चालू घडामोडी : ३० ऑक्टोंबर २०१८

राष्ट्रीय

  • या विषयाखाली ‘दक्षता जागृती आठवडा 2018’ पाळला गेला - इर्‍याडीकेट करप्शन – बिल्ड ए न्यू इंडिया’.
  • या नदीच्या तीरावर 17 किलोमीटरच्या परिसरात गुजरात राज्य वन विभाग ‘फुलांची घाटी’ तयार करीत आहे – नर्मदा नदी.

आंतरराष्ट्रीय

  • या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाची ‘प्राथमिक आरोग्य सेवेविषयक वैश्विक परिषद 2018’ भरविण्यात आली होती – अस्ताना, कझाखस्तान.
  • जगातल्या सर्वात उंच पुतळा - गुजरातच्या सरदार सरोवर नर्मदा धरण जवळ उभारण्यात आलेला182 मीटर / 597 फूट उंचीचा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा.
  • भारताने या देशासोबत योग व आयुर्वेद यासारख्या भारतीय पारंपारिक औषधी तंत्रांच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच सहकार्य साधण्यासाठी सहकार्य करार केला – जपान.

क्रिडा

  • मस्कट (ओमान) येथे खेळल्या गेलेल्या ‘एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी (ACT) 2018’ या हॉकी क्रिडास्पर्धेचा विजेता - भारत आणि पाकिस्तान (संयुक्त).
  • बुडापेस्ट (हंगेरी) येथे खेळलेल्या ‘2018 विश्व कुस्ती अजिंक्यपद’ या क्रिडास्पर्धेत अव्वल ठरलेला देश - रशिया (10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कास्य).

व्यक्ती विशेष

  • मायकेल डी. हिगिन्स यांची यूरोपमधील या देशाच्या राष्ट्रपती पदावर पुनर्निवड झाली - आयरलँड.
  • ब्राझीलमध्ये निवडून आलेले नवे राष्ट्रपती - जैयर बोलसनारो.

सामान्य ज्ञान

  • या साली ऐतिहासिक ‘अल्मा-अटा घोषणापत्र’ हे प्राथमिक आरोग्य सेवेविषयक अंगिकारलेले सर्वात पहिले दस्तऐवज जागतिक नेत्यांनी स्वीकारले - सन 1978.
  • केंद्रीय दक्षता आयोग (CVC) हा काळ ‘दक्षता जागृती आठवडा’ म्हणून पाळतो - 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर.
  • कझाखस्तानची राजधानी - अस्ताना.
  • एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी या साली पहिल्यांदा आयोजित केली गेली - सन 2011.
  • दक्षिण अमेरिका खंडातला सर्वांत मोठा देश - ब्राझील.
  • ब्राझीलचे राजधानी शहर – ब्रासिलिया.
  • ब्राझीलचे राष्ट्रीय चलन - ब्राझीलियन रिआल‎ (BRL).
  • नर्मदा नदीचे उगमस्थान - अमरकंटक, मध्यप्रदेश.
  • भारतातली पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी - नर्मदा नदी.


Archive

Contact Form

Send