चालू घडामोडी : ३१ ऑक्टोंबर २०१८
राष्ट्रीय
- या ठिकाणी भारतातले सर्वात मोठे ड्राय डॉक उभारले जाणार - कोचीन शिपयार्ड, केरळ.
- सर्वोच्च न्यायालयाने या क्षेत्रात 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांचा आणि 10 वर्ष जुन्या डीझल वाहनांचा वापर करण्यास मनाई केली - दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र.
- या ठिकाणी भारतातल्या सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेमधील चांगल्या आणि परिणामकारक सराव पद्धती आणि अभिनव कल्पना विषयक ‘5वी राष्ट्रीय शिखर परिषद’ भरविण्यात आली - काझीरंगा,आसाम.
- विज्ञान व उद्योग संशोधन परिषद (CSIR) येथील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले कमी प्रदूषण फैलावणारी फटाके – सेफ वॉटर रिलीझर (SWAS), सेफ मिनीमल अॅल्युमिनियम (SAFAL), सेफ थर्माईट क्रॅकर (STAR).
- या जिल्ह्यात गुजरातचे पहिले मेगा फूड पार्क उभारण्यात आले - सुरत (शाह आणि वासरावी,तालुका मंगरोल).
आंतरराष्ट्रीय
- या युरोपीय देशाचे वर्तमान चान्सलर अँजेला मर्केल (64 वर्षीय) यांनी 2021 साली देशाचे चान्सलर पद सोडणार असल्याची घोषणा केली - जर्मनी.
क्रिडा
- ‘2018 इसले ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ’ स्पर्धेचा विजेता - रॅडोस्लाव्ह वोज्तासझेक (पोलंड).
व्यक्ती विशेष
- जपानचे वर्तमान पंतप्रधान - शिन्जो आबे.
सामान्य ज्ञान
- जर्मनीचे राजधानी शहर – बर्लिन.
- जपानची राजधानी – टोकियो.
- जपानचे राष्ट्रीय चलन - जपानी येन.
- फटाके बनविण्यामध्ये वापरली जाणारी मुख्य घटके - पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर.
