Maharashtra General knowledge MCQ
महाराष्ट्र सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न संग्रह ०१
Q.1) मराठवाडयाचा विभाग कोणत्या संस्थानातून वेगळा करण्यात येऊन महाराष्ट्रात सामील करण्यात आला?
A) मध्य प्रांत
B) मराठवाडा
C) गुजरात
D) हैदराबाद
उत्तर :- D) हैदराबाद
स्पष्टीकरण:- 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. - विदर्भ मध्य प्रांतातून वेगळा करून महाराष्ट्रात सामील करण्यात आला.- मराठवाडा हैदराबाद संस्थानातून वेगळा करून महाराष्ट्रात सामील करण्यात आला.- गुजराती भाषिक प्रदेश नव्या गुजरात राज्यात समाविष्ट झाला. - बेळगाव-कारवारचा मराठी भाषिक प्रदेश कर्नाटक राहिला.
Q.2) खालीलपैकी कोणी महाराष्ट्राला मल्लराष्ट्र- असे संबोधले आहे?
A) जॉन विल्सन.
B) ओपर्ट.
C) वसंतराव चव्हाण.
D) वसंतराव नाईक.
उत्तर:- B) ओपर्ट
स्पष्टीकरण: जॉन विल्सन यांनी महार + राष्ट्र - महाराष्ट्र अशी व्युत्पत्ती सुचविली आहे. ओपर्ट यांनी लिहिलेल्या ’भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या ग्रंथात महाराष्ट्राला मल्लराष्ट्र असे म्हटले आहे.
Q.3) मँगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे?
A) दुसरा
B) तिसरा
C) चौथा
D) पाचवा
उत्तर: A)दुसरा
स्पष्टीकरण:- भारतातील 08 टक्के मँगनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश यानंतर महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागतो. मँगनीजच्या उत्पादनात मात्र महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशातील मॅगनीजच्या एकूण उत्पादनापैकी 24 टक्के उत्पादन होते
Q.4) पुळणी या संज्ञेबद्दल विधाने लक्षात घ्या खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
1. समुद्रकिना-याजवळ वाळूच्या पट्याला पुळण (Beach) अशी संज्ञा आहे.
2. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतिपुळे येथे निर्माण झालेल्या पुळणी पर्यटकांची आकर्षण ठरली आहेत
A) विधान 1 सत्य आहे
B) विधान 1 व 2 सत्य आहेत
C) फक्त विधान 1 असत्य आहे
D) फक्त विधान 2 असत्य आहे
उत्तर :- B) विधान 1 व 2 सत्य आहेत
स्पष्टीकरण:- अशा लहान-मोठ्या अनेक पुळणी कोकण किनारपट्टीत आहेत. पर्यटनदृष्ट्या या पुळणींना विशेष महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ तारकर्ली येथील पुळणी पर्यटकांचे आकर्षण आहेत
Q.5) खालील विधाने लक्षात घ्या व त्यातील अचूक पर्याय निवडा.
1. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लहान-मोठी 49 बंदरे आहेत.
2. 46 बंदरे लहान आहेत.
3. मुंबई व न्हावाशेवा ही दोन मोठी बंदरे आहेत.
4. मुंबई सर्वांत मोठे नैसर्गिक बंदर आहे
A) विधान 1 व 3 असत्य आहे
B) विधान 1 व 2 सत्य आहेत
C) सर्व विधाने सत्य आहेत
D) फक्त विधान 1 व 2 असत्य आहेत
उत्तर :- D) फक्त विधान 1 व 2 असत्य आहेत
स्पष्टीकरण:- महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लहान-मोठी 50 बंदरे आहेत - 48 बंदरे लहान आहेत. मुंबई व न्हावाशेवा ही दोन मोठी बंदरे आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लहान-मोठी 50 बंदरे आहेत. 48 बंदरे लहान आहेत. मुंबई व न्हावाशेवा ही दोन मोठी बंदरे आहेत. मुंबई सर्वांत मोठे नैसर्गिक बंदर आहे.
Q.6) कोणत्या दिशेस सहयाद्रिची रुंदी जास्त दिसून येते?
A) उत्तर
B) दक्षिण
C) पूर्व
D) पश्चिम
उत्तर :- A) उत्तर
स्पष्टीकरण:- पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे. पश्चिम घाटालाच महाराष्ट्रात ‘सह्याद्री’ असे संबोधतात. पश्चिम घाटाची एकूण लांबी 1,600 कि. मी. आहे. महाराष्ट्रात याची लांबी 640 कि. मी. आहे उत्तरेस सह्याद्रीची रुंदी जास्त असून दक्षिणेस ती कमी आहे.
Q.7) महाबळेश्वर हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे?
A) दुसरे.
B) तिसरे.
C) चौथे.
D) पाचवे.
उत्तर :- B) तिसरे.
स्पष्टीकरण:- कळसूबाई हे सह्य पर्वतरांगातील राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाईची उंची 1,646 मीटर आहे. साल्हेर 1567 मीटर उंचीचे दुसरे राज्यातील उंच शिखर आहे. महाबळेश्वर 1438 मीटर उंचीचे राज्यातील तिस-या क्रमांकाचे उंच शिखर आहे.
Q.8) कोल्हापूर-गगन बावडा-राजापूर मार्ग कोणत्या घाटातून जातो?
A) पसरणी घाट.
B) कुंभार्ली घाट.
C) करूळ घाट.
D) वरंधा घाट.
उत्तर :- C) करूळ घाट.
स्पष्टीकरण:- पसरणीघाट : वाई-पाचगणी रस्ता या घाटातून जातो.
वरंधा घाट : पुणे-महाड रस्ता या घाटामधून जातो.
कुंभार्लीघाट : कराड-पाटण-चिपळूण हा मार्ग या घाटातून जातो.
करूळघाट : कोल्हापूर-गगन बावडा-राजापूर मार्ग या घाटातून जातो
Q.9) (a) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस सातमाळा-अजिंठा डोंगररांगा गेल्या आहेत.
(b) या डोंगररांगांची सर्वसामान्य उंची 200 ते 300 मीटर इतकी आहे.
A) विधान 1 सत्य आहे
B) विधान 1 व 2 सत्य आहे
C) फक्त विधान 1 असत्य आहे
D) फक्त विधान 2 असत्य आहे
उत्तर :- B) विधान 1 व 2 सत्य आहे
स्पष्टीकरण:- या डोंगररांगा पश्चिम-पूर्व दिशेत पसरल्या आहेत. या डोंगररांगा नाशिक, मंदिरात, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम व नांदेड अशा यवतमाळ जिल्ह्यापर्यंत गेल्या आहेत.
Q.10) महाराष्ट्राचे पठाराबद्दल खालील विधाने लक्षात घेऊन (no problem) अचूक विधानांचा शोध घ्या?
(a) महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनापासून झाली आहे.
(b) महाराष्ट्र पठारावर अग्निजन्य खडक (Igneous Rocks) आढळतात.
A) विधान 1 सत्य आहे
B) दोन्ही विधाने सत्य आहेत
C) फक्त विधान 1 असत्य आहे
D) फक्त विधान 2 असत्य आहे
उत्तर :- B) दोन्ही विधाने सत्य आहेत
स्पष्टीकरण:- या खडकामध्ये भू-पृष्ठावर किंवा कमी खोलीवर आढळणारे असिताश्म (Basalt) व कृष्णप्रस्तर (Granite) हे दोन प्रकार प्रमुख आहेत. या खडकांचा उपयोग इमारती, रस्ते व धरणे बांधण्यासाठी केला जातो.
