एड्स (AIDS) आजाराची संपूर्ण माहिती
एड्स (AIDS) आजाराची संपूर्ण माहिती
- लाँगफाँर्म – Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह).
- व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.
- एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू).
- एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.
- जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
- भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
- भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
- जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात.
- भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात.
- महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात.
- महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात.
- जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
- NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली. MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.
रोगप्रसाराचे प्रमुख मार्ग :
- H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.
- H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास.
- (रक्त संक्रमण). H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास.
- H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्या बाळाला (नाळेमार्फत) .
- H.I.V.बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.
सर्वसामान्य लक्षणे :
- अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
- सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी) सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.
- तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
- 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी ‘लसिका ग्रंथाची’ (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर
इतर लक्षणे :
- नुमोनिया
- मेंदूज्वर
- हरपीस
- विविध प्रकारचे कर्करोग
- क्षयरोग
आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)
एड्स निदानाच्या चाचण्या :
- इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते.
- गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.
- वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.
- पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्याच दिवशी निदान होऊ शकते.
- मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.
- जुलै 1987 – ‘झिडोव्ह्युडीन’ हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध.
- एड्सवरील औषधे – झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.
- H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणार्याु बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास ‘अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी’ असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)
- एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.(संशोधन चालू)
- एड्सच्या बाबतीत प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो.
