चालू घडामोडी : १० ऑक्टोंबर २०१८

राष्ट्रीय

2017 साली भारतात रस्त्यांवरील अपघातात अधिक सायकलस्वारांना धोका झाला: केंद्र सरकार
  • भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या रस्त्यांवरील अपघातांसंबंधी वार्षिक अहवालानुसार, रस्त्यांवरील अपघातात मृत्यूचे प्रमाण घटले असले आणि अशा घटनांची एकूण संख्या कमी असली तरीही, 2017 साली रस्त्यांवरील अपघातात पादचारी आणि सायकलस्वारांना सर्वाधिक धोका झाला होता.
  • अहवालाच्या ठळक बाबी –
    • 2017 साली अपघातात 3.3%ची घट झाली आहे, ज्याप्रमाणे अपघातांची एकूण संख्या 4.64 लक्ष एवढी होती. त्यात 1.47 लक्ष लोकांचा मृत्यू झाला, जे की 2016 सालच्या तुलनेत 1.9% कमी आहे.
    • रस्ते अपघातात ठार झालेल्या पादचार्‍यांची संख्या 29.9%नी वाढून ती 20,457 पर्यंत पोहचलेली आहे तर 3,559 सायकलस्वारांचा मृत्यू झाला, जी की 37.7%ची वाढ आहे. रस्ते अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पादचारी आणि सायकलस्वार यांचे एकत्रितपणे 16.2% एवढे प्रमाण आहे.
    • 10 दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांपैकी सुमारे 7 जणांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट यासारखी अनिवार्य आवश्यकता पाळली नाही. उल्लंघन झालेले शीर्ष चार वाहतूक नियमांचे म्हणजे - वाहन चालवितांना मोबाइल फोनचा वापर (2.1% मृत्यूचे प्रमाण), वेगात चालवणे (66.7%), चुकीच्या बाजूने वाहन चालवणे (6.4%), दारू पिऊन वाहन चालवणे (3.2%).
    • तामिळनाडूमध्ये अपघातांची संख्या सर्वाधिक आहे, तर उत्तरप्रदेशात सर्वात जास्त मृत्यू झालेत.

आंतरराष्ट्रीय

जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर
  • दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. “यंग पीपल अँड मेंटल हेल्थ इन ए चेंजिंग वर्ल्ड” हा यावर्षीचा विषय आहे.
  • अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्याकडून 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता. जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्यासंदर्भात एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना करण्यात आली आणि याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.
  • मानसिक विकार हा जगभरात आढळणारा सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते. आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे. त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.
नवी दिल्लीत द्वितीय ‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’चे आयोजन
  • दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीत द्वितीय ‘जागतिक वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता परिषद’ (World Conference on Access to Medical Products) याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही परिषद “अचिव्हिंग द SDGs 2030” या विषयाखाली भरविण्यात आली आहे.
  • या प्रसंगी आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियातल्या देशांमध्ये नियामक आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कम्प्युटिंग कडून ‘साऊथ-ईस्ट एशिया रेग्युलेटरी नेटवर्क’ (SEARN) हा मंच विकसित करण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान विकसनशील देशांसाठी 'दुधारी’ तलवारीप्रमाणे आहे: संयुक्त राष्ट्रसंघ
  • संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वर्ल्ड इकनॉमिक अँड सोशल सर्वे’ (WESS 2018) हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते विजेवर चालणार्‍या वाहनापर्यंतचे सर्व आधुनिक तंत्रज्ञान 'दुधारी’ तलवारीप्रमाणे असू शकते, असे म्हटले गेले आहे.
  • अन्य ठळक बाबी -
    • नव्या तंत्रज्ञानाला नियमित करण्यासाठी प्रभावी धोरणे आखणे अनिवार्य आहे. योग्य धोरणाशिवाय, निश्चित केलेले शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यात विद्यमान असमानता वाढण्याचा धोका आहे.
    • अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि कार्यक्षम ऊर्जा साठवण प्रणालींमुळे ऊर्जा क्षेत्र अधिक शाश्वत बनत चालले आहे.
    • सर्वाधिक संवेदनशील असणार्‍यांसाठी औषधे प्राप्त करण्यासाठी उपलब्धता वाढविली जात आहे आणि विकसनशील देशांतील लक्षावधी लोकांना त्यांच्या मोबाइल फोनद्वारे कमी किंमतीच्या आर्थिक सेवा उपलब्ध आहेत.

विज्ञान आणि पर्यावरण

पर्यावरण मंत्रालयाचा ‘स्ट्रेन्दनिंग फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट इन इंडिया’ अहवाल
  • केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘स्ट्रेन्दनिंग फॉरेस्ट फायर मॅनेजमेंट इन इंडिया’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात लोकसहभागाने वणवा संदर्भात व्यवस्थापनाविषयी शिफारसी सुचविलेल्या आहेत.
  • देशाच्या इतिहासात प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे. वनातील वणवा रोखून वनसंपत्तीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने यात शिफारसी केल्या आहेत. वणव्यामुळे उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साइड (CO2) हे वैश्विक उष्णतेसाठी कारणीभूत ठरते. देशात लागणार्‍या वणव्याच्या 47% भाग 20 जिल्ह्यांमध्ये असमान रीतीने दिसून येतो.
  • काही शिफारसी –
    • स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता ‘राष्ट्रीय वणवा रोधक व्यवस्थापन योजना’ तयार करणे.
    • ही योजना वेळबद्ध प्रक्रियेतून सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकसहभागातून अंमलात आणणे.
    • यात वणवा रोखण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित कार्यदल तयार केले जाणार आणि वणव्याशी लढण्यासाठी विविध पद्धती सरावात आणल्या जाणार.
    • मंत्रालय, राज्य वन विभाग, समुदाय आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्या भूमिका आणि जबाबदार्‍या ठरवणे.
    • ज्ञानामधील अंतर भरून काढण्यासाठी सुधारीत माहितीच्या मदतीने आणि संशोधन करून वणवा-रोधी व्यवस्थापनात मदत देणे आवश्यक आहे.
    • व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय संशोधनासाठी विषय परिभाषित करणे आणि या क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनासाठी निधी संकलनाच्या संधी प्रदान करणे.

राज्य

2023 सालापर्यंत मुंबईची प्रसिद्ध ‘डबल डेकर’ बससेवा बंद होणार
  • मुंबईचे आकर्षण ठरणारी ‘डबल डेकर’ बस इतिहासजमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत ही बससेवा बंद केली जाणार आहे.
  • सन 1937 मध्ये ‘डबल डेकर’ बससेवा लोकप्रिय बनल्या होत्या. सन 1947-48 या कालावधीत सुरुवातीला मुंबईत 141 डबल डेकर बस धावत होत्या. आणखी खरेदी केल्यानंतर सन 1993 पर्यंत या बसेसची संख्या 882 पर्यंत पोहोचली होती. सद्यस्थितीत केवळ 120 बस सेवेत आहेत. त्यापैकी डिसेंबर 2020 पर्यंत 72 बस बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 48 बस ऑक्टोबर 2023 पर्यंतच सुरू राहतील.
  • वर्तमानात उपयोगात असलेल्या बसच्या तुलनेत या बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च आणि मुंबईच्या रस्त्यांवरील अपुरी जागा, यामुळे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय बृहमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रान्सस्पोर्टने (BEST) घेतला आहे.

व्यक्ती विशेष

संयुक्त राष्ट्रसंघामधील अमेरिकेचे राजदूत ‘निकी हेले’ यांचा राजीनामा
  • संयुक्त राष्ट्रसंघामधील अमेरिकेचे राजदूत असलेले ‘निक्की हेले’ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • निक्की हेले 2017 सालापासून या पदावर कार्यरत आहेत. त्या वर्षाच्या अखेरपर्यंत हे पद सोडणार.
सुप्रसिद्ध मल्याळम कवी एम. एन. पलूर यांचे निधन
  • सुप्रसिद्ध मल्याळम कवी एम. एन. पलूर यांचे केरळच्या कोझिकोडमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
  • पलूर यांना 'कथाईलाथावांचे कथा' या त्यांच्या आत्मचरित्रासाठी 2013 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1983 साली त्यांनी 'कालिकालम' या कथासंग्रहासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कारही जिंकला. 

Archive

Contact Form

Send