दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०१

जनरल नॉलेज


Q.1) UIDAI कडून कोणत्या पेमेंट्स बँकेकडून ग्राहकांचे आधार आधारित eKYC करण्याच्या प्रक्रियेवर तात्पुरती बंदी घालण्यात आली?
A) पेटीएम पेमेंट्स बँक
B) एयरटेल पेमेंट्स बँक
C) फिनो पेमेंट्स बँक
D) वरील सर्व
उत्तर: B) एयरटेल पेमेंट्स बँक
स्पष्टीकरण : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने भारती एयरटेल आणि एयरटेल पेमेंट्स बँक यांच्याकडून त्यांच्या मोबाइल सिम कार्ड आणि बँकेच्या ग्राहकांचे आधार आधारित eKYC करण्याच्या प्रक्रियेवर तात्पुरती बंदी आणली आहे. भारती एयरटेल कंपनीने आधार आधारित ग्राहकांच्या मोबाइल सिमच्या सत्यापन प्रक्रियेच्या तथाकथित दुरुपयोगाच्या आरोपावर तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय बँक खाते उघडण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याच्या आरोपावरून हा निर्णय घेतला गेला.


Q.2) डिसेंबर 2017 मध्ये WHO ने मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाला "पोलिओ मुक्त देश" घोषित केले?
A) गबॉन
B) कामेरून
C) अंगोला
D) कांगो
उत्तर : A) गबॉन
स्पष्टीकरण : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मध्य आफ्रिकेतील गबॉनला "पोलिओ मुक्त देश" घोषित केले आहे. गबॉन हा मध्य आफ्रिकेमधील अटलांटिक किनारा लाभलेला देश आहे. लिब्रेव्हिल ही देशाची राजधानी आहे. सेंट्रल आफ्रिकन CFA फ्रँक हे देशाचे चलन आहे.


Q.3) कोणत्या राज्यात चोट्टाखोला गावात भारत-बांग्लादेश संबंधाना दर्शविणारे ‘मैत्री’ उद्यान तयार करण्यात आले?
A) सिक्किम
B) मणीपुर
C) आसाम
D) त्रिपुरा
उत्तर : D) त्रिपुरा
स्पष्टीकरण : त्रिपुरामध्ये दक्षिण भागातील चोट्टाखोला गावात 20 हेक्टरच्या भुखंडावर भारत-बांग्लादेश संबंधाना दर्शविणारे ‘मैत्री’ उद्यान आणि एक विशाल स्मारक तयार करण्यात आले आहे. हे उद्यान भारत-बांग्लादेश सीमेपासून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर आहे. 1971 साली बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या आणि बांग्लादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीत स्मारक आणि मैत्री उद्यान तयार करण्यात आले आहे.


Q.4 ________ मध्ये खेळल्या गेलेल्या ‘वेलेरिया डिमेआनोव्हा मेमोरियल इंटरनॅशनल बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीय ज्युनियर मुलींच्या संघाने 4 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली आहे.
A) रशिया
B) युक्रेन
C) बेलारूस
D) सर्बिया
उत्तर: B) युक्रेन
स्पष्टीकरण : युक्रेनमध्ये खेळल्या गेलेल्या ‘वेलेरिया डिमेआनोव्हा मेमोरियल इंटरनॅशनल बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीय ज्युनियर मुलींच्या संघाने 4 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली आहे. या 8 पदकांमध्ये 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि एक कांस्यपदक आहे. भारतीय संघातील अरुंधती चौधरी (60 किलो), राज साहीबा (70 किलो), मितिका संजय (66 किलो), कोमल (80 किलो) यांनी सुवर्णपदक मिळविले.


Q.5) ‘2017 राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताने 10 सुवर्णपदके आणि 10 रौप्यपदकांची कमाई केली. ही स्पर्धा कुठे खेळली गेली?
A) किव्ह, युक्रेन
B) वारसेव, पोलंड
C) जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
D) अंकारा, टर्की
उत्तर : C) जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
स्पष्टीकरण : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या ‘राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताने 10 सुवर्णपदके आणि 10 रौप्यपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या ग्रेक्रो रोमन प्रकारात राजेंद्र कुमार (55 किलो), मनीष (60 किलो), विकास (63 किलो), अनिल कुमार (67 किलो), आदित्य कुंडू (72 किलो), गुरुप्रीत (77 किलो), हरप्रीत (82 किलो), सुनील (87 किलो), हरदीप (97 किलो), नवीन (130 किलो) या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले.


Q.6) GST प्रणालीमधील कमतरता दूर करण्यासाठी GST परिषदेनी देशात _____ पासून ‘ई-वे’ बिल व्यवस्थेला कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
A) 1 एप्रिल 2018
B) 1 मे 2018
C) 1 जून 2018
D) 1 फेब्रुवारी 2018
उत्तर : C) 1 जून 2018
स्पष्टीकरण :GST प्रणालीमधील कमतरता दूर करण्यासाठी GST परिषदेनी देशात 1 जून 2018 पासून ‘ई-वे’ बिल व्यवस्थेला कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी पासून ‘ई-वे’ बिल व्यवस्थेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ‘ई-वे’ बिल व्यवस्था कारखान्यातून निघालेले उत्पादन आणि आंतरराज्य वाणिज्य कार्यपद्धती यावर इलेक्ट्रॉनिकरीत्या पाळत ठेवण्याप्रमाणे काम करणार, ज्यामुळे मालाच्या खपासंबंधी माहितीमधून धोरण-निर्मात्यांना उपयुक्त मदत होणार.


Q.7) कुठल्या शहरात प्रवासी स्कूटरसाठी पूर्व भारतातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) स्टेशन उघडण्यात आले?
A) भुवनेश्वर, ओडिशा
B) पटना, बिहार
C) कोलकाता, पश्चिम बंगाल
D) रांची, झारखंड
उत्तर : A) भुवनेश्वर, ओडिशा
स्पष्टीकरण : ओडिशाच्या भुवनेश्वर शहरात प्रवासी स्कूटरसाठी पूर्व भारतातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) स्टेशन म्हणजे इंधन मिळण्याचे केंद्र लोकांसाठी उघडण्यात आले आहे. ही CNG केंद्रे भुवनेश्वर आणि कटकमधील GAIL च्या प्रधानमंत्री उर्जा गंगा आणि सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) प्रकल्पाचा भाग आहे. याशिवाय शहरात खांडगिरी आणि तमांडो या ठिकाणी आणखी दोन केंद्रांचे बांधकाम केले जात आहे.


Q.8) कुठे 15-20 डिसेंबर 2017 दरम्यान प्रथम ‘जागतिक तेलुगु परिषद’ आयोजित करण्यात आली?
A) अमरावती
B) हैदराबाद
C) विशाखापट्टणम
D) तिरूपती
उत्तर : B) हैदराबाद
स्पष्टीकरण : तेलंगणाच्या हैदराबादमध्ये 15 डिसेंबर 2017 पासून प्रथम ‘जागतिक तेलुगु परिषद’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पाच दिवस चालणार्या या परिषदेत तेलुगु भाषेत निर्माण झालेल्या साहित्य व संस्कृती या विषयांवर चर्चा केली जात आहे. परिषदेचे आयोजन तेलंगणा राज्य शासनाने केले आहे.


Q. 9) भारताकडून अधिकृत नामांकन म्हणून पाठविलेला अमित मसूराकर दिग्दर्शित ‘______’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेमधून बाद झालेला आहे.
A) न्यूटन
B) ब्लॅक कॉल
C) ब्लॅक रोड
D) ब्लाइंड
उत्तर : A) न्यूटन
स्पष्टीकरण : भारताकडून अधिकृत नामांकन म्हणून पाठविलेला ‘न्यूटन’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेमधून बाद झालेला आहे. अमित मसूराकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ हा चित्रपट ‘सर्वोत्तम विदेशी भाषा’ श्रेणीसाठी भारताकडून नामांकित केले गेले होते. चित्रपटात नायकाच्या मुख्य भूमिकेत राजकुमार राव आहे.


Q.10) कोणत्या संकल्पनेखाली 18 डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस 2017’ आयोजित आहे?
A) सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह
B) मायग्रेशन – ए बेस ऑफ वर्ल्ड्स डेवलपमेंट
C) मायग्रेशन - सेफ अँड साऊंड वर्ल्ड
D) पीसफुल मायग्रेशन
उत्तर : A) सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह
स्पष्टीकरण : ‘सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह’ या संकल्पनेखाली 18 डिसेंबर 2017 रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ साजरा केला जात आहे.



हौसलो को यह मत बताओ की,
आपकी तकलीफ कितनी बड़ी है !
तकलीफ को यह बताओ की,
आपका हौसला कितना बड़ा है!!
Thought By MPSC GUIDE
 

Archive

Contact Form

Send