दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०३
जनरल नॉलेज
Q.1) हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने बहुमत प्राप्त केले?
A) हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष
B) हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष
C) हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये काँग्रेस
D) यापैकी नाही
उत्तर : B) हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष
स्पष्टीकरण : हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप/BJP) बहुमत प्राप्त केले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये एकूण 68 जागांपैकी भाजपने 44 जागा, तर काँग्रेस पक्षाने 21 आणि उर्वरित जागा अन्य पक्षांनी जिंकल्या. गुजरातमध्ये एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा, तर काँग्रेस पक्षाने 77 आणि उर्वरित जागा अन्य पक्षांनी जिंकल्या.
Q.2) NGT ने डोंगराळ भागात गंगा नदीच्या आसपास ______ क्षेत्राच्या आत कोणत्याही बांधकामावर बंदी घालण्यात येईल कारण आता ते क्षेत्र ‘बिन-विकास क्षेत्र’ म्हणून मानले जाईल, असा निर्णय दिला आहे.
A) 100 मीटर
B) 500 मीटर
C) 200 मीटर
D) 50 मीटर
उत्तर : D) 50 मीटर
स्पष्टीकरण : राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) ने डोंगराळ भागात गंगा नदीच्या आसपास 50 मीटर क्षेत्राच्या आत कोणत्याही बांधकामावर बंदी घालण्यात येईल कारण आता ते क्षेत्र ‘बिन-विकास क्षेत्र’ म्हणून मानले जाईल, असा निर्णय दिला आहे. नदीच्या किनाऱ्यापासून 50 ते 100 मीटर यामध्ये येणारे क्षेत्र "नियामक" क्षेत्र म्हणून मानले जाईल आणि राज्य जोपर्यंत विशिष्ट धोरणे तयार करत नाही तोपर्यंत या क्षेत्रात बांधकामाच्या क्रियाकलापांवर बंदी असणार आहे.
Q.3) ऑटोमोबाइल व विनिर्माण उद्योगासंबंधित उच्च रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयासोबत कोणत्या कंपनीने करार केला?
A) महिंद्रा अँड महिंद्रा
B) मारुती सुझुकी इंडिया
C) किर्लोस्कर
D) टाटा मोटर्स
उत्तर : B) मारुती सुझुकी इंडिया
स्पष्टीकरण : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महानिदेशालय (DGT) आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांनी एक सामंजस्य करार केला आहे. कौशल्य भारत अभियानांतर्गत युवांना ऑटोमोबाइल व विनिर्माण उद्योगासंबंधित उच्च रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार आहे.
Q.4) ‘भारतीय वन (दुरूस्ती) विधेयक-2017’ संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?
I - राज्यांमध्ये बांबूच्या होणार्या वाहतूकीस आंतरराज्यीय परवाण्याची व्यवस्था समाप्त करण्यासाठी दुरूस्ती सुचवते.
II - गैर-वन क्षेत्रात वाढविलेला बांबू ‘वृक्ष’ च्या व्याख्येमधून वगळण्यासाठी दुरूस्ती सुचवते.
A) फक्त I
B) फक्त II
C) I आणि II दोन्ही
D) एकही नाही
उत्तर : C) I आणि II दोन्ही
स्पष्टीकरण : लोकसभेत ‘भारतीय वन (दुरूस्ती) विधेयक-2017’ चर्चेसाठी मांडण्यात आले आहे. हे विधेयक राज्यांमध्ये बांबूच्या होणार्या वाहतूकीस घ्यावयास लागणार्या परवानगीची आवश्यकता म्हणजेच आंतरराज्यीय परवाण्याची व्यवस्था समाप्त करण्यासाठी दुरूस्ती सुचवते. गैर-वन क्षेत्रात वाढविलेला बांबू ‘भारतीय वन अधिनियम-1927’ मधील ‘वृक्ष’ च्या व्याख्येमधून वगळण्यासंबंधी देखील हे विधेयक आहे.
Q.5) कोणत्या देशाच्या शासनाने आपली प्रायोगिक विद्यार्थी व्हिसा योजना आणखी 23 विद्यापीठांसाठी विस्तारीत केली आहे, ज्या अंतर्गत भारतीय आणि इतर गैर युरोपीय संघवासी विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यास सहा महिन्यांचा कालावधी मिळू शकेल?
A) युरोपीय संघ
B) ब्रिटन
C) फ्रान्स
D) रशिया
उत्तर : B) ब्रिटन
स्पष्टीकरण : ब्रिटनच्या शासनाने आपली प्रायोगिक विद्यार्थी व्हिसा योजना आणखी 23 विद्यापीठांसाठी विस्तारीत केली आहे, ज्या अंतर्गत भारतीय आणि इतर गैर युरोपीय संघवासी विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यास सहा महिन्यांचा कालावधी मिळू शकेल. विद्यार्थी व्हिसा योजना गेल्यावर्षी ऑक्सफर्ड, बाथ, केंब्रिज आणि इंपिरियल कॉलेज, लंडन या चार ब्रिटिश विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली.
Q.6) कोणत्या देशाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात भारताला आपला प्रमुख संरक्षण भागीदार असल्याचे वर्णन केले आहे?
A) रशिया
B) जपान
C) चीन
D) अमेरिका
उत्तर : D) अमेरिका
स्पष्टीकरण : अमेरिकेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण (NSS) चे अनावरण केले. त्यामध्ये अमेरिकेने भारताला जागतिक स्तरावरील उभारणारी वैश्विक शक्ती म्हणून आपला प्रमुख धोरणात्मक व संरक्षण भागीदार असल्याचे वर्णन केले आहे. NSS अनुसार अमेरिका भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी आपले चौ-पक्षीय सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.
Q.7) नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कुठे 15 दिवस चालणारा ‘लोसर’ महोत्सव साजरा केला जात आहे?
A) शिमला, हिमाचल प्रदेश
B) लद्दाख, जम्मू-काश्मीर
C) गुवाहाटी, आसाम
D) कोहिमा, नागालँड
उत्तर : B) लद्दाख, जम्मू-काश्मीर
स्पष्टीकरण : तिबेटच्या लद्दाखमध्ये 15 दिवस चालणारा ‘लोसर’ महोत्सव साजरा केला जात आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी लद्दाखमध्ये ‘लोसर’ महोत्सव साजरा केला जातो. या सांस्कृतिक उत्सवादरम्यान बौद्ध भिक्षुकांकडून प्रार्थना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्राचीन रीती आणि पारंपारिक प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते.
Q.8) कोणत्या बॉलीवुड अभिनेत्याला पंजाब राज्य शासनाकडून पंजाब रत्न पुरस्कार दिला गेला?
A) सनी देओल
B) कबीर बेदी
C) सोनू सूद
D) समीर सोनी
उत्तर : C) सोनू सूद
स्पष्टीकरण : बॉलीवुड अभिनेता सोनू सूद यांना पंजाब राज्य शासनाकडून पंजाब रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांचे वास्तव्य असलेल्या मोगा शहरातील लोकांच्या कल्याणामध्ये योगदानासाठी दिला गेला आहे.
Q. 9) कोणत्या देशात स्त्रीकरिता जगातला सर्वात लांब विवाहासाठीचे परिधान तयार करण्याचा गिनीज विक्रम केला गेला?
A) अमेरिका
B) फ्रान्स
C) इटली
D) ब्रिटन
उत्तर : B) फ्रान्स
स्पष्टीकरण : फ्रान्समध्ये स्त्रीकरिता जगातला सर्वात लांब विवाहासाठीचे परिधान तयार केल्याची गिनीज विक्रमामध्ये नोंद केली गेली आहे. हे परिधान 8,095 मीटर लांब आहे. ‘डायनॅमिक प्रोजेक्ट्स’ या बांधकाम कंपनीने हा विक्रम केला आहे.
Q.10) गुवाहाटीत खेळलेल्या ‘ज्युनियर नॅशनल्स’ स्पर्धेत अंडर-17 आणि अंडर-19 एकेरीचे विजेतेपद कोणत्या बॅडमिंटनपटूने जिंकले?
A) आकार्शी कश्यप
B) मालविका बन्सोड
C) वैदेही चौधरी
D) यापैकी नाही
उत्तर : A) आकार्शी कश्यप
स्पष्टीकरण : भारताची ज्युनियर बॅडमिंटनपटू आकार्शी कश्यप हिने गुवाहाटीत खेळण्यात आलेल्या ‘ज्युनियर नॅशनल्स’ स्पर्धेत अंडर-17 आणि अंडर-19 एकेरीचे विजेतेपद जिंकले. अंडर-17 गटात आकार्शी कश्यप हिने अंतिम फेरीत मालविका बन्सोडचा पराभव केला आणि अंडर-19 गटात वैदेही चौधरीला हरवले.
जब तक आप अपनी समस्याओं एंवकठिनाइयों की वजह दूसरों को मानते है,तब तक आप अपनी समस्याओं एंवकठिनाइयों को मिटा नहीं सकते|Thought By MPSC GUIDE
