दररोज जनरल नॉलेज क्रमांक १६
जनरल नॉलेज
Q.1) जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या 48 व्या वार्षिक बैठकीसंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
I - स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात बैठक आयोजित केली गेली.
II – बैठक 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयाखाली भरविण्यात आली.
A) केवळ I
B) केवळ II
C) I आणि II दोन्ही
D) एकही नाही
उत्तर : A) केवळ I
स्पष्टीकरण : 22 जानेवारी 2018 रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या 48 व्या वार्षिक बैठकीला सुरूवात झाली. 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयावर आधारित पाच दिवसांच्या या बैठकीत व्यापार, राजनीति, कला, शिक्षण आणि नागरी समाज या विषयांशी जुळलेल्या हितधारकांची उपस्थिती राहणार आहे.
I - स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात बैठक आयोजित केली गेली.
II – बैठक 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयाखाली भरविण्यात आली.
A) केवळ I
B) केवळ II
C) I आणि II दोन्ही
D) एकही नाही
उत्तर : A) केवळ I
स्पष्टीकरण : 22 जानेवारी 2018 रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या 48 व्या वार्षिक बैठकीला सुरूवात झाली. 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयावर आधारित पाच दिवसांच्या या बैठकीत व्यापार, राजनीति, कला, शिक्षण आणि नागरी समाज या विषयांशी जुळलेल्या हितधारकांची उपस्थिती राहणार आहे.
Q.2) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ‘जागतिक आर्थिक दृष्टीकोन (WEO)’ अहवालानुसार, भारताचा सकल विकास उत्पन्न (GDP) वृद्धीदर वर्ष 2018 मध्ये ______ एवढा असेल, जेव्हा की चीनचा 6.8% एवढा असणार, असा अंदाज वर्तवला आहे.
A) 6.4%
B) 7.4%
C) 8.4%
D) 9.4%
उत्तर : B) 7.4%
स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ‘जागतिक आर्थिक दृष्टीकोन (WEO)’ अहवालानुसार, भारताचा सकल विकास उत्पन्न (GDP) वृद्धीदर वर्ष 2018 मध्ये 7.4% एवढा असेल, जेव्हा की चीनचा 6.8% एवढा असणार, असा अंदाज वर्तवला आहे. जागतिक अर्थव्यवस्था मूळ पदावर येत आहे आणि त्याचा वृद्धीदर वर्ष 2018 आणि वर्ष 2019 मध्ये 3.9% राहणार.
Q.3) भारतात कुठे प्रथम ‘आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद’ भरविण्यात आली?
A) मुंबई, महाराष्ट्र
B) चेन्नई, तामिळनाडू
C) तिरूवनंतपुरम, केरळ
D) नवी दिल्ली
उत्तर : C) तिरूवनंतपुरम, केरळ
स्पष्टीकरण : केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये प्रथम ‘आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषदेला (International Conference on dam safety) 22 जानेवारी 2017 पासून सुरुवात झाली. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
Q.4) ‘राष्ट्रीय वीरता पुरस्कार 2017’ घोषित विजेत्यांची कोणती जोडी चुकीची आहे?
A) ‘भारत पुरस्कार’ - नाजिया
B) ‘गीता चोपडा पुरस्कार’ - मरणोत्तर नेत्रावती एम. चावन
C) ‘संजय चोपडा पुरस्कार’ - कर्णवीर सिंह
D) ‘बापु गैधानी पुरस्कार’ – अनिल बैजल
उत्तर : D) ‘बापु गैधानी पुरस्कार’ – अनिल बैजल
स्पष्टीकरण : उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय वीरता पुरस्कार 2017’ घोषित विजेत्यांचा गौरव केला आहे. पुरस्कार विजेत्या 18 बालकांपैकी 2 मुली आणि एक मुलाला मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. 18 वीर बालकांमध्ये 7 मुली आणि 11 मुलांचा समावेश आहे. ‘भारत पुरस्कार’ - उत्तर प्रदेशची नाजिया; ‘गीता चोपडा पुरस्कार’ - मरणोत्तर कर्नाटकची नेत्रावती एम. चावन; ‘संजय चोपडा पुरस्कार’ - कर्णवीर सिंह; ‘बापु गैधानी पुरस्कार’ – मेघालयचा बैश्वाजान पेनलांग, ओडिशाची ममता दलाई आणि केरळचा सेबेस्टियन विन्सेट.
Q.5) कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने ‘स्विडिश ओपन ज्युनियर इंटरनॅशनल सीरिज 2018’ स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले?
A) सिद्धार्थ सिंह
B) अजय जयराम
C) समीर वर्मा
D) प्रणव चोप्रा
उत्तर : A) सिद्धार्थ सिंह
स्पष्टीकरण : बॅडमिंटनपटू सिद्धार्थ प्रताप सिंह याने स्विडनमध्ये खेळल्या गेलेल्या ‘स्विडिश ओपन ज्युनियर इंटरनॅशनल सीरिज 2018’ स्पर्धेत स्विडनच्या मॅड्स क्रिस्टोफर्सन याचा पराभव करून स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले आहे. 19 वर्षीय सिद्धार्थ सिंहचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
Q.6) कोणत्या राज्याच्या निमशहरी क्षेत्रात पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागतिक बँक आणि भारत यांच्यात $120 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला?
A) राजस्थान
B) अरुणाचल प्रदेश
C) उत्तराखंड
D) जम्मू-काश्मीर
उत्तर : C) उत्तराखंड
स्पष्टीकरण : उत्तराखंडमध्ये निमशहरी क्षेत्रात पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागतिक बँक आणि भारत यांच्यात $120 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे. या निधीमधून उत्तराखंडमध्ये निमशहरी भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अभिनव पद्धती अंमलात आणली जाणार आहे. वर्ष 2001 ते वर्ष 2011 या कालावधीत या राज्याच्या शहरी लोकसंख्येत 42% ची भर पडली आहे, जी
Q.7) भारत सरकारचा ‘राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष (NIIF) आणि संयुक्त अरब अमिरातच्या ______ यांच्यात भागीदारी करार करण्यात आला आहे.
A) एसए व्हेंचर
B) क्रिस्टल पॉइंट वर्ल्ड
C) डीपी वर्ल्ड
D) यूएई फंड
उत्तर : C) डीपी वर्ल्ड
स्पष्टीकरण : भारत सरकारचा ‘राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष (National Investment and Infrastructure Fund -NIIF) आणि संयुक्त अरब अमिरातच्या डीपी वर्ल्ड यांच्यात भागीदारी करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत भारतातली सर्व प्रकारची बंदरे, केंद्रे, परिवहन आणि मालवाहतुक व्यवसायांसाठी एक गुंतवणूक व्यासपीठ निर्माण केला जाणार आहे. यामधून मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि प्रकल्प विकासासाठी $3 अब्जची (सुमारे 195 अब्ज रुपये) गुंतवणूक केली जाणार.
Q.8) 24 वा वार्षिक क्रिस्टल पुरस्कार कोणाला मिळालेला नाही?
A) बेथ इस्रायल
B) शाहरुख खान
C) एल्टन जॉन
D) केट ब्लॅंचेट
उत्तर : A) बेथ इस्रायल
स्पष्टीकरण : बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानला दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) बैठकीत क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 24 वा वार्षिक क्रिस्टल पुरस्कार भारतात बाल व महिला अधिकारांची बाजू घेण्यासाठी दिला गेला आहे. संगीतकार एल्टन जॉन आणि अभिनेत्री केट ब्लॅंचेट यांना सुद्धा क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित केले गेले.
Q. 9) लाइबेरियाचे नवे राष्ट्रपती म्हणून पदाची शपथ कोणी घेतली?
A) एलेन जॉनसन सरलीफ
B) जॉर्ज वी
C) मोसेस ब्ला
D) लिलीयन थुरम
उत्तर : B) जॉर्ज वी
स्पष्टीकरण : माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जॉर्ज वी यांनी लाइबेरियाचे नवे राष्ट्रपती म्हणून पदाची शपथ घेतली आहे. जॉर्ज वी यांनी पदाचा कारभार एलेन जॉनसन सरलीफ यांच्याकडून स्वीकारला. एलेन जॉनसन सरलीफ पदावर 12 वर्ष कार्यरत होते.
Q.10) ‘ICC महिला टी20 विश्वचषक 2018’ स्पर्धा कोणत्या देशात खेळली जाणार आहे?
A) भारत
B) श्रीलंका
C) इंग्लंड
D) वेस्टइंडीज
उत्तर : D) वेस्टइंडीज
स्पष्टीकरण : ‘ICC महिला टी20 विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन 9-24 नोव्हेंबर 2018 या काळात वेस्टइंडीजमध्ये केले जाणार आहे. वेस्टइंडीजमध्ये एंटीगा व बार्बुडा, गुयाना आणि सेंट लुसिया या ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेत वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि आणखी दोन संघ खेळतील.
Q.11) WEF ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?
I - स्वित्झर्लंड ही जगातली सर्वात सर्वसमावेशक आधुनिक विकसित अर्थव्यवस्था आहे.
II - लाटविया उदयोन्मुख अर्थव्यवस्था गटात शीर्ष स्थानी आहे.
III - भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे.
A) केवळ I
B) केवळ II
C) केवळ III
D) एकही विधान बरोबर नाही
उत्तर : C) केवळ III
स्पष्टीकरण : दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीत ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ जाहीर करण्यात आला. नॉर्वे ही जगातली सर्वात सर्वसमावेशक आधुनिक विकसित अर्थव्यवस्था ठरली आहे. तर लिथुआनिया उदयोन्मुख अर्थव्यवस्था गटात शीर्ष स्थानी आहे. भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे.
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
"भगवत गीता" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...Thought By MPSC GUIDE
