चालू घडामोडी : ०८ ऑक्टोंबर २०१८
राष्ट्रीय
हवाई दल दिन: 8 ऑक्टोबर
- भारतात दरवर्षी 8 ऑक्टोबर या दिवशी ‘हवाई दल दिन’ पाळला जातो. यावर्षी हवाई दलाचा 86वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
- भारतीय हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली. हा दिवस चिन्हांकित करण्यासाठी उत्तरप्रदेशात एअर शोचे आयोजन केले.
आंतरराष्ट्रीय
JIMAX 18: जपान आणि भारत यांच्या नौदलांचा सागरी सराव
- 7 ऑक्टोबर 2018 रोजी विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे जपान आणि भारत यांच्या नौदलांच्या “JIMAX 18” या संयुक्त सरावाला सुरुवात झाली आहे.
- यावर्षी “JIMAX” या सागरी सरावाच्या मालिकेची तिसरी आवृत्ती आहे. हा सराव 15 ऑक्टोबर या तारखेपर्यंत चालणार आहे. JIMEX दर पाच वर्षांनंतर आयोजित केला जातो.
क्रिडा
भारत: यू-19 आशिया चषक 2018 क्रिकेट स्पर्धेचा विजेता
- ढाका (बांग्लादेश) येथे खेळल्या गेलेल्या ‘ACC यू-19 आशिया चषक 2018’ या क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद भारतीय संघाने पटकावले आहे.
- भारतीय संघाने श्रीलंका संघाचा पराभव केला. भारताच्या हर्ष त्यागीला अंतिम सामन्याचा सामनावीर तर यशस्वी जयस्वालला मालिकावीर घोषित केले. भारताचे हे या स्पर्धेचे सहावे अजिंक्यपद आहे.
- क्रिकेट क्रिडास्पर्धेचा ‘आशिया चषक’ ही पुरुष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिडास्पर्धा आहे. या स्पर्धेची 1983 साली स्थापना करण्यात आली. 1984 साली शारजाह येथे पहिला आशिया चषक खेळला गेला.
चीनने 43 व्या विश्व बुद्धिबळ ओलंपियाडचे विजेतेपद जिंकले
- बाटुमी (जॉर्जिया) शहरात खेळल्या गेलेल्या 43 व्या विश्व बुद्धिबळ ओलंपियाड या स्पर्धेत चीनच्या महिला व पुरुष संघांनी विजेतेपद पटकावले आहे.
- पुरुषांच्या गटात, चीनने अमेरिकेला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेला रौप्य तर रशियाला कांस्यपदक जिंकले. महिलांमध्येही चीनने सुवर्ण, युक्रेनने रौप्य तर जॉर्जियाने कांस्यपदक मिळवले. स्पर्धेत भारतीय पुरुषांना सहाव्या तर महिलांना आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- जागतिक बृद्धिबळ महासंघाने (FIDE) 1927 साली लंडनमध्ये प्रथम अधिकृत ओलंपियाड आयोजित केले होते. जागतिक बृद्धिबळ महासंघाकडून (FIDE) 1950 सालापासून ही क्रिडा स्पर्धा दर दोन वर्षांनी नियमितपणे आयोजित करीत आहे.
‘युवा ऑलंपिक खेळ 2018’मध्ये भारताला पहिले रौप्यपदक
- अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे सुरू झालेल्या ‘युवा ऑलंपिक खेळ 2018’ या स्पर्धेत महाराष्ट्राच्या शाहू माने याने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे.
- शाहू मानेने नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने सुवर्णपदक पटकावले आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने मिळवून कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेने केले.
- युवा ऑलंपिक खेळ (Youth Olympic Games -YOG) हा आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीकडून (IOC) आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय बहू-क्रिडा प्रकाराचा स्पर्धा कार्यक्रम आहे. उन्हाळा आणि हिवाळा अश्या दोन हंगामात दर चार वर्षांनंतर या खेळांचे आयोजन केले जातात. 2010 साली पहिल्यांदा उन्हाळी खेळांचे तर 2012 साली हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान आणि पर्यावरण
UNच्या ‘इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’चा ग्लोबल वार्मिंगबाबत अहवाल
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ याने ग्लोबल वार्मिंग (वैश्विक उष्णता) याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तापमान वेगाने वाढणार्या ग्रहाच्या वातावरणात जर एक डिग्री आणखी वाढल्यास काही दशकांमध्ये लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहणार आहे.
- अश्या पारिस्थितित जागतिक नेत्यांनी भविष्यासाठी एकत्र काम केल्यास आणि जर तापमानाला केवळ 0.9 अंश फॅरेनहीट (अर्धा डिग्री सेल्सियस) याच्या आत मर्यादित केले तर परिस्थिती सांभाळली जाऊ शकते.
- जागतिक पातळीवर मंजूर केलेल्या 1.8 अंश फॅरेनहीट (1 डिग्री सेल्सियस) या ध्येयाच्या जागी 0.9 अंश मर्यादित न केल्यास बहुतेक लोकांना पाण्याच्या अभावी दुःख सहन करावे लागेल. ताप, धुके आणि संक्रामक रोगांमुळे आजारपण येऊन काही मृत्यू होऊ शकतात. मात्र तापमान मर्यादित केल्यास समुद्राची पातळी सुमारे 4 इंच (0.1 मीटर) कमी उंचावणार. उष्णता, दमटपणा आणि दुष्काळ कमी असेल. पश्चिम अंटार्कटिक बर्फाचा थर कमी विरघळणार आणि जगातले बहुतेक कोरल रीफ नष्ट होण्यापासून वाचवले जाऊ शकते.
राज्य
‘तेलंगणा धोकादायक कृत्ये प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक-2017’ मंजूर
- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘तेलंगणा धोकादायक कृत्ये प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक-2017’ याला मंजुरी दिली आहे. हे विधेयक 1986 सालच्या कायद्याची जागा घेणार.
- “तेलंगणा अवैध दारूचे विक्रेते, डाकू, अमली पदार्थासंबंधी अपराधी, गुंडे, अनैतिक वाहतूक अपराधी आणि जमिनीवर कब्जा करणारे यांची धोकादायक कृत्ये प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक-2017” हे विधेयक तेलंगणा राज्यातले लैंगिक अत्याचार अपराधी, सायबर गुन्हेगार आणि दारूचा अवैध व्यापार आणि डकैतीसारख्या पारंपरिक बेकायदेशीर कृत्ये हाताळण्यास मदत करेल.
गुजरातमधील गिर सिंहाचे कॅनिन डिस्टेम्पर या विषाणूरोधी लसीकरण
- गुजरात वन विभागाने गिर अभयारण्यातल्या सिंहांचे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना लस दिली जात आहे. सावधगिरी म्हणून 36 सिंहांना जंगलामधून बचाव केंद्रात हलविण्यात आले आहेत. ताज्या अंदाजानुसार, गिर अभयारण्यात जवळजवळ 600 सिंह आहेत.
- 12 सप्टेंबरपासून आतापर्यंत गुजरातच्या गिर अभयारण्यातल्या एकूण 23 सिंहांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कॅनिन डिस्टेम्पर विषाणू आणि प्रोटोजोआ संसर्गामुळे 11 मृत्युमुखी पडले आहेत. त्यासाठी अमेरिकेकडून कॅनिन डिस्टेम्पर विषाणूरोधी लसीचे 300 डोज प्राप्त झाले आहेत.
व्यक्ती विशेष
इंटरपोलचे प्रमुख मेंग हाँगवेई यांचा राजीनामा
- अचानक बेपत्ता असलेले आंतरराष्ट्रीय गुन्हेगार पोलीस संघटनेचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाच्या किम जोंग यांग यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे.
- मेंग होंगवेई यांना चीनने ताब्यात घेतल्याचेही उघड झाले आहे. देशातल्या काही कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी होंगवेई यांची चौकशी सुरू असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. मेंग हे चीनचे पहिले इंटरपोल अधिकारी राहिले आहेत. 2020 सालापर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार होते.
- आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल / International Criminal Police Organisation) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जे आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्यासाठी सुविधा पुरवते. 1923 साली याची स्थापना करण्यात आली. फ्रान्समधील लिऑन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. इंटरपोलमध्ये 192 देशांमधील (2017 सालापर्यंत) पोलीस दलांची सदस्यता आहे.
नागालँडचे प्रसिद्ध गांधीवादी नटवर ठक्कर यांचे निधन
- ‘नागालँडचे गांधी’ अशी ओळख असलेले नटवर ठक्कर यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते.
- मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले नटवर ठक्कर 1955 साली नागालँडमध्ये आले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले लक्षणीय काम ध्यानात घेऊन केंद्र सरकारने पद्मश्री देऊन त्यांना गौरवले.
