दररोज जनरल नॉलेज क्रमांक १३

जनरल नॉलेज


Q.1) जागतिक बँकेच्या ‘2018 वैश्विक आर्थिक संभावना’ अहवालात, भारताचा वृद्धीदर 2018 साली किती वर्तवला गेला आहे?
A) 7.3%
B) 7.5%
C) 8%
D) 6.3%
उत्तर : A) 7.3%
स्पष्टीकरण : जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, भारताचा वृद्धीदर 2018 साली 7.3% तर त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये 7.5% असणार. जागतिक बँकेच्या ‘2018 वैश्विक आर्थिक संभावना’ अहवालात, वर्ष 2017 साठी भारताचा आर्थिक वृद्धीदर 6.7% आहे.


Q.2) कोणत्या दोन राष्ट्रांनी आण्विक अस्त्रांच्या तणावाखाली समाधान शोधण्यास उच्चस्तरीय लष्करी बैठकीचा प्रस्तावाचा स्वीकार केला?
A) उत्तर कोरिया व अमेरिका
B) अमेरिका व दक्षिण कोरिया
C) उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया
D) उत्तर कोरिया व जापान
उत्तर : C) उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया
स्पष्टीकरण : उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत उच्चस्तरीय बैठकीचा प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. ही बैठक दोन्ही देशांना विभाजित करणार्या क्षेत्रात स्थित पनमुनजोम गावात आयोजित केली गेली आहे.


Q.3) सर्व महिला कर्मचारी असलेल्या आणि याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2018’ मध्ये नोंद होणार्या रेल्वे स्थानकाचे नाव ओळखा.
A) विरार
B) लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)
C) कुर्ला
D) माटुंगा
उत्तर : D) माटुंगा
स्पष्टीकरण : सर्व महिला कर्मचारी असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2018’ मध्ये नोंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा लोकल स्थानकावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत आहेत आणि हे देशातले प्रथम असे रेल्वे स्थानक आहे. स्टेशन मॅनेजर, पॉइंट पर्सन, बुकिंग स्टाफ, टिकट चेकर, अश्या सर्व जागी महिला काम करीत आहेत. 12 जुलै 2017 रोजी औपचारिक रूपात स्थानकाला या महिला कर्मचार्यांकडे सोपवले गेले होते.


Q.4) कोणत्या प्रसिद्ध मद्याच्या ब्रॅंडचे निर्माते कपिल मोहन यांचे अलीकडेच निधन झाले?
A) रॉयल चॅलेंज
B) ओल्ड मोंक
C) ऑफिसर्स चॉइस
D) फोर सीझन वाइन
उत्तर : B) ओल्ड मोंक
स्पष्टीकरण : ओल्ड मोंक मद्यचे निर्माते कपिल मोहन यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. ओल्ड मोंक हा मोहन मेकिन कंपनीचा ब्रॅंड आहे, ज्याचे मालक कपिल मोहन होते.


Q.5) 9 जानेवारी 2018 रोजी प्रथम ‘भारतीय वंशाचे व्यक्ती संसदीय परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
A) मुंबई
B) नवी दिल्ली
C) चेन्नई
D) जयपूर
उत्तर : B) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 9 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्लीत प्रथम ‘भारतीय वंशाचे व्यक्ती संसदीय परिषद’ (Persons of Indian Origin Parliamentary Conference) आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्रवासी भारतीय दिवस’ भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो.


Q.6) भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर 'प्रत्यूष' कुठे प्रस्थापित करण्यात आला?
A) पुणे
B) नवी दिल्ली
C) मुंबई
D) जयपूर
उत्तर : A) पुणे
स्पष्टीकरण : पुण्यामध्ये भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटर 'प्रत्यूष' राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. 'प्रत्यूष' मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरला ‘भारतीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे’ येथे प्रस्थापित केले गेले आहे. 'प्रत्यूष' मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरची उच्च प्रदर्शन कंप्यूटिंग (HPC) क्षमता 6.8 पेटाफ्लॉप आहे.


Q.7) कोणत्या बांग्ला अभिनेत्याला फ्रान्स सरकारकडून ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार जाहीर झाला?
A) व्हिक्टर बॅनर्जी
B) सांतू मुखोपाध्याय
C) बिपलाब चटर्जी
D) सौमित्र चट्टोपाध्याय
उत्तर : D) सौमित्र चट्टोपाध्याय
स्पष्टीकरण : प्रसिद्ध बांग्ला अभिनेता सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्स सरकारकडून ‘लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार घोषित झाला आहे. 82 वर्षीय चट्टोपाध्याय यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अभिजन’, ‘चारूलता’, ‘अरण्येर दिनरात्री’, ‘अशनी संकेत’ आणि अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका वठवलेल्या आहेत.


Q.8) कोणती व्यक्ती सिक्किमची ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ आहे?
A) मोहित चौहान
B) ए. आर. रहमान
C) लता मंगेशकर
D) आशा भोसले
उत्तर : B) ए. आर. रहमान
स्पष्टीकरण : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले गेले आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे. 11 दिवसांच्या पर्यटन उत्सव रेड पांडा विंटर उत्सवाला 8 जानेवारी 2018 रोजी गंगटोकमध्ये सुरुवात झाली. त्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली.


Q. 9) कोणत्या राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे?
A) बिहार
B) पश्चिम बंगाल
C) महाराष्ट्र
D) जम्मू-काश्मीर
उत्तर : B) पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण : पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे. प्रतीकामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ आहे तर मध्यभागी ‘बिस्व बांग्ला’ ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे. यामध्ये हिरव्या रंगाला आधारभूत रंग दर्शवला गेला आहे.


Q.10) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय काथ्या (Coir) क्षेत्रात संभाव्य क्षमतेला बघता त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक नवी ‘काथ्यासंबंधी धोरण आणि दृष्टिकोन_______’ तयार करीत आहे.
A) 2019
B) 2020
C) 2021
D) 2022
उत्तर : B) 2020
स्पष्टीकरण : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय काथ्या (Coir) क्षेत्रात संभाव्य क्षमतेला बघता त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक नवी ‘काथ्यासंबंधी धोरण आणि दृष्टिकोन 2020’ तयार करीत आहे. वर्ष 2021-22 पर्यंत 20,000 कोटी रुपयांच्या काथ्या उत्पादनांची निर्यात आणि 40,000 कोटी रुपयांच्या देशांतर्गत विक्रीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.



  1. “Success is not measured by what you accomplish, but by the opposition you have encountered, and the courage with which you have maintained the struggle against overwhelming odds.”
    – Orison Swett Marden
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send