जनरल नॉलेज २४ मार्च २०२०
जनरल नॉलेज
Q.1)भारताने कोणत्या देशासह 'रियुनियन बेट' पासून गस्त घातली?
A) संयुक्त राज्य अमेरिका
B) ब्रिटन
C) फ्रान्स
D) इटली
उत्तर : C) फ्रान्स
स्पष्टीकरण : हिंद महासागरातली आपली उपस्थिती वाढविण्यासाठी आणि परदेशी भागीदारांशी संबंध सुधारण्यासाठी भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी पूर्व आफ्रिका किनारपट्टीजवळच्या ' रियुनियन बेट' पासून ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत गस्त घातली.
A) संयुक्त राज्य अमेरिका
B) ब्रिटन
C) फ्रान्स
D) इटली
उत्तर : C) फ्रान्स
स्पष्टीकरण : हिंद महासागरातली आपली उपस्थिती वाढविण्यासाठी आणि परदेशी भागीदारांशी संबंध सुधारण्यासाठी भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी पूर्व आफ्रिका किनारपट्टीजवळच्या ' रियुनियन बेट' पासून ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत गस्त घातली.
Q.2) 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' याचे नेतृत्व कोण करणार आहे?
A) गृहमंत्री
B) अर्थमंत्री
C) संरक्षणमंत्री
D) पंतप्रधान
उत्तर : B) अर्थमंत्री
स्पष्टीकरण : कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांच्या नेतृत्वात 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली.
Q.3) मे 2020 या महिन्यात कोणती अंतराळ संस्था आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर पाठविणार आहे?
A) भारतीय अंतराळ संशोधन संस्था
B) युरोपियन स्पेस एजन्सी
C) ब्ल्यु ऑरिजिन
D) स्पेसएक्स
उत्तर : D) स्पेसएक्स
स्पष्टीकरण :एलॉन मस्क यांनी स्थापना केलेली अमेरिकेची खासगी अंतराळ संस्था असलेल्या स्पेसएक्स या कंपनीने मे 2020 या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अंतराळवीर पाठविणार असल्याची योजना जाहीर केली आहे. एखाद्या खासगी कंपनीकडून पहिल्यांदाच मानवी अंतराळ मोहीम राबवली जाणार आहे. NASAचे अंतराळवीर डग हर्ली आणि बॉब बेहनकेनला ISS वर पाठवले जाणार.
Q.4) 18 मार्च 2020 रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची संकल्पना काय होती?
A) रीसायकलिंग हीरोज
B) रीसायकलिंग इंटू द फ्युचर
C) रीसायकलिंग फॉर ए बेटर टूमॉरो
D) रीसायकलिंग टू कीप द प्रेझेंट
उत्तर : A) रीसायकलिंग हीरोज
स्पष्टीकरण : 18 मार्च 2020 रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची 'रीसायकलिंग हीरोज' ही संकल्पना होती
Q.5) कोणता देश भारतासह कोलिशन फॉर डिझास्टर रेजिलीएन्ट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) या आंतरराष्ट्रीय युतीचा प्रथमच सह-अध्यक्ष असणार?
A) संयुक्त राज्य अमेरिका
B) फ्रान्स
C) ब्रिटन
D) भुटान
उत्तर : C) ब्रिटन
स्पष्टीकरण : 2020 या वर्षी ब्रिटन भारतासह कोलिशन फॉर डिझास्टर रेजिलीएन्ट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) या आंतरराष्ट्रीय युतीचा प्रथमच सह-अध्यक्ष असणार. CDRI युतीची स्थापना 2017 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
Q.6) 2020 या साली जागतिक हवामान दिनाची संकल्पना काय आहे?
A) वर्ल्ड अँड वॉटर
B) क्लायमेट अँड वॉटर
C) ह्यूमन अँड वॉटर
D) वॉटर: सस्टेनेबिलिटी इंटू द फ्युचर
उत्तर : B) क्लायमेट अँड वॉटर
स्पष्टीकरण : दरवर्षी 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. 2020 या साली जागतिक हवामान दिनाची 'क्लायमेट अँड वॉटर' ही संकल्पना आहे.
Q.7) कोणत्या देशाने राष्ट्रपती अल्फा कॉन्डे यांच्या राजवटीचा कार्यकालावधी वाढविण्यासंबंधी जनमत घेण्याचे ठरविले?
A) गिनी
B) लाइबेरिया
C) सेनेगल
D) सिएरा लिओन
उत्तर : A) गिनी
स्पष्टीकरण : आफ्रिकेमधल्या गिनी देशाच्या सरकारने राष्ट्रपती अल्फा कॉन्डे यांच्या राजवटीचा कार्यकालावधी आणखी एक वर्षासाठी वाढविण्यासंबंधी जनमत घेण्याचे ठरविले.
Q.8) कोणत्या राज्याने 'ई-नाईट बीट' तपासणी यंत्रणा अंमलात आणली आहे?
A) हिमाचल प्रदेश
B) कर्नाटक
C) उत्तराखंड
D) मध्यप्रदेश
उत्तर : A) हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण : हिमाचल प्रदेश राज्य सरकारने 19 मार्च 2020 रोजी शिमला येथे हिमाचल प्रदेश पोलीसांसाठी 'ई-नाईट बीट' तपासणी यंत्रणा अंमलात आणण्यास सुरुवात केली. पोलीस कार्य कार्यक्षम पद्धतीने करण्याच्या हेतूने ही यंत्रणा काम करते.
Q. 9) मोठ्या प्रमाणात औषधी निर्मिती उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या हेतूने भारत सरकारने जास्तीत जास्त ________ रुपायांपर्यंत राज्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले.
A) 500 कोटी
B) 1000 कोटी
C) 3000 कोटी
D) 800 कोटी
उत्तर : B) 1000 कोटी
स्पष्टीकरण : मोठ्या प्रमाणात औषधी निर्मिती उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या हेतूने भारत सरकारने जास्तीत जास्त 1000 कोटी रुपायांपर्यंत राज्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले. हा निधी पुढच्या पाच वर्षांपर्यंत दिला जाणार आहे.
Q.10) कोणत्या बँकेनी चलनातली तरलतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन पतमर्यादा जाहीर आहे?
A) ICICI बँक
B) भारतीय रिझर्व्ह बँक
C) HDFC बँक
D) भारतीय स्टेट बँक
उत्तर : D) भारतीय स्टेट बँक
स्पष्टीकरण : ‘भारतीय स्टेट बँकेनी चलनातली तरलतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन पतमर्यादा जाहीर आहे. बँक 30 जून 2020 पर्यंत 200 कोटी रुपयांचा निधी पुरविणार.
Q.11) ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट _____ यासाठी प्रसिध्द आहे.
A) सुंदरबनचे वाघ
B) ऑलिव्ह रिडले कासव
C) मगरी
D) ब्ल्यु जे
उत्तर : B) ऑलिव्ह रिडले कासव
स्पष्टीकरण : जगात आढळणार्या सर्व समुद्री कासवांमध्ये सर्वात विपुल आणि सर्वात लहान आकार असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाचे वैज्ञानिक नाव लेपिडोचेलिस ऑलिव्हसीया आहे. ही प्रजाती हिंद, प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या उबदार पाण्यात आढळतात. प्रजनन काळात हजारो मादी समुद्रकिनार्यावर अंडी देण्यासाठी एकत्र येतात. भारताच्या ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट या घटनेसाठी प्रसिध्द आहे.
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
"भगवत गीता" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...
