दररोज जनरल नॉलेज क्रमांक १७
जनरल नॉलेज
Q.1) कोणत्या शहरात 25 जानेवारी रोजी ‘निवडणूक प्रक्रियेतील दिव्यांग व्यक्तींची समावेशकता विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ आयोजित केली गेली?
A) नवी दिल्ली
B) मुंबई
C) नागपूर
D) गुवाहाटी
उत्तर : A) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 25 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘निवडणूक प्रक्रियेतील दिव्यांग व्यक्तींची समावेशकता विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली. या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने केले गेले. या परिषदेचे आयोजन VoICE.NET व्यासपीठ अंतर्गत केले गेले. VoICE.NET हे एक जागतिक ज्ञानाचे जाळे आहे, ज्यात 25 पेक्षा जास्त निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था जुळलेल्या आहेत.
A) नवी दिल्ली
B) मुंबई
C) नागपूर
D) गुवाहाटी
उत्तर : A) नवी दिल्ली
स्पष्टीकरण : 25 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘निवडणूक प्रक्रियेतील दिव्यांग व्यक्तींची समावेशकता विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली. या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने केले गेले. या परिषदेचे आयोजन VoICE.NET व्यासपीठ अंतर्गत केले गेले. VoICE.NET हे एक जागतिक ज्ञानाचे जाळे आहे, ज्यात 25 पेक्षा जास्त निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था जुळलेल्या आहेत.
Q.2) 25 जानेवारी 2018 रोजी भारतीय निवडणूक आयोग (ECI) ने कोणत्या देशासोबत निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहयोगासाठी सामंजस्य करार केला?
A) गिनी
B) मोल्दोव्हा
C) मलेशिया
D) A आणि C
उत्तर : D) A आणि C
स्पष्टीकरण : भारतीय निवडणूक आयोग (ECI) ने गिनी देशाच्या नॅशनल इंडिपेंडेंट इलेक्टोरल कमिशन (CENI) सोबत निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहयोगासाठी सामंजस्य करार केला. तसेच हाच करार मोल्दोव्हाच्या सेंट्रल इलेक्शन कमिशन आणि इंटरनॅशनल इंस्टीट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टंस यांच्यासोबतही केला गेला.
Q.3) पर्यावरण मंत्रालयाने प्रमुख नदी जल प्रणालीच्या संवर्धनासाठी आणि पुनरुत्थानासाठी सादर केलेल्या नवीन धोरणांतर्गत सुरूवातीला योजना कोणत्या पाच राज्यांमध्ये राबवली जाणार आहे?
A) महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा
B) उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल
C) महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पंजाब
D) उत्तराखंड, आसाम, ओडिशा, मणीपुर आणि पश्चिम बंगाल
उत्तर : B) उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण : पर्यावरण मंत्रालयाने प्रमुख नदी जल प्रणालीच्या संवर्धनासाठी आणि पुनरुत्थानासाठी एका नवीन धोरणाची घोषणा केली आहे. गंगा नदीच्या पात्रासाठी सर्वात प्रथम उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यात याची अंमलबाजवणी होणार. या धोरणामधून वर्तमान धोरणाच्या तुलनेत संपूर्ण नदीच्या पात्रावर लक्ष केंद्रित केले जाईल. नवीन दृष्टिकोण नद्यांच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी आहे, ज्यामध्ये जल व्यवस्थापन व पर्यावरण व्यवस्थापन यांची एकत्रित अंमलबजावणी करून प्रदूषित पात्रातले नष्ट झालेले पर्यावरण पुनर्प्राप्त केली जाऊ शकणार.
Q.4) वर्ष 2017 साठी किती लोकांना ‘जीवन रक्षा पदक श्रृंखला’ पुरस्कार घोषित झाली आहेत?
A) 11
B) 22
C) 33
D) 44
उत्तर : D) 44
स्पष्टीकरण : वर्ष 2017 साठी 44 जणांना पुरस्कारांची ‘जीवन रक्षा पदक श्रृंखला’ प्रदान केले जाणार आहे. त्यामध्ये 7 जणांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’, 13 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 24 जणांना ‘जीवन रक्षा पदक’ यांनी गौरवण्यात येणार आहे. 7 जणांना पुरस्कार मरणोत्तर दिले जात आहे.
Q.5) महाराष्ट्रातील कोणाला वर्ष 2017 साठी जीवन रक्षा पदक शृंखला पुरस्कार जाहीर झाले नाही?
A) राजेंद्र गुरव
B) भानू पांडे
C) शुभंकर म्हात्रे
D) प्रणय तांबे
उत्तर : C) शुभंकर म्हात्रे
स्पष्टीकरण : वर्ष 2017 साठी 44 जणांना पुरस्कारांची ‘जीवन रक्षा पदक श्रृंखला’ प्रदान केले जाणार आहे. त्यामध्ये 7 जणांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’, 13 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 24 जणांना ‘जीवन रक्षा पदक’ यांनी गौरवण्यात येणार आहे. 7 जणांना पुरस्कार मरणोत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव, भानू पांडे यांना उत्तम जीवन रक्षा पदक, तर मास्टर प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत.
Q.6) CSIR-NAL द्वारा निर्मित _______ या 14 आसनी स्वदेशी विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पडले.
A) SARAS PT1N
B) YOGA SK-A
C) KIRAN XN
D) ADITYA N-1H
उत्तर : A) SARAS PT1N
स्पष्टीकरण : सारस (SARAS PT1N) या 14 आसनी स्वदेशी विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरीत्या पार पडले. CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (CSIR-NAL) द्वारा रचले आणि विकसित केले गेले आहे.
Q.7) महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने कोणासाठी एका द्रुत संपर्क प्रणाली (RRS) च्या प्रथम टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला?
A) किशोरी माता
B) पीडित बालक
C) किशोरवयीन मुली
D) संकटात सापडलेल्या महिला व मुली
उत्तर : C) किशोरवयीन मुली
स्पष्टीकरण : महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने किशोरवयीन (11 ते 14 वर्षे वय) मुलींसाठी एका द्रुत संपर्क प्रणाली (Rapid Reporting System) च्या प्रथम टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही एक संकेतस्थळ आधारित ऑनलाइन संनियंत्रण प्रणाली आहे, जी किशोरवयीन मुलींसाठी योजनांवर देखरेख ठेवणार. ‘http://sag-rrs.nic.in’ या संकेतस्थळावरील व्यासपीठाला राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) च्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.
Q.8) भारतात तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कोणती योजना नाही?
A) टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्सेलंस (TARE)
B) ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप
C) भाभा फंडामेंटल रिसर्च अवॉर्ड
D) ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)
उत्तर : C) भाभा फंडामेंटल रिसर्च अवॉर्ड
स्पष्टीकरण : भारतात संशोधनाला वाव देण्यासाठी देशातील तरुण शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्सेलंस (TARE)’ योजना; ‘ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप’ योजना; डिस्टिंग्वीश इंवेस्टिगेटर अवॉर्ड; 'ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)' योजना.
Q. 9) जानेवारी 2018 मध्ये कोणत्या राज्य शासनाने किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली?
A) महाराष्ट्र
B) पंजाब
C) केरळ
D) कर्नाटक
उत्तर : A) महाराष्ट्र
स्पष्टीकरण : किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्य शासनाने बंदी घातली आहे. ज्या दुकानातून ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) विक्री होते अशा दुकानात आता विक्रीसाठी तंबाखू ठेवता येणार नाही. याशिवाय सुगंधी सुपारीवरील बंदीला जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ दिली गेली.
Q.10) कोणी क्लीन अँड जर्क मधील कर्णम मल्लेश्वरीचा 1999 साली अथेन्समध्ये बनविलेला 127 किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला?
A) नंदिनी देवी
B) राखी हलदर
C) साईखोम मीराबाई चानू
D) यापैकी नाही
उत्तर : B) राखी हलदर
स्पष्टीकरण : रेल्वे संघाची राखी हलदर हिने 33 व्या ‘महिला सीनियर राष्ट्रीय भारोत्तोलन विजेतेपद’ स्पर्धेत महिलांच्या 63 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. राखीने क्लीन अँड जर्क मध्ये 128 किलो भार उचलले आणि एकूण 230 किलो भारासह पहिले स्थान जिंकले. तिने क्लीन अँड जर्क मधील कर्णम मल्लेश्वरीचा 1999 साली अथेन्समध्ये बनविलेला 127 किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
Q.11) बँकांचे (PSB) पुनर्भाँडवलीकरण करण्यासंदर्भात योजनेमध्ये, वर्ष 2017-18 च्या भांडवल गुंतवणूक योजनेमध्ये पुनर्भाँडवलीकरण बॉण्डच्या माध्यमातून ________ आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या रूपात 8,139 कोटी रुपयांचा समावेश आहे.
A) 20,000 कोटी रुपये
B) 40,000 कोटी रुपये
C) 60,000 कोटी रुपये
D) 80,000 कोटी रुपये
उत्तर : D) 80,000 कोटी रुपये
स्पष्टीकरण : भारत सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये घोषित सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे (PSB) पुनर्भाँडवलीकरण करण्यासंदर्भात योजनेचा संपूर्ण तपशील स्पष्ट केला आहे. वर्ष 2017-18 च्या भांडवल गुंतवणूक योजनेमध्ये पुनर्भाँडवलीकरण बॉण्डच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या रूपात 8,139 कोटी रुपयांचा समावेश आहे.
Q.12) वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण 180 देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत _____ व्या स्थानी आहे.
A) 177
B) 178
C) 179
D) 180
उत्तर : A) 177
स्पष्टीकरण : वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण 180 देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत 177 व्या स्थानी आहे.
"समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार ,
तुला समुद्र नाही का बनायचं?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले ,
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले?
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो"
Thought By MPSC GUIDE
