चालू घडामोडी : १३ डिसेंबर २०१७
पंतप्रधान मोदींना सचिनचे पत्र :
- ☑ आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा, अशी विनंती माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
- ☑ सचिनने 24 ऑक्टोबरला मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अव्वल क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकताना औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रात त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने जुलै महिन्यात शाहीद यांचा मृत्यू झाला होता. बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
- ☑ पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यापूर्वी क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे.
अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनीला सुवर्णपदक :
- 👉 भविष्यात लांब पल्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्यासंजीवनी जाधवने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
- 👉 आचार्य नागार्जूना विद्यापीठाच्या यजमानात्वाखाली ही स्पर्धा सुरू आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या संजीवनीचे हे पाच हजार मीटर शर्यतीतील हे सलग चौथे सुवर्णपदकआहे.
- 👉 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संजीवनीने प्रतिस्पर्ध्याना संधी न देता 15 मिनिटे 51.58 सेकंदात शर्यत जिंकली. अल फलाह विद्यापीठाच्या वर्षा देवीला 16 मिनीटे 50.23 सेकंदात रौप्य तर दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ च्या डिम्पल सिंगला 16 मिनीटे 56.88 सेकंदात ब्राँझ पदक जिंकले.
- 👉 पुरूषांच्या शर्यतीत पंजाबच्या रणजीत कुमारने किसन तडवीला मागे टाकून 14 मिनिटे 39.19 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. किसनला 14मिनिटे 39.56 सेकंदात रौप्य मिळाले. गतवर्षी किसनने सुवर्णपदक जिंकले होते.
नेत्यांवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये :
- 👉 गुन्हे दाखल असलेल्या खासदार आणि आमदारांसाठी केंद्र सरकारने 12 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात ही माहिती देण्यात आली असून, यासाठी 7.8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष न्यायालयात लोकप्रतिनिधींविरोधातील प्रलंबित खटले तातडीने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
- सरकारी आकडेवारीनुसार 2014 पर्यंत भारतातील एकूण 1,581खासदार आणि आमदारांविरोधात 13,500 खटले सुरु आहेत. हे प्रमाण आता वाढलेही असेल. न्यायालयातील संथप्रक्रियेमुळे हे खटले प्रलंबित राहतात आणि लोकप्रतिनिधींची फावते. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.
- 👉 राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालये स्थापन करावीत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. हा विषय राज्यांच्या अखत्यारित असल्याचा पवित्रा घेत केंद्राने हात झटकू नयेत. तर न्यायालयांच्या स्थापनेसाठी राज्यांना कशाप्रकारे साह्य करता येईल, याचा विचार करून केंद्राने ठोस योजना आखावी, असे कोर्टाने बजावले होते. यासाठी कोर्टाने 8आठवड्यांची मुदतही दिली होती.
नॉर्वेमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक :
- 👉 भारतामध्ये सध्या 2जी, 3जी आणि 4जी सारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. आपल्याला हा स्पीड जास्त वाटतोही मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत 'स्लो' असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या 100 देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही.
- 👉 'ओक्ला' या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात 109 व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये 76 व्या स्थानी आहे. या वर्षाच्या सुरवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी स्पीड 7.65 एमबीपीएस इतका होता. वर्षभरात या स्पीडमध्ये वाढ झाली आहे.
- 👉 नोव्हेंबरमध्ये इंटरनेटचा स्पीड 8.80 एमबीपीएस इतका होता. आताच्या आणि सुरवातीच्या इंटरनेट स्पीड लक्षात घेता इंटरनेटच्या स्पीडमध्ये 15टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र, इतर देशांत इंटरनेटचा स्पीड चांगलाच 'हाय' आहे.
- 👉 नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 62.66 एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये 53.01 एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये52.78 एमबीपीएस इतका आहे.
गृहमंत्रालयाकडून राज्यांच्या सीमा विकासासाठी निधी :
- 👉 इतर देशांशी सीमा जोडलेल्या सहा राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 174 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सीमांच्या विकासासाठी हा निधी देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत (BADP) हा निधी देण्यात आला आहे.
- तसेच या BADP कार्यक्रमांतर्गत नुकताच आंतरराष्ट्रीय सीमेवरील 0 ते 10किमी परिघातील सर्व गावांच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान, स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम, खेळांचा प्रसार, ग्रामीण पर्यटनाचा प्रसार, सीमा पर्यटन आणि वारसास्थळांचे संरक्षण यांचाही समावेश आहे.
- डोंगराळ भागातील दुर्गम भागात हेलिपॅड उभारणे, रस्त्याचे जाळे नसलेल्या ठिकाणी रस्ते बनवणे, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे त्याचबरोबर जैविक शेती करणे या सर्वांचा BADP कार्यक्रमात समावेश होतो.
- 👉 आसामची बांगलादेशसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आलीआहे. पश्चिम बंगालची नेपाळ आणि भूतानसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे. गुजरातची पाकिस्तानसोबत, मणिपूरची म्यानमारसोबत, उत्तर प्रदेशची नेपाळसोबत तर हिमाचल प्रदेशची चीन आणि नेपाळसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे.
दिनविशेष :
- 👉 सीमेन्सचे संस्थापक 'वर्नेर व्हॅन सीमेन्स' यांचा जन्म
- 👉 13 डिसेंबर 1816मध्ये झाला होता.
- 👉 13 डिसेंबर 1955 हा दिवस गोव्याचे मुख्यमंत्री 'मनोहर पर्रीकर' यांचा जन्मदिन आहे.
- 👉 13 डिसेंबर 2002 मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक 'यश चोप्रा' यांना2001चा फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.
प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ लालजी सिंह यांचे निधन
- भारताचे प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि भारतातील डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे १० डिसेंबर रोजी निधन झाले.
- १९८८मध्ये त्यांनी भारतात सर्वप्रथम डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञान विकसित करून ते न्यायवैद्यक शाखेत वापरण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर प्रियदर्शिनी मट्टू खून प्रकरण, दिल्लीतील नैना साहनी तंदूरकांड, उत्तर प्रदेशातील मधुमिता हत्याकांड यांसह अनेक प्रकरणांत मृतांची व आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यांचे हे तंत्रज्ञान वापरले गेले. या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांच्या तपासाला अतिशय निर्णायक अशी कलाटणी मिळाली.
- याच तंत्रज्ञानातून जनुकीय रोगांचे कोडेही उलगडता येते. डीएनएच्या आधारे रोगनिदानाची पद्धतीही त्यांनी भारतात विकसित केली होती.
- मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कलवरी गावचे असलेले सिंह यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून जैवतंत्रज्ञानात बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवी घेतली.
- पुढचे शिक्षण एडिनबर्ग विद्यापीठातून घेताना त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानातील संशोधन सुरू केले.
- परदेशात संशोधनाची संधी असतानाही १९७७ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशात डीएनए फिंगर पिंट्रिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात घालवला.
- रेशमाच्या किडय़ांचे जनुकीय विश्लेषण, मानवी जिनोम व प्राचीन डीएनएचा अभ्यास, वन्यजीव संरक्षण असे त्यांचे आवडीचे विषय होते.
- त्यांनी तीनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले. हैदराबादची सेंटर फॉर डीएनए फिंगर पिंट्रिंग अॅण्ड डायग्नॉस्टिक्स या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
- सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते बीएचयूचे २५वे उपकुलगुरूही होते.
- त्यांनी त्यांच्या छोटय़ाशा गावात २००१मध्ये राहुल कॉलेज व नंतर अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित जिनोम फाऊंडेशन या संस्था स्थापन केल्या.
- १९७४मध्ये त्यांना युवा संशोधक पुरस्कार मिळाला. त्यानंतर रॅनबक्सी पुरस्कार, भटनागर पुरस्कार व पद्मश्री असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
रोहित शर्माचे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक
- पंजाबमधील मोहाली येथील मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावण्याचा पराक्रमकेला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
- विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला कर्णधारही ठरला आहे.
- त्याने १५३ चेंडूंमध्ये केलेल्या २०८ धावांच्या धमाकेदार खेळीत १३ चौकार १२ षटकारांची आतिषबाजी केली.
- रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा ११५ चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या ३६ चेंडूत पूर्ण केल्या. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने या सामन्यात श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव केला.
- २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द रोहितने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावताना २०९ धावांची खेळी साकारली होती.
- २०१४मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. ही खेळी कोणत्याही खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
- यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१०मध्ये वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.
- याशिवाय भारताचा वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलनेही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे.
