  1. उमेदवार कमीत कमी 19 वर्ष पूर्ण असलेला असावा .
  2. आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा खालील प्रमाणे:
  3. OPEN – साधारण प्रवर्गासाठी (open category) साठी वयोमर्यादा कमीत कमी 19 वर्षे ते जास्तीत जास्त 38 वर्षे एवढी आहे.
  4. OBC/SC – अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे एवढी आहे.
  5. PH candidate – अपंग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे एवढी आहे..
  6. पात्र खेळाडूंसाठी वयोमर्यादा 38 वर्षे एवढी आहे.
 शारीरिक पात्रता -
1) पोलीस उपअधीक्षक गट-अ -
पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 165 सें.मी. (अनवाणी) छाती - 84 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. आवश्यक + उंची - 157 सें.मी. (अनवाणी)

2) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब -

पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 165 सें.मी. (अनवाणी) छाती - 79 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. आवश्यक + उंची - 155 सें.मी. (अनवाणी)

3) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब -

पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 163 सें.मी. (अनवाणी) छाती - 79 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. रंगांधळेपणा नसावा + उंची - 163 सें.मी. कमीत कमी रंगांधळेपणा नसावा.


पूर्व परीक्षा


पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो.यामध्ये चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.तसेच ते उमेदवारांना कळविले जात नाहीत.

प्रश्नपत्रिका : दोन अनिवार्य
प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे

पेपर प्रश्न संख्या गुण दर्जा माध्यम कालावधी पेपरचे स्वरूप
सामान्य अध्ययन१००२००पदवीमराठी व इंग्रजीदोन तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
कलचाचणी (CSAT८०२००पदवीमराठी व इंग्रजीदोन तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
पेपर १ : सामान्य अध्ययन
  1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्रामप्रशासन
  3. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी,जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,पर्जन्यमान,प्रमुख पिके,शहरे,नद्या,उद्योगधंदे इत्यादी.
  5. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग,परकीय व्यापार,बँकिंग,लोकसंख्या,दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इ.
  6. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र(केमिस्ट्री), प्राणीशास्त्र(झुलॉजी), वनस्पतीशास्त्र(बॉटनी)
  7. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
या विषयांवरील येणार्‍या प्रश्नांचे प्रमाण बदलत असते.
 - एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच हा पेपर 200 गुणांचा असतो.
 - या पेपरसाठी 2 तास वेळ असतो आणि हा पेपर सकाळच्या सत्रात घेतला जातो.
 - प्रत्येक चूक प्रश्नासाठी एक-तृतीयांश एवढ्या गुणांची कमी केले जातात.

पेपर २ :कलचाचणी (CSAT) सामान्य अध्ययन पेपर-2 

  1. आकलनक्षमता (पदवी स्तर)
  2. संभाषण कौशल्याच्या समावेशासह आंतरवैयक्तिक क्षमता (पदवी स्तर)
  3. तर्क अनुमान आणि विश्लेषण क्षमता (पदवी स्तर)
  4. निर्णय घेऊन समस्या निराकरण क्षमता (पदवी स्तर)
  5. सामान्य बुद्धिमापन क्षमता (पदवी स्तर)
  6. मुलभूत अंकगणित (अंक व त्यांचे संबंध,घातांक,पदावल्या इ.)
  7. माहितीचे आकलन (आलेख सारणी,तक्ते इ.)-(दहावी स्तर)
  8. मराठी आणि इंग्रजी आकलनक्षमता (दहावी/बारावी स्तर)
या पेपरमध्ये प्रत्येकी 80 प्रश्न असतात. 
 - प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण दिले जातात. म्हणजेच एकूण 200 गुण.
 - प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 गुण वजा केले जातात. (Negative Marking) 
 - या पेपरमध्ये चांगले गुण येण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित असते. 
 - निर्णयक्षमतेवरील प्रश्नांना (Negative Marking) पद्धत लागू नाही. 
 - पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये एकूण 400 गुणांची ही परीक्षा असते.
 - या दोन्ही पेपरमध्ये एकत्रितपणे जास्तीत जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरतात.

  टीप: राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मुल्यांकनाकरता उमेदवाराने दोन्ही पेपर्सना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.अन्यथा उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. या परीक्षेतील पेपर क्र.दोन मधील निर्णय घेऊन समस्या निराकरण क्षमता या घटकाच्या चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येत नाहीत.

मुख्य परीक्षा

पहिला टप्पा पार केल्यानंतर हा टप्पा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो.
 - ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची आहे.
 - अंतिम निवड यादी ठरविताना मुख्य परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
 - या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/3 मार्क कापले जातात. (Negative Marking)

मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी व मराठी भाषांचे पेपर लेखी स्वरूपाचे तर सामान्य अध्ययन विषयाचे पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतात.

लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप प्रश्नपत्रिकांची संख्या : सहा
प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :
अ.क्र. विषय गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 मराठी १०० उच्च माध्यमिक शालांत मराठी ३ तास पारंपारिक
2 इंग्रजी १०० उच्च माध्यमिक शालांत इंग्रजी ३ तास पारंपारिक
3 सामान्य अध्ययन-1 १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
4 सामान्य अध्ययन-2 १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
5 सामान्य अध्ययन-3 १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
6 सामान्य अध्ययन-4 १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


  • वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात.
  •  प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण प्राप्त गुणांमधून वजा केले जातात. 
  • २०१३ पासून आयोगाने शतमत (पर्सेंटाईल) पद्धत लागू केली आहे.यानुसार प्रत्येक विषयात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास सर्वोत्कृष्ठ गुणप्राप्त उमेदवाराच्या ३५ टक्के पर्यंत,मागासवर्गीय उमेदवाराना ३०टक्के पर्यंत तर अपंग व खेळाडूना २० टक्के पर्यंत गुण प्राप्त होणे आवश्यक असते.
  • शतमत पद्धत फक्त मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक पटीत उमेदवार ठरविण्यापुरतीच आहे.
  • अंतिम निकाल व निवड उमेदवारांना लेखी व तोंडी परीक्षेत मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांच्या बेरजेवर व त्यानुसार येणारया उमेदवारांच्या गुनानुक्रमानुसारच ठरते.
मुलाखत:  मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांच्या आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात. अंतिम निकाल : मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते.

Archive

Contact Form

Send