चालू घडामोडी : २६ ऑक्टोंबर २०१८

राष्ट्रीय

  • "सेल्फ4सोसायटी" या विषयाखाली या नावाचे डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले - मै नही हम.
  • नियमानुसार, जास्तीत-जास्त इतक्या मुलांना जन्म दिला असल्यास पंचायत निवडणूक लढविता येते – दोन.
  • कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांच्या लैंगिक छळ रोखण्यासंदर्भात कायदेशीर कार्याचौकटीचा अभ्यास करण्यासाठी या व्यक्तीच्या नेतृत्वात मंत्र्यांचा गट (GoM) आहे - राजनाथ सिंग (केंद्रीय गृहमंत्री).
  • या तारखेपासून देशात BS-4 वाहनांची विक्री आणि नोंदणी होणार नाही - 1 एप्रिल 2020.
  • या घाटचे 56,825 चौरस किलोमीटरचे क्षेत्र 'नो गो' क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे - पश्चिम घाट.

आंतरराष्ट्रीय

  • IATAच्या ‘20-इयर एयर पॅसेंजर फोरकास्ट’ या अहवालानुसार, 2024 सालापर्यंत भारत या क्रमांकाची सर्वात मोठी विमान उड्डयण बाजारपेठ बनणार - तिसरी.
  • या ठिकाणी दिनांक 24-25 ऑक्टोबर 2018 रोजी 'कनेक्टिंग फार्मर्स टू मार्केट' या विषयाखाली ‘वैश्विक कृषी नेतृत्व शिखर परिषद 2018’चे आयोजन करण्यात आले - नवी दिल्ली.

क्रिडा

  • या ठिकाणी ‘विश्व कुस्ती अजिंक्यपद 2018’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले - बुडापेस्ट, हंगेरी.
  • 17 नोव्हेंबर रोजी अम्मान येथे भारत व पश्चिम आशियातला हा देश यांच्यात पहिल्यांदाच मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला जाणार - जॉर्डन.

व्यक्ती विशेष

  • या व्यक्तीला ‘सेऊल शांती पारितोषिक 2018’ देऊन सन्मानित करण्यात आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

सामान्य ज्ञान

  • गाडीतून निघणाऱ्या धुराबाबत या उत्सर्जन मानकाची रचना भारत सरकारने केली आहे - भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड (BSES).
  • या साली भारत स्टेज (BS) मानकाची अंमलबजावणी भारतात सर्वप्रथम करण्यात आली - सन 2000.
  • 2020 सालापासून भारतात हा उत्सर्जन मानक लागू केला जाणार आहे - BS-6
  • पश्चिम घाट हे क्षेत्र या राज्यांमध्ये पसरलेला आहे - गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू.
  • हवाना (क्युबा) येथील इंटरनॅशनल एअर ट्रांसपोर्ट असोसिएशन (IATA) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
  • ‘सेऊल शांती पारितोषिक’ या पुरस्काराची स्थापना या साली कोरिया प्रजासत्ताकने केली - सन 1990.

Archive

Contact Form

Send