चालू घडामोडी ०५ नोव्हेंबर २०१९

चालू घडामोडी ०५ नोव्हेंबर २०१९ 


Q.1) पुढील विधानांना विचारात घ्या.
1. सरकार निर्भया निधीच्या मदतीने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मानव-तस्करीविरोधी’ एककांची स्थापना करणार.
2. महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणारे सरकार उपक्रम आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारकडून 2013 साली निर्भया निधीची घोषणा करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
A) केवळ (1)
B) केवळ (2)
C) (1) आणि (2) दोन्ही
D) एकही नाही
उत्तर : विधान (1) आणि (2) अचूक असल्याने पर्याय (C) उत्तर आहे.
केंद्र सरकारने निर्भया निधीच्या मदतीने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मानव-तस्करीविरोधी एककांची (anti-human trafficking units) स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Q.2) ताश्केंत या शहराजवळ चिरचीक येथे भारत आणि उझबेकिस्तान यांचा _________ या नावाने संयुक्त लष्करी सराव सुरू झाला.
A) इकुव्हेरिन 2019
B) डस्ट्लिक 2019
C) शक्ती 2019
D) मैत्री 2019
उत्तर :  झबेकिस्तानची राजधानी ताश्कंद या शहराजवळ चिरचीक येथे भारत आणि उझबेकिस्तान यांचा   डस्ट्लिक 2019  या नावाने संयुक्त लष्करी सराव सुरू झाला. उझबेकिस्तान हा मध्य आशियातला एक देश आहे. हा देश कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांसोबत सीमा सामायिक करतो. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी आहे आणि उझबेकिस्तानी सोम हे राष्ट्रीय चलन आहे.

Q.3) _____ ने जापानच्या टोकियो या शहरात मुष्टियुद्ध या खेळासाठीच्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
A) शिव थापा
B) आशिष
C) बाबूराव
D) अक्षय
उत्तर :  शिव थापा आणि पूजा राणी यांनी मुष्टियुद्ध या खेळासाठी जापानच्या टोकियो या शहरात खेळवल्या गेलेल्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.


Q.4) ______ ह्याने जापानमधल्या 82 व्या विजयासह PGA टूरवरील कारकीर्दीतल्या सर्वाधिक विजयांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
A) टायगर वुड्स
B) मत्सुयामा
C) बाबर अली
D) बोरिस ख्रिश्चन
उत्तर : टायगर वुड्सने जापानमध्ये झालेल्या झोझो अजिंक्यपद 2019या गोल्फ स्पर्धेच्या त्यांच्या 82 व्या विजयासह PGA टूरवरील कारकीर्दीतल्या सर्वाधिक विजयांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्यांनी 54 वर्षांपूर्वी सॅम स्नेड यांनी केलेल्या विक्रमाची बरोबरी केली.

Q.5) _____ या संघाने रग्बी विश्वचषक 2019 जिंकला.
A) भारत
B) संयुक्त राज्ये अमेरिका
C) दक्षिण आफ्रिका
D) इंग्लंड
उत्तर : दक्षिण आफ्रिका रग्बी विश्वचषक 2019 या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिका तिसर्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवले.



Archive

Contact Form

Send