दररोज जनरल नॉलेज क्रमांक २१

जनरल नॉलेज


Q.1) कोणत्या आंतर-सरकारी संघटनेकडून ‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’ (WESS) हा अहवाल तयार केला जातो? ?
A) जागतिक आर्थिक मंच
B) जागतिक व्यापार संघटना
C) जागतिक बँक
D) संयुक्त राष्ट्रसंघ
उत्तर : D) संयुक्त राष्ट्रसंघ
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’ (WESS 2018) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते विजेवर चालणार्‍या वाहनापर्यंतचे सर्व आधुनिक तंत्रज्ञान 'दुधारी’ तलवारीप्रमाणे असू शकते, असे म्हटले गेले आहे. अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि कार्यक्षम ऊर्जा साठवण प्रणालींमुळे ऊर्जा क्षेत्र अधिक शाश्वत बनत चालले आहे.


Q.2) WHOची द्वितीय ‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’ कोणत्या ठिकाणी भरविण्यात आली? ?
A) न्यूयॉर्क, अमेरिका
B) नवी दिल्ली, भारत
C) पॅरिस, फ्रान्स
D) सिडनी, ऑस्ट्रेलिया
उत्तर : B) नवी दिल्ली, भारत
स्पष्टीकरण : दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीत द्वितीय ‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’ (World Conference on Access to Medical Products) याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही परिषद “अचिव्हिंग द SDGs 2030” या विषयाखाली भरविण्यात आली आहे.


Q.3) नुकतेच निधन झालेले एम. एन. पलूर हे ........... या क्षेत्रातल्या योगदानासाठी ओळखले जातात? ?
A) काव्य
B) विज्ञान
C) शिक्षण
D) पर्यावरण
उत्तर : A) काव्य
स्पष्टीकरण : सुप्रसिद्ध मल्याळम कवी एम. एन. पलूर यांचे केरळच्या कोझिकोडमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. पलूर यांना 'कथाईलाथावांचे कथा' या त्यांच्या आत्मचरित्रासाठी 2013 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1983 साली त्यांनी 'कालिकालम' या कथासंग्रहासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कारही जिंकला. 


Q.4) कोणत्या मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीने संयुक्त राष्ट्रसंघामधील अमेरिकेचे राजदूत पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला??
A) राज शाह
B) मनिषा सिंग
C) सुंदर पिचई
D) निक्की हेले
उत्तर : D) निक्की हेले
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्रसंघामधील अमेरिकेचे राजदूत असलेले ‘निक्की हेले’ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निक्की हेले 2017 सालापासून या पदावर कार्यरत आहेत. त्या वर्षाच्या अखेरपर्यंत हे पद सोडणार.


Q.5) कोणत्या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला जातो??
A) 10 नोव्हेंबर
B) 10 ऑक्टोबर
C) 10 मार्च
D) 10 एप्रिल
उत्तर : B) 10 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. “यंग पीपल अँड मेंटल हेल्थ इन ए चेंजिंग वर्ल्ड” हा यावर्षीचा विषय आहे. अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्याकडून 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता.


Q.6) कोणत्या व्यक्तीस 2018 सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक दिला जात आहे?
A) पॉल रोमर
B) विल्यम नॉर्डस
C) A आणि B
D) पॉल क्रुगमॅन
उत्तर : C) A आणि B
स्पष्टीकरण : हवामानबदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर संशोधन करणारे अमेरिकेचे अर्थतज्ञ विल्यम डी. नॉर्डस आणि पॉल एम. रोमर यांना 2018 सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक दिला जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


Q.7) नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ पॉल रोमर यांनी कोणता आर्थिक सिद्धांत मांडला?
A) मॅनेजमेंट ऑफ कॉमन पूल रिसोर्सेस
B) बिहेवियरल इकनॉमिक्स
C) असिमेट्रिक इन्फॉर्मेशन
D) एंडोजिनस ग्रोथ
उत्तर : D) एंडोजिनस ग्रोथ
स्पष्टीकरण : हवामानबदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर संशोधन करणारे अमेरिकेचे अर्थतज्ञ विल्यम डी. नॉर्डस आणि पॉल एम. रोमर यांना 2018 सालचा अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक दिला जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॉर्डसने दीर्घकालीन मॅक्रोइकनॉमिक्स विश्लेषणात हवामानातील बदलांना एकात्मिक करण्यासाठी समाज आणि निसर्ग यामधील संवाद या विषयी संशोधन केले. 1990 साली रोमेरने एंडोजिनस ग्रोथ याचा सिद्धांत मांडला.


Q.8) कोणत्या देशाद्वारा इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ कॉरिडोर (INSC) पुढाकार सुरू केला गेला?
A) भारत
B) जपान
C) रशिया
D) जर्मनी
उत्तर : A) भारत
स्पष्टीकरण : भारताने इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ कॉरिडोर (INSC) पुढाकार सुरू केला.


Q. 9) …………… यांच्याकडे स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी असते?
A) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
B) संरक्षण सचिव
C) गृह सचिव
D) परराष्ट्र सचिव
उत्तर : A) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
स्पष्टीकरण : राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींबद्दल पंतप्रधानांना सल्ला देणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) मदतीसाठी केंद्र सरकारने स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (SPG) याची स्थापना केली आहे. गटाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित कुमार डोवाल यांच्याकडे असेल. NITI आयोगाचे उपाध्यक्ष, कॅबिनेट सचिव, तीनही संरक्षण दलांचे प्रमुख, RBI गव्हर्नर, परराष्ट्र सचिव, गृह सचिव, वित्त सचिव व संरक्षण सचिव हे गटाचे अन्य सदस्य आहेत.


Q.10) कोणत्या दिवशी जागतिक टपाल दिन पाळला जातो?
A) 1 ऑक्टोबर
B) 3 ऑक्टोबर
C) 9 ऑक्टोबर
D) 7 ऑक्टोबर
उत्तर : C) 9 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन पाळला जातो. यावर्षी “इनोव्हेशन, इंटीग्रेशन अँड इंक्लुजन” या विषयाखाली हा दिन पाळला गेला आहे. 9 ऑक्टोबर 1874 रोजी यूनिवर्सल पोस्टल युनियनची स्थापना बर्न (स्वित्झर्लंड) येथे केली गेली. या घटनेच्या स्मृतीत 1969 साली 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले.




"इतिहास सांगतो की, काल सुख होतं!विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय  चांगलं असेल तर दररोज सुख आहे..! "
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send