चालू घडामोडी : ७ डिसेंबर २०१७

पंडित कशाळकर यांना तानसेन पुरस्कार जाहीर :
  • संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कारपंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • कशाळकर हे हिंदुस्‍थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.
  • नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.
  • जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
  • तसेच त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात 1983 ते 1990दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ताजमहाल जागतिक वारसा स्थळांमध्ये दुसर्‍या स्थानी :
  • भारताची ओळख असलेला संगमरवरी मकबरा 'ताजमहाल' हे युनेस्कोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) असल्याचे एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने म्हटले आहे.
  • मोगल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेला आणि दरवर्षी 80 लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असलेला ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे 'ट्रिप अ‍ॅडव्हायझर'ने जगभरातून युनेस्कोच्या सवरेत्कृष्ट सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.
  • तसेच या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळांमध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झु डा याने ख्रिस्तपूर्व 1368 साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे. दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचु पिचुने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ब्राझीलमधील इगुआझु राष्ट्रीय उद्यान, इटलीतील 'सासी ऑप मटेरा', पोलंडमधील ऐतिहासिक क्रकॉओ, इस्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानमधील इस्तंबुलची ऐतिहासिक ठिकाणे यांचाही यादीत समावेश आहे.
'मी टू' मोहिमेला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार :
  • लैंगिक अत्याचाराविरोधात सुरु करण्यात आलेल्या 'मी टू' (#MeToo) या ऑनलाईन मोहिमेला टाइम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • 'मी टू' या ऑनलाईन हॅशटॅग अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या अभियानाला जगभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता.
  • हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यावर 'मी टू' या ऑनलाईन मोहिमेला सुरुवात झाली होती.
  • लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता त्याबद्दल बेधडक व्यक्त व्हावे, यासाठी 'मी टू' अभियानाची सुरुवात करण्यात आली. लैंगिक अत्याचाराविरोधातील आवाज बुलंद करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता. याच मोहिमेला टाइम मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर केला आहे. अमेरिकेत 6 डिसेंबर रोजी सकाळी याबद्दलची घोषणा करण्यात आली.
दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू :
  • गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानीतील पहिलेवहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र 7 डिसेंबर पासून दिमाखात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ 32 महिन्यांमध्ये 'ल्युटेन्स दिल्ली'मध्ये ही देखणी वास्तू साकारली आहे.
  • 20 एप्रिल 2015 रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते. त्याचवेळी ते म्हणाले होते, की 'या महामानवाचे हे स्मारक पंचवीस वर्षांहून अधिक काळ रेंगाळले. आता आपण पंचवीस महिन्यांमध्ये ते साकारण्याचा प्रय केला पाहिजे.' मोदींनी म्हटल्याप्रमाणे 25 महिन्यांमध्ये ते पूर्ण होऊ शकले नाही; पण 32 महिन्यांमध्ये का होईना, पंचवीस वर्षांपासून रखडलेली ही वास्तू देखण्या स्वरूपात उभी राहिली.
  • '15, जनपथ' असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध 'ल मेरिडियन' या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे. 7 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उदघाटन सोहळा आहे.
  • तसेच या केंद्राला 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चा दर्जा देण्याची शक्यता असून दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे. सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी 'थिंक टँक' असू शकते.
जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा :
  • जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या घडामोडींमुळे आधीच स्फोटक असलेल्या मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला आहे.
  • 2016 साली प्रचारात याबाबत दिलेले आश्वासन ट्रम्प आता पूर्ण करत आहेत. या वादग्रस्त निर्णयामुळे मध्यपूर्वेत तसेच जगात इतरत्र व्यापक निदर्शने होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असे त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. ते या बाबीकडे 'ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता' या दृष्टिकोनातून पाहतात, असे एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले.
दिनविशेष :
  • सन 1856 मध्ये 7 डिसेंबर रोजी पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
  • स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख 'स्वामी महाराज'यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.
  • कन्‍नड साहित्यिक यू.आर. अनंतमूर्ती यांना 7 डिसेंबर 1994 रोजीज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.
  • 7 डिसेंबर 1998 मध्ये 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी 'वसंत बापट' यांची निवड करण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सुरु

  • गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले दिल्लीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७ डिसेंबर रोजी सुरु झाले आहे.
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानी दिल्लीतील हे पहिलेच स्मारक आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ ३२ महिन्यांमध्ये ही वास्तू साकारली आहे. २० एप्रिल २०१५रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते.
  • ‘१५, जनपथ’ असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे.
  • या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ असू शकते.
  • दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे.
  • बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली; पण त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारी एकही वास्तू राजधानीत नव्हती.
  • ही बाब हेरून बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये (१९९०-९१) ‘लुटेन्स दिल्ली’मधील ‘जनपथ’ मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी घेतला होता.
 असे असेल आंतरराष्ट्रीय केंद्र 
  • जागा : ३.२ एकर
  • खर्च : १९५ कोटी
  • बांधण्याचा कालावधी : ३२ महिने
  • दहा हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, ‘ई-लायब्ररी’च्या माध्यमातूनदोन लाख पुस्तके आणि ७० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध.
  • सातशे क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी शंभर क्षमतेची दोन छोटेखानी सभागृहे.
  • दर्शनी भागात आंबेडकर आणि ध्यानस्थ बुद्ध अशा दोन भव्य पुतळेआहेत. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
  • सत्तर फुटांचा अशोक स्तंभदेखील कोरलाय. कदाचित तो देशातील सर्वांत उंच ठरावा.
  • वास्तूची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत. एकूण बुद्धिस्ट वास्तूशैलीचा प्रभाव आहे.

येमेनच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या

  • सलग ३३ वर्षे येमेनवर राज्य करणाऱ्या अली अब्दुल्लाह सालेहयांची ४ डिसेंबर रोजी हौती बंडखोरांकडून हत्या करण्यात आली.
  • १९७८साली उत्तर येमेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सालेह सत्तेत आले होते. त्यानंतर १९९०साली देशाच्या दोन तुकड्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ते बृहद अशा येमेनचे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • बेकारी आणि चलनवाढीने त्रस्त झालेल्या लोकांनी अरब स्प्रींगमध्ये केलेल्या उठावात २०११साली सालेह यांना पायउतार व्हावे लागले होते.
  • त्यानंतर हादी यांचे सरकार अस्तित्वात आले. गेली अनेक वर्षे येमेनला हौती बंडखोरांनी पोखरुन ठेवलेले आहे.
  • सत्तापालट होऊनही येमेनमध्ये फारसा बदल झालेला नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये येमेनमधील स्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे.
 येमेन आणि हौती बंडखोर 
  • तज्ज्ञांच्या मते हौती बंडखोरांचे मुळ ९०च्या दशकात वायव्य येमेनमध्ये प्रभावी असणाऱ्या शबाब-अल-मुमानीन संघटनेमध्येआहे.
  • अमेरिकेच्या नेतृत्वाखाली २००३साली इराकवर हल्ला करण्यात आल्यानंतर या संघटनेचा एक नेता हुसैन अल हौती याने विरोध प्रकट केला होता.
  • त्याने अमेरिका आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सालेह यांच्याविरोधात निदर्शने केली होती. मात्र येमेनी संरक्षण दलाच्या हल्ल्यात त्याला ठार मारण्यात आले.
  • त्याच्या नावावरून या बंडखोराच्या गटाला हौती असे नाव पडले आहे. सध्या ३३ वर्षांचा अब्दुल मलिक अल हौती या गटाचे नेतृत्वकरत आहे.
  • हौती बंडखोरांच्या मते, आताचे हादी सरकार भ्रष्ट असून अधिकारांचे विभाजन योग्यरित्या झाले नसल्याचे कारण पुढे करत हौती बंडखोरांनी यादवी सदृ्श्य स्थिती निर्माण केली.
  • त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हादी यांनी सौदी अरेबियाचा रस्ता धरला.
  • त्याचप्रमाणे येमेनमधील बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी सौदीने सरळ हस्तक्षेप करत बंडखोरांवर हल्ले सुरु केले.
  • त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आणि सामान्य येमेनी नागरिक व इतर देशांतील नागरिकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण झाला होता.
  • लढाईमध्ये वेगाने घडामोडी घडत जाऊन बॉम्बमुळे अनेक ठिकाणी इमारती, शाळा उद्धवस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • यामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले तर हजारो लोकांना आपले प्राणही गमवावे लागले.
  • संयुक्त राष्ट्राच्या मते या संपुर्ण पेचप्रसंगात १० हजार लोकांची हत्याझालेली आहे. तसेच मानवाधिकाराच्या बाबतीत ही सर्वात मोठी समस्या असल्याचे मतही संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.
 येमेनचे महत्त्व 
  • येमेन हा तसा पाहायला गेल्यास मध्यम आकाराचा देश आहे. भूभागाच्या बाबतीत जगात त्याचा क्रमांक ५०वा आहे.
  • मात्र त्याचे स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहे. एडनचे आखात (अरबी समुद्र) आणि तांबडा समुद्र जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीची जागा या येमेनजवळ आहे.
  • या चिंचोळ्या जलपट्ट्याला बाब-अल-मनुदाब असे नाव आहे. याच मार्गावरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. तेलाची वाहतूकही येथूनच होते.
  • इतकेच नव्हे तर तांबड्या समुद्रातील काही बेटांवरही येमेनचा अधिकार आहे. त्यामुळे येमेनचे महत्व अनन्यसाधारण आहे.

जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेची मान्यता


  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले आहे.
  • तेल अवीव येथील अमेरिकी दूतावास जेरूसलेमला स्थलांतरितकरण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्याचे आदेश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत.
  • ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दीर्घकालीन भूमिकेला छेद देणारा असून, यामुळे आधीच स्फोटक असलेल्या मध्य-पूर्व क्षेत्रातील हिंसाचारात वाढ होईल, असा इशारा अनेक अरबी नेत्यांनी दिला आहे.
  • इस्रायलने सन १९८०मध्ये जेरूसलेमला आपली राजधानी जाहीर केल्यापासून अरब राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी आहे.
  • आता अमेरिकने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्यानंतर ही नाराजी अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.
  • इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील विवादाचे केंद्र असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता न देण्याचा सल्ला पश्चिम आशियासह जगभरातील अनेक नेत्यांनी अमेरिकेला दिला होता.
  • असे झाल्यास या क्षेत्रातील शांतता प्रक्रिया संपुष्टात येईल व नवा संघर्ष उफाळून अशांतता पसरेल, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, तो विरोध झुगारत अमेरिकेने ही मान्यता दिली आहे.

Archive

Contact Form

Send