चालू घडामोडी : ०५ जानेवारी २०१७

🛡 संरक्षण मंत्रालयाकडून सेनासाठी 2420 कोटी रुपयांचे करार मंजूर 🛡
👉 संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी आणि नौदलासाठी 2,420 कोटी रुपयांच्या करार प्रस्तावांना मंजूर केले आहे.

👉 या करारांमध्ये बोइंगकडून सुमारे 1950 कोटी रुपयांनी 10 वर्षांच्या व्यापक देखरेख सेवासह P-8I प्रशिक्षण उपाययोजना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून 470 कोटी रुपयांना लो इंटेंसिटी कंल्फिक्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम (LICEWS) यांची खरेदी समाविष्ट आहे.

स्त्रोत : AIR


टाटा मेमोरियल सेंटरतर्फे प्रथम ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्यूटोरियलचा शुभारंभ
👉 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देशाचे प्रथम ऑनलाइन ऑन्कोलॉजी ट्यूटोरियल मालिकेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

👉 ऑन्कोलॉजी ट्यूटोरियल मालिका सुरू करण्यामागचा उद्देश्य म्हणजे, देशभरातल्या डॉक्टरांना विविध प्रकारच्या कर्करोगासंबंधी ओळख, उपाय, वेदना शमन, पुनर्वसन आणि उपचारासंदर्भात प्रशिक्षित आणि शिक्षित करणे. हा राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे आणि याला राज्य शासनांच्या सहकार्याने देशभरात टाटा मेमोरियल सेंटरकडून चालवल्या जाणार.

👉 संपूर्ण अभ्यासक्रम 7 आठवड्यांचा आहे. यामध्ये कर्करोगाच्या विविध संकेतस्थळावरील विविध मॉड्यूल आहेत. यामध्ये 40 चलचित्र तास आणि इतर माहितीसह विशेषज्ञ डॉक्टरांचे 14 तासाचे व्यापक ई-शिक्षण दिले जात आहे.

स्त्रोत : PIB



भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञान मोहीमेसंदर्भात सामंजस्य करार
👉 भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञान मोहीम (TMIR) याला अर्थ सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या 3 मंत्रालयांनी एक सामंजस्य करार केला आहे. हा करार रेल्वे मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) यांच्यात झाला आहे.

👉 या करारानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रकल्पांमध्ये 75-75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. भारी वाहतूक, सुरक्षा, ऊर्जा, पर्यावरण आणि शहरी, रेल्वे या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पांना राबवले जाणार.

👉 अप्लाइड संशोधनासाठी निवडक रेल्वे प्रकल्पांमधील गुंतवणूक सामायिक करण्यास मार्ग मोकळा होणार. या प्रकल्पांमध्ये रेल्वे मंत्रालय 30%, मनुष्यबळ विकास मंत्रालय 25% आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग 25% गुंतवणूक करतील. स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकासाला चालना मिळणार तसेच शिक्षण व संशोधन संस्था अनेक संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होणार.

स्त्रोत : PIB



अमेरिकाने पाकिस्तानला दिली जाणारी $1.15 अब्जची मदत बंद केली
👉अमेरिकाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी $1.15 अब्जची सुरक्षा मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पाकिस्तानला दिली जाणारी सर्वप्रकारची सैन्य मदत थांबविण्यात आली आहे आणि अमेरिकाने पाकिस्तानला धार्मिक स्वतंत्रतेच्या गंभीर उल्लंघनासंदर्भात विशेष देखरेख यादीमध्ये नोंदवले. पाकिस्तान या यादीत समाविष्ट होणारा पहिला देश आहे. या श्रेणीला 2016 सालच्या एका विशेष कायद्याद्वारा तयार करण्यात आले आहे.

स्त्रोत : ANS


महाराष्ट्र शासन इंग्रजी माध्यम नसलेल्या शाळांसाठी शिक्षण मंडळ तयार करणार
👉 महाराष्ट्र राज्य शासनाने इंग्रजी माध्यम नसलेल्या शाळांसाठी शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 राज्याने अश्या शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 100 मराठी शाळा नवीन अभ्यासक्रमासाठी निवडल्या जातील.
स्त्रोत : AIR


राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे निधन
👉 ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
ठाणे जिल्ह्यातील नेते डावखरे 1992 सालापासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले गेले. 1998 साली विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सलग 18 वर्षे ते उपसभापती होते.

स्त्रोत : AIR


न्यायालयाने बिहारला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली
👉 सर्वोच्च न्यायालयाने बिहार क्रिकेट मंडळ (BCA) ला रणजी करंडक आणि त्यासारख्याच अन्य राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यास स्विकृती दिली आहे. प्रधान न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
2001 साली जेव्हा बिहारपासून झारखंड नवे राज्य बनले, तेव्हा BCCI ने बिहारच्या जागी झारखंडच्या मंडळाला पूर्ण सदस्यता दिली होती. त्यामुळे बिहारच्या संघाला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास परवानगी नव्हती.

स्त्रोत : बिजनेस स्टँडर्ड


चीनमध्ये 34 व्या ‘हार्बिन आंतरराष्ट्रीय बर्फ कला मेळावा’ सुरू
👉 1 जानेवारीपासून चीनच्या ईशान्येकडे हाईलोंगजियांग प्रांतात "ब्राइट पर्ल ऑफ क्राउन ऑफ आइस अँड स्नो’ या विषयावर आधारित 34 व्या ‘हार्बिन आंतरराष्ट्रीय बर्फ कला मेळावा’ चा शुभारंभ झाला आहे. या कार्यक्रम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

👉 चीनमधील या बर्फाळ प्रदेशात आयोजित या कार्यक्रमात बर्फापासून तयार करण्यात येणार्या मुर्त्या आणि इतर कलाकृती प्रदर्शनास मांडल्या जातात. याशिवाय विविध खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.
‘हार्बिन मेळावा’ 1985 सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होतो. हार्बिन हाईलोंगजियांग प्रांताचे राजधानी शहर आहे आणि हा चीनमध्ये निर्माण झालेला बर्फ कलाकृतीचा मोठा महोत्सव आहे.

स्त्रोत : ट्रॅवल चायना गाइड


तब्बल 150 वर्षानंतर 31 जानेवारीला आकाशात 'निळा चंद्र' दिसणार
👉 150 वर्षांत एकदाच असा योग येतो जेव्हा आकाशात निळा चंद्र दिसतो. 31 जानेवारीला दुसऱ्या पूर्णिमेला एक दुर्मिळ चंद्रग्रहण आढळून येणार आहे, ज्याला ‘निळा चंद्र (Blue Moon)’ देखील म्हणतात.

👉 हे वर्ष 2018 चे पहिले ग्रहण आहे. भारतासह आशियातील काही भागांमध्ये उगवताच ग्रहण दिसणार. मध्य आणि पूर्व आशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात हे दृश्य उत्तम आढळून येणार. यापूर्वी 31 मार्च 1866 रोजी पूर्ण चंद्रग्रहण दिसले होते.

स्त्रोत : डीडी न्यूज


6 जानेवारीपासून दिल्लीत ‘जागतिक पुस्तक मेळावा 2018’ सुरू
👉 नवी दिल्लीत 6 जानेवारी ते 14 जानेवारी 2018 या काळात 26 व्या ‘जागतिक पुस्तक मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे.

👉 राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे आयोजित हा कार्यक्रम यावर्षी ‘पर्यावरण व हवामान बदल’ या विषयावर आधारित आहे. यामध्ये जवळपास 40 देशांमधील प्रकाशकांचा सहभाग दिसून येणार आहे. भारतातून 800 हून अधिक प्रकाशक यामध्ये भाग घेणार आहेत.

👉 ‘जागतिक पुस्तक मेळावा’ हा कोलकाता पुस्तक मेळाव्यानंतर भारताचा दुसर्या क्रमांकाचा सर्वात जुना आणि मोठा पुस्तक मेळावा आहे. पहिल्यांदा 18 मार्च ते 4 एप्रिल 1972 या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. 2013 सालापासून राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.


स्त्रोत : इंडियन एक्सप्रेस


Archive

Contact Form

Send