चालू घडामोडी : ०७ ऑक्टोंबर २० १८

राष्ट्रीय

  • प्रधान मंत्री ग्रामीण रस्ते कार्यक्रमाच्या (PMGSY) अंतर्गत भारतात या राज्यांमधील सुमारे 12,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) सोबत करार झाला आहे - आसाम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल.
  • कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने या संघटनेच्या सहकार्याने भारतामधील कौशल्य तफावत कमी करण्यासाठी कार्यदल स्थापन केले - जागतिक आर्थिक मंच (WEF).
  • या राज्याच्या पेट्रो-केमिकल्स कंपनीने 5 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला "मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम" सुरू केला - आसाम.
  • महाराष्ट्राच्या या फळाला भौगोलिक संकेतांक (GI) टॅग मिळाले आहे - अल्फांसो (हापूस) जातीचा आंबा.

आंतरराष्ट्रीय

  • 5 ऑक्टोबर रोजी झालेला ‘जागतिक शिक्षक दिन 2018’ याचा विषय - द राइट टू एज्युकेशन मीन्स द राइट टू ए क्वालिफाइड टीचर”.
  • भारताने चार S-400 'ट्रायंफ' क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी या देशासोबत करार केला – रशिया.
  • 3-5 ऑक्टोबर 2018 रोजी या ठिकाणी प्रथम ‘भारत-इंडोनेशिया परस्पर विश्वास संवाद’ (India Indonesia Interfaith Dialogue -IIID) याची बैठक आयोजित करण्यात आली - योगयाकार्टा, इंडोनेशिया.

क्रिडा

  • या ठिकाणी 43व्या बुद्धिबळ ऑलंपियाड या क्रिडास्पर्धेचे आयोजन आयोजन केले गेले - बातुमी, जॉर्जिया.
  • विश्व स्क्वॅश महासंघाच्या पुरूष स्क्वॅशपटूंच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या या खेळाडूने अकरावे स्थान मिळविले - सौरव घोषा

व्यक्ती विशेष

  • भारताचे नवे उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - आर. एन. रवी.
  • भारताचे वर्तमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - अजित दोवाल.

सामान्य ज्ञान

  • आशियाई विकास बँक (ADB) याचे स्थापना वर्ष – सन 1966.
  • आशियाई विकास बँक (ADB) याचे मुख्यालय - मंडालुयोंग (फिलीपिन्स).
  • आशियाई विकास बँक (ADB) याचे घोषवाक्य - फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक.
  • भौगोलिक संकेतांक (GI) टॅग मिळालेले भारताचे अन्नपदार्थ – हापूस आंबा, दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची ब्लू पॉटरी, बनारसी साडी आणि तिरुपती लड्डू.
  • या साली 5 ऑक्टोबर रोजी ‘1966 ILO/UNESCO रिकमेंडेशन कंसर्निंग द स्टेटस द टीचर्स’ याला अंगिकारले - सन 1994.
  • भारताचे पहिले उप-राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या तारखेला भारतात शिक्षक दिन पाळला जातो - 5 सप्टेंबर

Archive

Contact Form

Send