चालू घडामोडी : २२ ऑक्टोंबर २०१८

राष्ट्रीय

  • आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठीच्या मोहिमांमध्ये सहभागी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यासाठी या व्यक्तीच्या नावावरून पुरस्काराची घोषणा केली - नेताजी सुभाष चंद्र बोस.
  • हिमालय पर्वतरांगांमधील इतक्या पर्वतशिखरांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले – चार (अटल 1, 2, 3, 4).
  • 705 कोटी रुपये खर्चून भारताकडे असलेल्या या विमानवाहू जहाजाची दुरूस्ती केली आहे - INS विक्रमादित्य.

आंतरराष्ट्रीय

  • हा देश 1987 साली रशियासोबत झालेल्या मध्यम पल्ल्याच्या अणु दल संधी (Intermediate-Range Nuclear Forces Treaty) मधून बाहेर पडला - अमेरिका.
  • डिसेंबर महिन्यामध्ये हे तीन देश 'कोप इंडिया' नावाचा संयुक्त हवाई युद्ध सराव आयोजित करणार आहे - भारत, जपान आणि अमेरिका.
  • या देशामध्ये संसदीय निवडणुकीत ड्रक न्यामरूप शोगपा या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या - भुटान.

क्रिडा

  • या संघाने यावर्षीचा विजय हजारे करंडक जिंकला - मुंबई.

व्यक्ती विशेष

  • भारताच्या या जलद गोलंदाजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली - प्रवीण कुमार.

सामान्य ज्ञान

  • भारतातला पोलीस स्मृती दिन - 21 ऑक्टोबर.
  • जगातले सर्वोच्च शिखर - एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर).
  • अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये मध्यम पल्ला अणु दल संधी करण्यात आली – सन 1987 (डिसेंबर).
  • भारत आणि अमेरिका यांच्यात होणारा ‘कोप इंडिया’ हा सराव सर्वप्रथम या साली आयोजित करण्यात आला – सन 2004.
  • भुटानची राजधानी - थिंपू.
  • भुटानचे चलन – भुटानी नगल्ट्रम.
  • विजय हजारे करंडक ही क्रिडास्पर्धा या खेळशी संबंधित आहे - क्रिकेट.
  • भारताकडे असलेले एकमेव विमानवाहू जहाज - INS विक्रमादित्य (44,500 टन वजनी).

Archive

Contact Form

Send