दररोज जनरल नॉलेज क्रमांक १४

जनरल नॉलेज


Q.1) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष कोण आहेत?
A) नृपेंद्र मिश्रा
B) हसमुख अधिया
C) ए. एस. किरन कुमार
D) के. सिवन
उत्तर : D) के. सिवन
स्पष्टीकरण : प्रसिद्ध वैज्ञानिक के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले गेली आहे. तिरुवानंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे वर्तमान संचालक के. सिवन यांची नियुक्ती ए. एस. किरन कुमार यांच्या जागेवर करण्यात आली आहे. त्यांच्या या पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ राहणार आहे.


Q.2) SEBI 2009 सालच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी कोणत्या ऑडिटिंग कंपनीवर दोन वर्षांची बंदी घातली?
A) प्राइस वॉटरहाउस नेटवर्क
B) डेलोइट
C) यू. एस. सचिन गुजर अँड असोसिएट्स
D) KPMG
उत्तर : A) प्राइस वॉटरहाउस नेटवर्क
स्पष्टीकरण : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ‘प्राइस वॉटरहाउस नेटवर्क (PW)’ या ऑडिटिंग कंपनीवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. 2009 साली प्रसिद्धीस आलेल्या सत्यम घोटाळ्यात PW च्या कथित भूमिकेत दोष आढळून आल्याने हा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे ही कंपनी एप्रिल 2018 पासून समभाग बाजाराच्या यादीतील कोणत्याही कंपनीचे ऑडिट करू शकणार नाही.


Q.3) UIDAI च्या नव्या आभासी ओळख (virtual ID) संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
I - आभासी ओळख 10 अंकी क्रमांक असणार.
II - 1 मार्च 2018 पासून सर्वीकडे व्यक्तीची आभासी ओळख वापरली जाणार.
A) फक्त I
B) फक्त II
C) I आणि II
D) एकही नाही
उत्तर : A) फक्त I
स्पष्टीकरण : गोपनीयतेच्या समस्येला हाताळण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आभासी ओळख (virtual ID) संकल्पना सादर केली आहे. नव्या यंत्रणेत व्हेरिफिकेशनासाठी आता आधार क्रमांक नाही तर एक आभासी ओळख द्यावी लागणार. ही यंत्रणा दोन स्तराची आहे. यात कोणत्याही आधार धारकासाठी आधारच्या 12 अंकी संख्येच्या ऐवजी 16 अंकी एक आभासी ओळख तयार करण्यात येणार. या आभासी ओळखीच्या वापराने त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती गुपित राखली जाणार. ही आभासी ओळख फक्त गरजेच्या वेळीच वापर करण्यासाठी निर्माण केली जाणार. नवी यंत्रणा 1 मार्च 2018 पासून सर्वीकडे वापरली जाणार.


Q.4) कोणत्या टायर निर्माता कंपनीने राजीव प्रसाद यांना भारतामधील कार्याच्या प्रेसिडेंट पदी नियुक्त केले?
A) अपोलो टायर
B) MRF टायर
C) जेके टायर इंडस्ट्रीज
D) सीट टायर
उत्तर : C) जेके टायर इंडस्ट्रीज
स्पष्टीकरण : जेके टायर इंडस्ट्रीजने राजीव प्रसाद यांना भारतामधील कार्याच्या प्रेसिडेंट पदी नियुक्त केले आहे. राजीव प्रसाद यांना जवळजवळ 30 वर्षांचा मोठ्या व्यवसायांचे व्यवस्थापन करण्याचा प्रगल्भ अनुभव आहे.


Q.5) IOA ने कोणाची 2018 हिवाळी ऑलंपिक खेळांसाठी भारताचे ‘शेफ डी मिशन’ म्हणून नियुक्ती केली?
A) अजित बॅनर्जी
B) हरजिंदर सिंह
C) दुष्यंत चौटाला
D) राजीव मेहता
उत्तर : B) हरजिंदर सिंह
स्पष्टीकरण : भारतीय ऑलंपिक संघ (IOA) ने भारतीय आइस हॉकी महासंघाचे महासचिव हरजिंदर सिंह यांची 2018 हिवाळी ऑलंपिक खेळांसाठी भारताचे ‘शेफ डी मिशन’ म्हणून नियुक्ती केली आहे. दक्षिण कोरियात प्योंगचांगमध्ये हिवाळी ऑलंपिक खेळांचे आयोजन 9-23 फेब्रुवारी 2018 या काळात केले गेले आहे.


Q.6) ब्रिटनच्या मंत्रिमंडळात कोणत्या भारतीय वंशाच्या संसदीय सदस्याला सामील केले गेले?
A) प्रीत कौर गील
B) कमल सिंह
C) ऋषी सुनक
D) परविंदर सिंह
उत्तर : C) ऋषी सुनक
स्पष्टीकरण : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करून भारतीय वंशाचे संसदीय सदस्य ऋषी सुनक यांना सामील केले आहे. 36 वर्षीय ऋषी सुनक ब्रिटनच्या निवास, समुदाय आणि स्थानिक प्रशासन मंत्रालयात राज्य सचिव पदी नियुक्त केले गेले आहे.


Q.7) सर्वोच्च न्यायालयाने ______ साली झालेल्या शीख-विरोधी दंगली संबंधित 186 खटल्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यासाठी आणि त्यासाठी नवे विशेष तपास चमू (SIT) गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.
A) 1984
B) 1985
C) 1986
D) 1987
उत्तर : A) 1984
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयाने 1984 साली झालेल्या शीख-विरोधी दंगली संबंधित 186 खटल्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यासाठी आणि त्यासाठी नवे विशेष तपास चमू (SIT) गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख-विरोधी प्रकरणांचा तपास घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय SIT स्थापन केली जाणार.


Q.8) ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स अनुसार संपूर्ण इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणती ठरली?
A) जेफ बेझोस
B) बिल गेट्स
C) वॉरन बफेट
D) मार्क झुकरबर्ग
उत्तर : A) जेफ बेझोस.
स्पष्टीकरण : अॅमेझॉनचे संस्थापक आणि CEO जेफ बेझोस हे $105.1 अब्जच्या संपत्तीसह संपूर्ण इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स अनुसार, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना बेझोस यांनी मागे टाकले आहे. गेट्स यांची $93.3 अब्ज संपत्ती आहे. त्यानंतर या यादीत शीर्ष 10 मध्ये वॉरन बफेट, मार्क झुकरबर्ग, अमानसिको ओर्टेगा, कार्लोस स्लिम, बर्नार्ड अरनॉल्ट, लॅरी पेज, लॅरी एलिसन आणि सर्जी ब्रिन हे आहेत.


Q. 9) कोणत्या राज्यात चौथ्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे आयोजन केले गेले?
A) आसाम
B) अरुणाचल प्रदेश
C) सिक्किम
D) बिहार
उत्तर : D) 150 वर्ष
स्पष्टीकरण : 11 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बिहारच्या राजगीर शहरात चौथ्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. धर्म व समाज अध्ययन केंद्र, इंडिया फाउंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने नालंदा विद्यापीठातर्फे आयोजित या तीन दिवसीय परिषदेत 11 देशांमधून आलेल्या लोकांनी सहभाग घेतला आहे.


Q.10) ‘एल्पाइन एज्डेर 3200 चषक’ स्पर्धेत स्कीइंगमधील स्लालोम शर्यत गटात कांस्य पदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून देणार्या खेळाडूचे नाव ओळखा.
A) सुधीर मोरे
B) आंचल ठाकुर
C) कुमारी कन्यका
D) मोहित सिंह
उत्तर : B) आंचल ठाकुर
स्पष्टीकरण : आंचल ठाकुरने टर्कीमध्ये आयोजित ‘एल्पाइन एज्डेर 3200 चषक’ स्पर्धेत स्कीइंगमधील स्लालोम शर्यत गटात कांस्य पदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. ‘एल्पाइन एज्डेर 3200 चषक’ चे आयोजन आइस स्कीइंग खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ ‘आंतरराष्ट्रीय स्की महासंघ (FIS)’ तर्फे केले गेले.



  1. “Success is not the key to happiness. Happiness is the key to success. If you love what you are doing, you will be successful.”
    – Herman Cain
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send