दररोज जनरल नॉलेज क्रमांक १५
जनरल नॉलेज
Q.1) भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. यावर्षी _____ लष्कर दिन साजरा होतोय.
A) 30 वा
B) 40 वा
C) 50 वा
D) 70 वा
उत्तर : D) 70 वा
स्पष्टीकरण : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. यावर्षी 70 वा लष्कर दिन साजरा होतोय. 15 जानेवारी 1949 पासूनच भारताचे लष्कर ब्रिटिश लष्करापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले. या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. त्यावेळी के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचे 'कमांडर-इन-चीफ' बनविण्यात आले होते आणि ते पहिले प्रजासत्ताक भारताचे प्रथम लष्कर प्रमुख बनले.
A) 30 वा
B) 40 वा
C) 50 वा
D) 70 वा
उत्तर : D) 70 वा
स्पष्टीकरण : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी 15 जानेवारीला ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. यावर्षी 70 वा लष्कर दिन साजरा होतोय. 15 जानेवारी 1949 पासूनच भारताचे लष्कर ब्रिटिश लष्करापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले. या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. त्यावेळी के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचे 'कमांडर-इन-चीफ' बनविण्यात आले होते आणि ते पहिले प्रजासत्ताक भारताचे प्रथम लष्कर प्रमुख बनले.
Q.2) दिल्लीच्या त्रिमूर्ती चौकाचे नामांतर केल्यानंतर त्याचे नवे नाव काय आहे?
A) त्रिमूर्ती विजय चौक
B) त्रिमूर्ती हैफा चौक
C) विजय चौक
D) त्रिमूर्ती हिंद चौक
उत्तर : B) त्रिमूर्ती हैफा चौक
स्पष्टीकरण : दिल्लीच्या त्रिमूर्ती चौकाचे नामांतर करून त्याचे ‘त्रिमूर्ती हैफा चौक’ असे नाव ठेवले गेले आहे. हैफा हे उत्तर इस्राइलचे बंदर शहर आहे. हैफाची लढाई पहिल्या विश्वयुद्धाच्या दरम्यान 23 सप्टेंबर 1918 रोजी शरोनची लढाई संपवण्यासाठी लढली गेली. यात वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे नाव देण्यात आले.
Q.3) जानेवारी 2018 मध्ये कोणत्या देशासोबत भारताने अवैधपणे स्थलांतरित भारतीय प्रवाश्यांची वापसी व फौजदारी नोंद आणि गुप्त माहिती सामायिक करण्यासंदर्भात दोन करार केलेत?
A) ब्रिटन
B) युरोपीय संघ
C) अमेरिका
D) फ्रान्स
उत्तर : A) ब्रिटन
स्पष्टीकरण : भारत आणि ब्रिटन यांनी अवैधपणे स्थलांतरित भारतीय प्रवाश्यांची वापसी व फौजदारी नोंद आणि गुप्त माहिती सामायिक करण्यासंदर्भात दोन करारांवर स्वाक्षर्या केल्या आहेत.
Q.4) कोणत्या देशात महिलांना मद्य खरेदी करण्याची परवानगी देणाच्या सरकारच्या निर्णयाला राष्ट्रपतीने स्थगिती दिली?
A) नेपाळ
B) श्रीलंका
C) भुटान
D) चीन
उत्तर : B) श्रीलंका
स्पष्टीकरण : श्रीलंकेत महिलांना मद्य खरेदी करण्याची परवानगी देणार्या सरकारच्या निर्णयावर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी आक्षेप घेत सरकारच्या निर्णयावर बंदी आणली आहे. श्रीलंका सरकारने 10 जानेवारी 2018 रोजी 1955 सालच्या एका कायद्यात बदल करण्याची घोषणा केली होती, ज्यांतर्गत वय वर्षे 18 पेक्षा अधिक वय असलेल्या महिलांवरील मद्य खरेदीचा प्रतिबंध रद्द करण्यात आला होता. सोबतच महिलांना त्या ठिकाणी काम करण्याची परवानगी देण्यात आली, जेथे मद्य विक्री होते.
Q.5) ______ राज्यात मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत आहे. वर्ष 2017 मध्ये 1000 मुलांमागे 914 मुलींचे सर्वोच्च नवजात लिंग गुणोत्तर (SRB) नोंदवले गेले आहे, जेव्हा की हे प्रमाण 2016 साली 900 आणि 2015 साली फक्त 876 एवढे होते.
A) बिहार
B) राजस्थान
C) नागालँड
D) हरियाणा
उत्तर : D) हरियाणा
स्पष्टीकरण : हरियाणात मुलींचा जन्मदर वाढलेला दिसून येत आहे. वर्ष 2017 मध्ये 1000 मुलांमागे 914 मुलींचे सर्वोच्च नवजात लिंग गुणोत्तर (sex ratio at birth -SRB) नोंदवले गेले आहे, जेव्हा की हे प्रमाण 2016 साली 900 आणि 2015 साली फक्त 876 एवढे होते. राज्याच्या 17 जिल्ह्यांमध्ये 900 हून अधिक मुलींचा जन्मदर दिसून आलेला आहे. वर्ष 2017 मध्ये कोणताही जिल्हा 880 च्या आकड्याखाली नाही. जानेवारी-डिसेंबर 2017 या काळात राज्यात जन्मलेल्या 5,09,290 बाळांपैकी 2,66,064 मुले आणि 2,43,226 मुली होत्या.
Q.6) कोणत्या भारतीयाने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगवान शतक झळकावले?
A) ऋषभ पंत
B) राजिंदर गोयल
C) वसीम जाफर
D) आदित्य कौशिक
उत्तर : A) ऋषभ पंत
स्पष्टीकरण : हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळलेल्या ‘सईद मुश्ताक अली टी-20 करंडक’ स्पर्धेच्या सामन्यात केवळ 32 चेंडूत शतक झळकावून ऋषभ पंतने टी-20 च्या इतिहासात सर्वाधिक वेगवान शतक झळकावले. शिवाय पंतचे टी-20 क्रिकेटमधील हे प्रथम शतक आहे. दिल्लीचा ऋषभ पंत हा भारतातला डावखुरा एक आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो.
Q.7) मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्य (MBA) तेलक्षेत्रासाठी प्रगत तेल पुनर्प्राप्ती (EOR) कार्यक्रमाचे उदघाटन केले गेले. हे क्षेत्र कोणत्या राज्यात येतात?
A) महाराष्ट्र
B) तामिळनाडू
C) गुजरात
D) राजस्थान
उत्तर : D) राजस्थान
स्पष्टीकरण : बाडमेरमधील मंगला, भाग्यम आणि ऐश्वर्य (MBA) तेलक्षेत्रासाठी प्रगत तेल पुनर्प्राप्ती (EOR) कार्यक्रमाचे उदघाटन केले गेले आहे. हा कार्यक्रम या तेलक्षेत्रापासून दर दिवशी 5 लक्ष बॅरल तेल (BOPD) उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यात कंपनीला मदत करेल. वेदांत उद्योग समुहाच्या केयर्न इंडियाने राजस्थानमधील बाडमेर तेलक्षेत्रातले कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी 37000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. पुढील काही वर्षात ही गुंतवणूक केली जाईल.
Q.8) भारतीय लष्कर 2018 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करीत आहे?
A) कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकाचे वर्ष
B) कर्तव्य पूर्ण करणार्या जेष्ठ सैनिकाचे वर्ष
C) कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाचे वर्ष
D) सैनिकाला आपले कर्तव्य बजावण्यात मदत करणार्या नागरिकांचे वर्ष
उत्तर : A) कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकाचे वर्ष.
स्पष्टीकरण : 14 जानेवारी हा दिवस भारतात सशस्त्र दल जेष्ठांचा दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी कर्तव्य बजावताना आपल्या जीवाचे बलिदान देणार्यांना श्रद्धांजली दिली जाते. भारतीय लष्कर 2018 हे वर्ष 'कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकाचे वर्ष' म्हणून साजरे करीत आहे. फील्ड मार्शल करीअप्पा एम. यांनी दिलेल्या सेवेच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. करीअप्पा भारतीय सशस्त्र दलाचे पहिले कमांडर होते, जे 14 जानेवारी 1953 रोजी सेवानिवृत्त झाले.
Q. 9) कोणत्या संघाने प्रीमियर बॅडमिंटन लीग (PBL) याचा तिसरा हंगाम जिंकला?
A) हैदराबाद हंटर्स
B) बेंगळुरू ब्लास्टर्स
C) चेन्नई स्मेशर्स
D) मुंबई मास्टर्स
उत्तर : A) हैदराबाद हंटर्स
स्पष्टीकरण : हैदराबाद हंटर्स संघाने बेंगळुरू ब्लास्टर्स संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत प्रीमियर बॅडमिंटन लीग (PBL) याचा तिसरा हंगाम जिंकला आहे. हैदराबादच्या गाचीबाउली क्रीडामैदानावर खेळल्या गेलेला हा अंतिम सामना बेंगळुरू ब्लास्टर्सचा ट्रम्प सामना होता.
Q.10) कोणत्या संघाने ‘यूरेशिया चषक गोल्फ स्पर्धा’ या सांघिक स्पर्धेच्या एकेरी प्रकाराचे विजेतेपद जिंकले?
A) टिम एशिया
B) टिम यूरोप
C) टिम अमेरिका
D) टिम आफ्रिका
उत्तर : B) टिम यूरोप
स्पष्टीकरण : टिम यूरोपने ‘यूरेशिया चषक गोल्फ स्पर्धा’ याच्या एकेरी प्रकारात टिम एशियाला मागे टाकत वर्चस्व राखले आहे. ‘यूरेशिया चषक गोल्फ स्पर्धा’ स्पर्धेच्या या तिसर्या हंगामात दुसर्यांदा टिम यूरोपने ही स्पर्धा जिंकलेली आहे. स्पर्धा मलेशियात ग्लेनमॅरी गोल्फ अँड कंट्री क्लब येथे खेळली गेली. टिम युरोपसाठी, टॉमी फ्लीटवुड आणि टायरेल हॅट्टॉन यांनी तीनही सामने जिंकले, तर युता इकेडाने तीन सामन्यांत तीन विजय आणि ली हाओतोंगने तीन सामन्यांत अडीच गुणांची कमाई केली.
Q.11) राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS-4) अनुसार, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरते?
A) 60% हून अधिक श्रीमंत कुटुंबांसह गोव्यामधील लोक सर्वात श्रीमंत आहेत.
B) ग्रामीण भारतातली 29% कुटुंबे आणि शहरी भागातली केवळ 3.3% कुटुंबे खालच्या गरीब गटात आहेत.
C) खालच्या गरीब गटात, बिहारमध्ये निम्म्यापेक्षा अधिक कुटुंब आहेत.
D) अग्रगण्य श्रीमंतांच्या गटातली 70% लोकसंख्या जैन समाजातली आहे.
उत्तर : A) 60% हून अधिक श्रीमंत कुटुंबांसह गोव्यामधील लोक सर्वात श्रीमंत आहेत.
स्पष्टीकरण : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS-4) च्या निष्कर्षानुसार, संपूर्ण भारतात दिल्ली आणि पंजाबमधील लोक सर्वात श्रीमंत आहेत आणि शीर्ष संपत्तीसंदर्भाच्या पाच गटात या प्रदेशांत 60% हून अधिक श्रीमंत कुटुंब वास्तव्य करतात. या अहवालानुसार, ग्रामीण भारतातली 29% कुटुंबे आणि शहरी भागातली केवळ 3.3% कुटुंबे खालच्या गटात आहेत. त्यामुळे दारिद्र्य हा ग्रामीण भागातील प्रमुख घटक म्हणून उघडकीस आला आहे. शेवटच्या गटात, बिहारमध्ये निम्म्यापेक्षा अधिक कुटुंब आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये सुमारे 60% कुटुंब अग्रगण्य श्रीमंतांच्या शीर्ष गटात आहेत. त्यानंतर गोव्याचा (54.5%) क्रमांक लागतो. अग्रगण्य श्रीमंतांच्या गटातली 70% लोकसंख्या जैन समाजातली (सर्वात श्रीमंत) आहेत. जैन समाजातील केवळ 1.5% भाग खालच्या दोन गटात येतात. जैननंतर शीख समुदायाच्या (59.6%) लोकांचा क्रमांक लागतो.
जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,
कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...
"भगवत गीता" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...Thought By MPSC GUIDE
