दररोज जनरल नॉलेज क्रमांक २०

जनरल नॉलेज


Q.1) 2018 सालचा शांती क्षेत्रातला नोबेल पारितोषिक कोणत्या व्यक्तीला दिला गेला आहे ?
A) डेनिस मुकवेगे
B) नादिया मुराद
C) A आणि B
D) याजीद मुगाबे
उत्तर : C) A आणि B
स्पष्टीकरण : यावर्षीचा शांती क्षेत्रातला नोबेल पारितोषिक डॉ. डेनिस मुकवेगे (DR कांगो) आणि नादिया मुराद (इराक) यांना संयुक्तरित्या दिला जात आहे. डॉ. डेनिस मुकवेगे हे स्त्री-रोग तज्ञ आहेत. ते लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी कार्य करीत आहेत. बलात्कार पीडित नादिया मुराद या जगभरात महिलांवर होणार्‍या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती पसरविण्यात योगदान देत आहेत.


Q.2) अक्षय ऊर्जा क्षेत्रावरील IORA ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक 2018 कोणत्या शहरात आयोजित केली गेली ?
A) नवी दिल्ली
B) चेन्नई
C) कटक
D) मुंबई
उत्तर : A) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 2 ते 5 ऑक्टोबर 2018 या कालावधीत दिल्ली-NCRच्या ग्रेटर नोएडा येथे हिंद महासागर सागरीकडा संघटनेच्या (Indian Ocean Rim Association -IORA) ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक आयोजित केली गेली होती. बैठकीच्या शेवटी IORA चे सभासद असलेल्या सर्व 21 देशांनी हिंद महासागर क्षेत्रात अक्षय ऊर्जा विषयक दिल्ली घोषणापत्राला अंगिकारले आहे.


Q.3) कोणत्या भारतीय शहरात भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2018 आयोजित केला गेला ?
A) ग्वालियर
B) बेंगळूरू
C) चेन्नई
D) लखनऊ
उत्तर : D) लखनऊ
स्पष्टीकरण : 5 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उत्तरप्रदेश राज्याच्या लखनऊमध्ये चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) आयोजन करण्यात आले आहे. ‘सायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या विषयाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.


Q.4) “सहयोग HOP TAC” हा कोणत्या देशासह भारताचा तटरक्षक दलांचा संयुक्त सराव आहे ?
A) व्हिएतनाम
B) संयुक्त राज्ये अमेरिका
C) चीन
D) जपान
उत्तर : A) व्हिएतनाम
स्पष्टीकरण : बंगालच्या उपसागरालगत चेन्नई किनारपट्टीच्या क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्या तटरक्षक दलांचा “सहयोग HOP TAC-2018” हा पहिला-वहिला संयुक्त सागरी सराव आयोजित केला जात आहे. 4 ऑक्टोबर 2018 रोजी हा सराव सुरू करण्यात आला आहे.


Q.5) ICICI बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
A) चंदा कोचर
B) संदीप बक्षी
C) राजवीर मीना
D) अशोक पंडित
उत्तर : B) संदीप बक्षी
स्पष्टीकरण : ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे आता बँकेचे MD आणि CEO असतील. संदीप बक्षी हे 3 ऑक्टोबरपासून बँकेचे MD आणि CEO झाले आहेत.


Q.6) बलूचिस्तानमध्ये ग्वादर येथे सौदी अरबच्या मदतीने कोणता देश तेल शुद्धीकरण प्रकल्पाची स्थापना करणार आहे?
A) अफगाणिस्तान
B) पाकिस्तान
C) इराक
D) यापैकी नाही
उत्तर : B) पाकिस्तान
स्पष्टीकरण : बलूचिस्तानच्या नैऋत्य प्रांतामध्ये ग्वादर येथे सौदी अरबच्या मदतीने पाकिस्तान अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पाची स्थापना करणार आहे. त्यासंबंधी सामंजस्य करार करण्यास पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली आहे. प्रस्तावित बलूचिस्तान तेल शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 500,000 बॅरलची आहे. या प्रकल्पात $ 8-9 अब्जची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. 


Q.7) कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशात 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले जाणार आहेत?
A) कर्नाटक
B) गोवा
C) आसाम
D) राजस्थान
उत्तर : B) गोवा
स्पष्टीकरण : मार्च-एप्रिल 2019 मध्ये गोवा येथे 36व्या राष्ट्रीय खेळांचे (National Games) आयोजन केले जाणार आहे. ही क्रिडा स्पर्धा 30 मार्चपासून ते 14 एप्रिलपर्यंत खेळली जाणार आहे. गोव्यातल्या फतोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू क्रिडामैदानावर ही क्रिडास्पर्धा खेळली जाणार. रग्बी, वूशू, आधुनिक पेन्टाथलॉन, लॉन बाऊल्स, बिलियर्ड्स व स्नूकर या पाच क्रिडाप्रकारांना नव्याने समाविष्ट केले जाणार. मात्र खेळांमधील नेमबाजी आणि सायकलिंग स्पर्धा नवी दिल्ली येथे होणार आहेत.


Q.8) कोणता देश हिंद महासागर सागरीकडा संघटना  (IORA) याचा भाग नाही?
A) पाकिस्तान
B) भारत
C) ओमान
D) सोमालिया
उत्तर : A) पाकिस्तान
स्पष्टीकरण : हिंद महासागर सागरीकडा संघटना (Indian Ocean Rim Association –IORA) ची स्थापना मार्च 1997 मध्ये केली गेली. इंडोनेशिया हे IORA परिषद आयोजित करणारे प्रथम देश आहे. IORA मध्ये 21 सदस्य राज्ये आणि 7 संवाद भागीदार आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इराण, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, मोजांबिक, केनिया, श्रीलंका, टांझानिया, बांग्लादेश, सिंगापूर, मॉरीशस, मेडागास्कर, संयुक्त अरब अमीरात (UAE), येमेन, सेशेल्स, सोमालिया, कोमोरोस आणि ओमान हे देश IORAचे सदस्य आहेत.


Q. 9) कोणत्या भारतीय संस्थेमध्ये जगातले सर्वात मोठे गुंबद आहे?
A) IIT बॉम्बे
B) IIT मद्रास
C) IIT बंगलोर
D) महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, पुणे
उत्तर : D) महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, पुणे
स्पष्टीकरण : पुणे (महाराष्ट्र) शहरातल्या माईरच्या महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी (MIT) या स्वायत्त विद्यापीठाच्या परिसरात जगातले सर्वात मोठे गुंबद (गोल घुमट) उभारण्यात आले आहे आणि याचे उद्घाटन उपाध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


Q.10) खालीलपैकी कोणते रब्बी पीक नाही?
A) कापूस
B) गहू
C) मसूर
D) बार्ली
उत्तर : A) कापूस
स्पष्टीकरण : मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने सन 2018-19 या रब्बी हंगामातल्या सर्व रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याचे विपणन 2019-20 या हंगामात होणार आहे. गव्हाच्या MSPमध्ये प्रती क्विंटल 105 रुपये, बार्ली प्रती क्विंटल 30 रुपये, मसूर प्रती क्विंटल 225 रुपये, हरभरा प्रती क्विंटल 220 रुपये, मोहरी प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्याकरिता या वाढीमुळे शेतकऱ्यांना 62,632 कोटी रूपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार.




"जिंकायची मजा तेव्हाच आहे.
       जेव्हा अनेकजण तुमच्या
        पराभवाची आतुरतेने
            वाट पाहत असतात."

Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send