दररोज जनरल नॉलेज क्रमांक ११
जनरल नॉलेज
Q.1) जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी जगातला सर्वात लांब ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यास मंजूरी मिळाली. हा बोगदा किती लांबीचा असणार आहे?
A) 11.15 किलोमीटर
B) 12.15 किलोमीटर
C) 13.15 किलोमीटर
D) 14.15 किलोमीटर
उत्तर : D) 14.15 किलोमीटर
स्पष्टीकरण : आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम 14.15 किलोमीटर लांबीचा ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यास मंजूरी दिली आहे. एकूण 6,809 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जोजिला भूप्रदेशातला प्रवास 3.5 तासाच्या जागी फक्त 15 मिनटात होऊ शकणार आणि हा जगातला सर्वात लांब बोगदा असणार. यामुळे श्रीनगर, कारगिल आणि लेह यामध्ये सर्वकाळ संपर्क सुविधा असेल.
A) 11.15 किलोमीटर
B) 12.15 किलोमीटर
C) 13.15 किलोमीटर
D) 14.15 किलोमीटर
उत्तर : D) 14.15 किलोमीटर
स्पष्टीकरण : आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम 14.15 किलोमीटर लांबीचा ‘जोजिला बोगदा’ तयार करण्यास मंजूरी दिली आहे. एकूण 6,809 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जोजिला भूप्रदेशातला प्रवास 3.5 तासाच्या जागी फक्त 15 मिनटात होऊ शकणार आणि हा जगातला सर्वात लांब बोगदा असणार. यामुळे श्रीनगर, कारगिल आणि लेह यामध्ये सर्वकाळ संपर्क सुविधा असेल.
Q.2) मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशात कुठे AIIMS स्थापन करण्यास मंजूरी दिली?
A) बिलासपुर
B) शिमला
C) मनाली
D) धरमशाला
उत्तर : A) बिलासपुर
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथे ‘अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (AIIMS)’ स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. 1,351 कोटी रुपयांची ही संस्था ‘प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना’ अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
Q.3) आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीने अन्नधान्य आणि साखर भरून ठेवण्याकरिता _______ची पॅकेजिंग वापरण्यास अनिवार्य करण्यास विस्तारीत काळासाठी मंजूरी दिली आहे. हा नियम जून 2018 मध्ये समाप्त होणार असल्यामुळे ही मंजूरी आहे.
A) ताग
B) प्लास्टिक
C) कागदी
D) A आणि C
उत्तर : A) ताग
स्पष्टीकरण : आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीने अन्नधान्य आणि साखर भरून ठेवण्याकरिता तागाची पॅकेजिंग (तागापासून विणलेली थैली/चुंगडी/पिशवी) वापरण्यास अनिवार्य करण्यास विस्तारीत काळासाठी मंजूरी दिली आहे. हा नियम जून 2018 मध्ये समाप्त होणार असल्यामुळे ही मंजूरी आहे. नियमानुसार, 90% अन्नधान्य आणि 20% साखरेची उत्पादने तगापासून बनविलेल्या पिशवीत साठवल्या जाते.
Q.4) गृह मंत्रालयाने कोणत्या माध्यमातून ई-व्हिसासह येणार्या पर्यटकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत बायोमेट्रिक नोंदणीच्या आवश्यकतेपासून सूट दिली?
A) विमानमार्गे
B) क्रुज जहाज जलमार्गे
C) रस्त्यामार्गे
D) वरील तीनही
उत्तर : B) क्रुज जहाज जलमार्गे
स्पष्टीकरण : गृह मंत्रालयाने जलवाहतुक मंत्रालयाच्या मागणीवरून ई-व्हिसासह येणार्या क्रुज पर्यटकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत बायोमेट्रिक नोंदणीच्या आवश्यकतेपासून सूट दिली आहे.
Q.5) जानेवारी 2018 मध्ये मंत्रिमंडळाने कोणत्या क्षेत्रात सहकार्य चालविण्यासाठी भारताला इस्रायलसोबतच करारास मंजूरी दिली?
A) नागरी विमानवाहतूक
B) रस्ते रहदारी व्यवस्थापन यंत्रणा
C) तेल व नैसर्गिक वायू
D) जलवाहतूक व्यवस्थापन यंत्रणा
उत्तर : C) तेल व नैसर्गिक वायू
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्य चालविण्यासाठी भारत आणि इस्रायल दरम्यान केल्या जाणार्या सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्यातून गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन व विकास (R&D), संयुक्त अभ्यास करणे, मनुष्यबळ क्षमता निर्मिती आणि स्टार्ट-अप क्षेत्रात युती करण्यामध्ये सुलभता येणार.
Q.6) जानेवारी 2018 मध्ये मंत्रिमंडळाने भू-सीमा पार करण्यासंदर्भात कोणत्या शेजारी राष्ट्रासोबतच्या करारास मंजूरी दिली?
A) नेपाळ
B) भुटान
C) बांग्लादेश
D) म्यानमार
उत्तर : D) म्यानमार
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने भू-सीमा पार करण्यासंदर्भात असणार्या म्यानमारसोबतच्या करारास मंजूरी दिली आहे. या करारामधून भारत आणि म्यानमार यांच्या सीमा क्षेत्रात वास्तव्य करणार्या लोकांच्या मुक्त स्वैराचारासंबंधित उपस्थित अधिकारांचे नियमन व त्यामध्ये सामंजस्य राखण्यास सुलभता मिळणार.
Q.7) भारतातली सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आणि भारतात उच्च क्षमतेच्या बसेसचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कोणासह करार करणार आहे?
A) फेडरल रोड एजन्सी, अमेरिका
B) ट्रान्सपोर्ट फॉर लंडन, ब्रिटन
C) सिमेन्स ट्रान्सपोर्ट सिस्टम, जपान
D) यापैकी नाही
उत्तर : B) ट्रान्सपोर्ट फॉर लंडन, ब्रिटन
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातली सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि ब्रिटनमधील 'ट्रान्सपोर्ट फॉर लंडन' यांच्यात सामंजस्य करार करण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली आहे. कराराची भारतातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रवासी सेवा सुधारण्यासाठी आणि भारतात उच्च क्षमतेच्या बसेसचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मदत होणार.
Q.8) अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) चे नवे महानिदेशक कोण आहेत?
A) अभय
B) राजिंदर खन्ना
C) बिपिन रावत
D) आर. आर. भटनागर
उत्तर : A) अभय.
स्पष्टीकरण : वरिष्ठ IPS अधिकारी अभय यांना अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) चे महानिदेशक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत ही नियुक्ती आहे. एप्रिल 2017 मध्ये आर. आर. भटनागर यांनी CRPF चा भार सांभाळल्यापासून हे पद रिक्त होते.
Q. 9) अमेरिकेची कंपनी कोणत्या विमानचालन कंपनीच्या अपघातग्रस्त MH370 विमानाचा तपास करणार आहे?
A) जपान एयरलाइन्स
B) एमीरेट्स एयरलाइन्स
C) साऊथ एशिया एयरलाइन्स
D) मलेशिया एयरलाइन्स
उत्तर : D) मलेशिया एयरलाइन्स
स्पष्टीकरण : अमेरिकेच्या अन्वेषण कंपनी आपल्या उच्च-तंत्रज्ञानाणे सक्षम असलेल्या जहाजाचा वापर करून मलेशिया एयरलाइन्सच्या अपघातग्रस्त MH370 विमानाचा तपास करणार आहे. विमानचालनातले हे सर्वात मोठे गूढ सोडवण्यासाठी हो मोहीम राबवली जात आहे. मार्च 2014 मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे MH370 विमान 239 प्रवाश्यांसह गायब झाले. कुला लंपुरकडून बीजिंगकडे उड्डाण घेतलेले हे विमान आपल्या मार्गावरून हटल्यानंतर अचानक गायब झाले.
Q.10) 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2018 दरम्यान आयजित ‘जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (JIFF) 2018’ चे उद्घाटन कोणत्या चित्रपटाने होणार?
A) लाईज वी टेल
B) अंग्रेजी मे कहते है
C) परमाणु
D) की मू
उत्तर : B) अंग्रेजी मे कहते है
स्पष्टीकरण : 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2018 दरम्यान राजस्थानमध्ये ‘जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (JIFF) 2018’ आयजित करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन 'अंग्रेजी मे कहते है’ या हिन्दी चित्रपटाने केले जाणार आहे तर शेवट ‘लाईज वी टेल’ या हॉलीवूड चित्रपटाने केले जाणार आहे.
Q.11) कोणत्या भारतीय कंपनीने विषमज्वरावर ‘टायपबार-TCV’ लस विकसित केली, जीला WHO कडून मान्यता प्राप्त झाली?
A) भारत बायोटेक
B) अपोलो हेल्थकेयर
C) बायोकॉन
D) भारत सीरम अँड वॅक्सीन लिमिटेड
उत्तर : A) भारत बायोटेक
स्पष्टीकरण : विषमज्वर (Typhoid) आजारावर हैदराबादमधील ‘भारत बायोटेक’ कंपनीने तयार केलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता प्राप्त झाली आहे. WHO ने 6 ते 23 महिन्यांच्या नवजात आणि 2 ते 15 वर्षांदरम्यानच्या लहान मुलांसाठी या लसीचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ‘टायपबार-TCV’ (Typbar TCV) किंवा ‘टायफॉइड कोंज्युगेट वॅक्सीन’ नामक ही लस आता जागतिक सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमासाठी वापरली जाऊ शकणार.
वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात
महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा,
जिथे तुम्हाला सर्वात
जास्त परतफेड मिळेल.Thought By MPSC GUIDE
