चालू घडामोडी : ०६ ऑक्टोबर २०१८

राष्ट्रीय

  • 2 ते 5 ऑक्टोबर 2018 या कालावधीत या ठिकाणी हिंद महासागर सागरीकडा संघटनाच्या (IORA) ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक आयोजित केली गेली - दिल्ली-NCRच्या ग्रेटर नोएडा.
  • या ठिकाणी ‘सायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयाखाली चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) आयोजन करण्यात आले - लखनऊ, उत्तरप्रदेश.

आंतरराष्ट्रीय

  • हिंद महासागर सागरीकडा संघटनेचे (IORA) सदस्य देश या संस्थेसोबत   ‘ग्लोबल रीन्यूएबल एनर्जी अॅटलस’चा विस्तार करणार - आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (IRENA).
  • या ठिकाणी सौदी अरबच्या मदतीने पाकिस्तान अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पाची स्थापना करणार आहे - ग्वादर, बलूचिस्तान.
  • भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने (GSI) UNESCO-ग्लोबल जियोपार्क नेटवर्कचा (GNN) दर्जा मिळविण्यासाठी शिफारस केलेली स्थळे - लोणार तलाव (महाराष्ट्र),सेंट मॅरी बेट आणि मालपे बीच (कर्नाटक).
  • कॅनेडियन कॅन्सर सोसायटीच्या 'द सिगारेट पॅकेज हेल्थ वॉर्निंग्स: इंटरनॅशनल स्टेटस रिपोर्ट' अनुसार, सिगारेट पाकीटावर आरोग्य चेतावण्यांच्या आकाराबाबत क्रमवारीत भारत या क्रमांकाचा देश ठरला - पाचवा.
  • कॅनेडियन कॅन्सर सोसायटीच्या 'द सिगारेट पॅकेज हेल्थ वॉर्निंग्स: इंटरनॅशनल स्टेटस रिपोर्ट' अनुसार, सिगारेट पाकीटावर आरोग्य चेतावण्यांच्या आकाराबाबत क्रमवारीत शीर्ष देश - पूर्व तिमोर.
  • भारतात या देशांच्या तटरक्षक दलांचा “सहयोग HOP TAC-2018” हा पहिला-वहिला संयुक्त सागरी सराव आयोजित केला गेला - भारत आणि व्हिएतनाम.

क्रिडा

  • 2019 साली 30 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत या ठिकाणी 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जाणार - गोवा.

व्यक्ती विशेष

  • 2018 सालचे शांती क्षेत्रातला नोबेल पारितोषिक विजेते - डॉ. डेनिस मुकवेगे (DR कांगो) आणि नादिया मुराद (इराक).

सामान्य ज्ञान

  • हिंद महासागर सागरीकडा संघटना (Indian Ocean Rim Association -IORA) याचे स्थापना वर्ष – सन 1997.
  • या साली IIT दिल्ली येथे प्रथम भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) आयोजित करण्यात आला होता – सन 2015.
  • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याचे मुख्यालय – पॅरिस, फ्रांस.
  • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
  • भारतातल्या राष्ट्रीय खेळांचे (National Games) घोषवाक्य - गेट सेट प्ले’.
  • नोबेल पारितोषिक याचे स्थापना वर्ष - सन 1895.

Archive

Contact Form

Send